संतोष कारखानीस

वयाच्या पंधराव्या वर्षापासून सामाजिक कार्यात प्रत्यक्ष सहभाग. कुमार वयातच राष्ट्र सेवा दलाच्या राज्यमंडळाचा सभासद. एस.एम.जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवेचे पहिले धडे गिरविले. महाविद्यालयात असताना राष्ट्रसेवादल राज्य विज्ञानविभाग प्रमुख. छात्रभारती विद्यार्थी संघटनेचा संस्थापक सभासद. छात्रभारती द्वैमासिकाचा पहिला सहसंपादक. ठाण्यात राष्ट्रसेवादलाचे मोठे संघटन ८०च्या दशकाच्या अखेरीस उभारले होते. (सध्या राष्ट्रसेवादल आणि छात्रभारतीशी संबंध नाही) बाबा आमटे यांच्या 'भारत जोडो' सायकल यात्रेसाठी ठाणे जिल्ह्याचे नियोजन. ठाण्यातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या 'दत्ता ताम्हणे एज्युकेशनल ट्रस्ट' या संस्थेचा अनेक वर्षे कार्यकारी विश्वस्त. 'साने गुरुजी कथामालेच्या' माध्यमातून सलग बारा वर्षे नवी मुंबई येथे मुलांवर समतेचे संस्कार केले. अनेक सामाजिक संस्थाना तंत्रविज्ञान बाबतीत सहाय्य करीत आहे. आदिवासी विभागात मुलांना व्यक्तिमत्व विकासात सहाय्य. 

व्यवसायाने संगणक आणि व्यवस्थापन सल्लागार. अनेक वर्षे विविध देशातील मोठ्या कंपन्यांसाठी सल्लागार म्हणून काम केले आहे. एका मोठ्या भारतीय उद्योगसमूहाचा उपाध्यक्ष या नात्याने काही वर्षे जबाबदारी पेलली आहे.  IIT मुंबई येथून प्रथम श्रेणीत अभियांत्रिकी पदवी. अनेक स्थानिक आणि परदेशी विद्यापीठातून व्यवस्थापन अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.

4 comments:

  1. अतिशय उपयुक्त आणी मनोरंजक माहीती , धन्यवाद

    ReplyDelete
  2. नमस्कार संतोष जी, श्रीकृष्णांच्या ८ राण्यांबद्दल आपण ब्लॉग वर लिहिले आहेत. लक्ष्मणा हिचा विवाह अत्यंत चमत्कारिक पण लावून झाला. ते वर्णन श्रीमद्भागवत दशम स्कंद अध्याय 87 श्र्लोक १७ ते २७ मधे सविस्तर येतो.
    यावर आपली प्रतिक्रिया जाणून घ्यायला आवडेल.
    विंग कमांडर शशिकांत ओक विमाननगर पुणे 9881901049

    ReplyDelete
  3. सत्संगधारा
    Https://satsangdhara.net/bhp/10-83.htm
    अध्याय ८७ नसून ८३ आहे

    ReplyDelete