Tuesday, July 27, 2021

कुंडलिनी विद्या भाग १४

मागील काही भागांमध्ये आपण सात पैकी पहिल्या पाच चक्रांबाबत माहिती घेतली. या चक्रांपैकी पहिली तीन चक्रे म्हणजे मूलाधार, अनाहत आणि मणिपूर चक्र ही माणसाच्या आदिम प्रेरणांशी संबंधित आहेत. ज्याला इंग्रजीत survival instincts म्हणतात त्याच्याशी संबंधित आहेत. या आदिम प्रेरणांची चक्रे भेदल्याशिवाय आपल्याला आपल्या दैवी प्रेरणांची चक्रे भेदणे कठीण जाईल. 

अनाहत चक्र हे  आदिप्रेरणा आणि दैवी प्रेरणा यांच्यात सांधा जुळविणारे चक्र आहे. म्हणूनच ते दोन त्रिकोणांनी दर्शविले जाते. एक त्रिकोण हा खालच्या बाजूकडे निर्देश करतो. हा आदिम प्रेरणा दाखवितो. तर दुसरा त्रिकोण हा वरील बाजूकडे निर्देश करतो. हा त्रिकोण दैवी प्रेरणा दर्शवितो. वरील तीन चक्रे म्हणजेच विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्त्रार दैवी प्रेरणांशी संबंधित आहेत.

आज आज्ञाचक्राबाबत विचार करू. हे अत्यंत महत्वाचे चक्र असल्याने जरा विस्ताराने विचार करू. 

हे चक्र भ्रूमध्यात म्हणजे दोन भुवयांच्या मध्यभागी आहे. 'ज्ञ' हे अक्षर ज्ञानाकडे निर्देश करते. आज्ञा चक्र हे आपल्याला ज्ञानाचे संतुलन करणारे केंद्र आहे. आपल्याला दोन प्रकारांनी ज्ञान मिळते. आपण आपल्या आसपासच्या गोष्टींचे ज्ञान आपल्या ज्ञानेंद्रियांच्या साहाय्याने घेतो. हे 'वस्तुनिष्ठ' ज्ञान जसेच्या तसे आपल्या मेंदूत जात नाही. आपल्या संवेदनांवर आपला मेंदू आपल्या पूर्वीच्या अनुभवांवरून संस्करण करतो. हे संस्करण झालेले ज्ञान मेंदूत साठविले जाते. लाल गुलाब पाहिल्यास त्याचा रंग, रूप याचे ज्ञान मेंदूला पूर्वी पाहिलेल्या त्या रंगाच्या आणि रूपाच्या वस्तूशी तुलना करून होते. आणि मग हे ज्ञान मेंदूत साठविले जाते. हे प्रामुख्याने कार्यकारणभावाचे ज्ञान (Logical Thinking) असते. याउलट दुसरा ज्ञानाचा प्रकार हा वस्तुनिष्ठ नसतो. हे ज्ञान आपल्याला उस्फुर्तपणे होते. भाव-भावना यांचे ज्ञान असे होते. भूक लागली की रडण्याचे उस्फुर्त ज्ञान नुकत्याच जन्मलेल्या बाळाला याच प्रकाराने होते. ते शिकवावे लागत नाही. कलाकार आपली कला याच उस्फुर्ततेने सादर करू शकतात. या दोन्ही प्रकारच्या ज्ञानात संतुलन राखण्याचे काम आज्ञा चक्र करते. या चक्राची जागा दोन भंवयांच्या मध्यभागी कपाळावर आहे. या चक्रावर ध्यान करताना भ्रूमध्याच्या संवेदना बघायच्या आहेत. नंतर हळूहळू भ्रूमध्यापासून आत डोक्याच्या मागील भागापर्यंतच्या संवेदना बघायच्या आहेत. या ठिकाणी मोठ्या मेंदूचे उजवा आणि डावा भाग एकत्र येतात. मेंदूचा डावा भाग हा आपल्या ज्ञानेंद्रियांद्वारे मिळविलेल्या संवेदनांसाठी - logical thinkingसाठी महत्वाचा आहे तर उजवा भाग हा आपली उस्फूर्तता (Intutive Power) नियंत्रित करतो. कलाकारांच्या मेंदूचा उजवा भाग अधिक कार्यक्षम असतो. उजवा मेंदू आणि डावा मेंदू यात संतुलन असणे अत्यंत आवश्यक असते. ज्यांच्या मेंदूचे हे दोन्ही भाग चांगल्या प्रकारे कार्यरत असतात आणि दोन्ही भागात संपर्क चांगला असतो ते अत्यंत कार्यक्षम असतात आणि योग्य निर्णय उस्फुर्ततेने घेऊ शकतात. मेंदूच्या दोन्ही भागात संपर्क साधण्याचे काम या दोन्ही भागांना जोडणारे चेतातंतू करतात हे लक्षात घेतले तर या चक्राचे महत्व लक्षात येईल. आपल्याला या चेतातंतूंना कार्यंवित करून मेंदूच्या या दोन्ही भागांचा समतोल साधायचा आहे. याच ठिकाणी आपली पिट्युटरी ग्लॅन्ड आहे. ही ग्लॅन्ड आपल्या सर्व अंत:स्त्रावी ग्रंथींच्या (Glands) स्रावांचे नियंत्रण करते. अंत:स्त्रावी ग्रंथी आपल्या भावभावना नियंत्रित करतात. म्हणूनही या चक्राचे महत्व आहे. 

