Monday, May 18, 2015

कोरिया

आज पंतप्रधान मोदी यांचे द. कोरियात आगमन झाले. १९९६ मध्ये मीSamsung मध्ये  SAP implement करण्यासाठी काही महिने  सेऊलमध्ये राहिलो होतो त्याच्या स्मृती चाळविल्या गेल्या.

कोरिया आणि भारताचे पुर्वापाराचे संबंध आहेत. रवींद्रनाथ टागोरांनी एका कवितेत कोरियाला आशियाचा दीप म्हटले होते. ही कविता तेथे शालेय अभासक्रमांत आहे. त्यामुळे तेथे सर्वांना रवींद्रनाथ टागोर माहित आहेत.

कोरियाचे वैशिष्ट्य म्हणजे तेथील लोक अत्यंत राष्ट्रनिष्ठ आहेत. १९९८ मध्ये कोरियाचे चलन पडल्यावर तेथील जनतेने स्वेच्छेने परकीय वस्तू वापरणे बंद केले आणि परदेशी सहलींसाठी जाणे थांबविले. त्यामुळे त्यांचे चलन काही महिन्यातच स्थिर झाले.
कोरियन लोक टिप घेणे अपमानास्पद समजतात. त्यामुळे तेथे कोणालाही टिप देण्याचा प्रयत्न करू नका असे आम्हाला सांगितले गेले होते.

कोरियन अतिशय मोठ्या प्रमाणात दारू पितात. परंतु आदल्या दिवशी पार्टीत खूप दारू पिऊनही  दुसऱ्या दिवशी वेळेवर कामावर येणे महत्वाचे समजतात. पार्टीत स्वत:च्या हाताने (दोन्ही हातांनी)  दुसऱ्याचा दारूचा ग्लास भरणे हा मोठा सन्मान समजतात, मात्र असा सन्मान नाकारणे हा मोठा अपमान समजतात. हे माहित नसल्याने तेथील पहिल्या पार्टीत मी ग्लास रिकामा करून ठेवत होतो आणि कोणी मॅनेजर तो परत भारत असे आणि मला नाकारता येत नसे. माझी काय अवस्था झाली असेल याचा विचार करा ! दारू पिऊन एखाद्या पार्टीत पडणे आणि त्याला कोणीतरी घरी पोचविणे ही अत्यंत सामान्य गोष्ट समजतात. (मोदी दारू पीत नाहीत, त्यांचे कसे होणार?)

कोरियन युद्ध १९५५ मध्ये चीन आणि कोरियात झाले. त्यावेळी चीन आपला जवळचा मित्र होता. संयुक्त राष्ट्रांच्या १६ देशांच्या फौजा कोरियाच्या मदतीला आल्याने कोरिया आपला अर्धा देश (आताचा द. कोरिया) वाचवू शकला. या १६ देशांपैकी (चीन आपला मित्र असूनही) आपण एक होतो. आपले वैद्यकीय पथक या संयुक्त राष्ट्रांच्या फौजात होते. परंतु आजच्या कोरियन नागरिकांना त्याची कल्पना नाही. मला त्यांना हे सांगावे लागले.

काही शतकांपूर्वी आयोध्येच्या राजकन्येचे कोरियाच्या राजाशी लग्न झाले. ही राजकन्या आपल्याबरोबर काही पंडितांना घेऊन गेली. कोरियन लोक तेव्हा चीनी चित्रलिपी वापरत होते. चीनबरोबर पुर्वापाराचे बिघडलेले संबंध असल्याने कोरियन राजाला स्वत:ची लिपी हवी होती. त्याने या भारतीय पंडितांना कोरीयासाठी लिपी बनविण्यास सांगितले. यासाठी बांबूच्या पडद्याच्या पडलेल्या सावल्यांतून ही लिपी बनविण्याची राजाची इच्छा होती. भारतीय पंडितांनी ही लिपी बनविली. ही लिपी 'बाराखडी'च्या स्वरुपात आहे.

आपण ज्याला चीनीमातीच्या वस्तू म्हणतो ती वस्तुत: कोरियन कला आहे. त्यांनीच प्रथम अशा मातीपासून वस्तू बनविण्यास आणि त्या रंगविण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांनी जांभळा रंग वापरला. आजही कोरियन चीनी मातीच्या कलेत जांभळ्या रंगाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो.

कोरियन साम्राज्य पूर्वी मोठे पसरलेले होते. कोरियन राजांचे चीनवर वारंवार हल्ले होत असत. यापासून संरक्षण करण्यासाठी चीनची भिंत बांधली आहे. चीनमध्ये ५७ वंशांचे लोक राहतात. त्यापैकी हान (हुण ??)वंश बहुसंख्येने आहे तर इतर ५६ वंश अल्पसंख्यांक समजले जातात. कोरियन वंश चीनमध्ये अल्पसंख्य वंश म्हणून ओळखला जातो.

कोरियन महिला दक्षिण आशियात सर्वात सुंदर म्हणून ओळखल्या जातात. कोरियन लोक याचे रहस्य तेथे पिकणाऱ्या जीनसिंग या मुळीत आहे असे समजतात. जीनसिंग खाण्याने त्वचा उजळते आणि मनुष्य चिरतरुण राहतो असे सिद्ध झाले आहे. त्यामुळे जीनसिंग अमेरिकेत प्रसिद्ध आहे.

No comments:

Post a Comment