ॐ च्या योग्य प्रकारे केलेल्या सततच्या उच्चारानेही हे चक्र भेदता येते. तिबेटियन संस्कृतीत या चक्राला म्हणजेच 'तिसऱ्या डोळ्याला' खूप महत्व आहे. 

हे चक्र अत्यंत प्रभावशाली आहे. केवळ हे चक्र कार्यंवित करून खालील सर्व चक्रे कार्यंवित करता येतात. म्हणूनच काही गुरु केवळ या चक्रावर ध्यान करून खालची चक्रे भेदण्यास उत्तेजन देतात. पण ही खूप वेळखाऊ प्रक्रिया आहे. मी त्याची शिफारस करणार नाही. 

आपण शेवटच्या चक्रासंबंधी म्हणजेच सहस्रारासंबंधी माहिती पुढील लेखात घेऊ. 

Monday, July 26, 2021

चक्रवर्ती सम्राट विक्रमादित्य दरबार

 Siddhling Bukka यांच्या फेसबुक वॉल वरून साभार


आजवरच्या इतिहासात अकबर महान शासक होता म्हणून त्याला एक उच्च दर्जाचा मोगल सम्राट म्हणून इतिहासात स्थान दिले गेले आहे.तो महान होता की त्याला महान बनवलं गेलं हा एक इतिहासाचा भाग असू शकतो.त्याला महान बनवण्यासाठी त्यांने स्थापन केलेल्या "दिन ए ईलाही" या त्याकाळी अकबराने स्थापन केलेल्या पंथाची खूप चर्चा होते पण आज त्या पंथाची शिकवण घेऊन कोण अनुसरण करतो हे पाहणेच एक औचित्याचा ऐतिहासिक मुद्दा ठरु शकतो.अकबराच्या नवरत्नांनी पूर्ण इतिहास भरला गेला आहे, परंतु शालेय पाठ्यपुस्तकांत महाराजा विक्रमादित्यच्या नवरत्नांची चर्चा कोठेच होत नाही.

सत्य हे आहे की अकबर महान असल्याचे सिद्ध करण्यासाठी इतिहासात काही बुध्दीजीवी पत्रकार कम इतिहासकारांनी असे लिहिले होते की अकबरनेही महाराजा विक्रमादित्यचे अनुकरण करून नऊ रत्न ठेवले होते.पण हे सांगताना कोठेही चक्रवर्ती सम्राट विक्रमादित्य यांचं नाव कुठेही मुखपृष्ठावर येवू नये इतकी मात्र दक्षता घेतली गेली आहे...
महान चक्रवर्ती सम्राट राजा विक्रमादित्य यांच्या दरबारातील ही नवरत्न कोण होती हे जाणून घेण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे केला तर त्यांची नावे आजही इतिहासाच्या एका मळक्या पण तेजस्वी पानावर नक्कीच आढळतील.
राजा विक्रमादित्यच्या दरबारात नवरत्नांबद्दल बरेच काही वाचले आणि पाहिलेले आहे.पण हे नवरत्न कोण होते हे फार कमी लोकांना माहिती आहे.
राजा विक्रमादित्यच्या दरबारात असलेल्या नवरत्नांमध्ये कवी, विद्वान, गायक आणि गणिताचे महान अभ्यासक समाविष्ट होते, ज्यांची किर्ती त्याकाळी पूर्ण जगात चर्चिली जायची‌.चला कोण आहे ते जाणून घेऊया.....

१) धन्वंतरी.....
त्यांचे स्थान नवरत्नांमध्ये गणले गेले आहे. त्यांनी लिहिलेली नऊ पुस्तके आहेत.ही सर्व पुस्तके आयुर्वेद,वैद्यकीय विज्ञान याच्याशी संबंधित आहेत.ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महान शल्यचिकित्सकाबरोबर एक विद्वान होते.आजही जर एखाद्या डॉक्टरची स्तुती करायची असेल तर त्याची तुलना 'धन्वंतरी' अशी केली जाते.
२) क्षपणक.....
ह्यांच्या नावाप्रमाणेच हे एक बौद्ध भिक्षू होते.यांचे असलेले दरबारातील स्थान लक्षात घेता एक गोष्ट आजही सिद्ध होते की प्राचीन काळात मंत्रीपद हे उपजीविकेचे साधन नव्हते, तर जनकल्याणाच्या भावनेने मंत्री परिषद स्थापन केली गेली होती. हेच कारण आहे की त्याकाळात एक साधा संन्यासी देखील मंत्रिमंडळातील सदस्य होते.त्यांनी काही ग्रंथ लिहिले ज्यात केवळ 'भिक्षाटन' आणि 'नानार्थकोश' उपलब्ध आजही उपलब्ध आहेत.
३) अमरसिंह.....
हे एक महान विद्वान होते.बोधगया येथील सध्याच्या बुद्ध विहारात मिळालेल्या शिलालेखाच्या आधारे त्यांनी ते विहार निर्माण केले होते.त्यांच्या अनेक ग्रंथापैकी 'अमरकोश' हा एकमेव ग्रंथच त्यांचे असलेले श्रेष्ठत्व सिद्ध करते. संस्कृत पंडितांच्या मते 'अष्टाध्यायी' हा ग्रंथ जर पंडितांची आई आहे तर 'अमरकोश' हा ग्रंथ पंडितांचा जनक किंवा पिता आहे.म्हणजेच, जर कोणीही या दोन ग्रंथांचे वाचन पठन मनन केलं तर तो महान संस्कृत विद्वान होऊ शकतो.
४) शंखु......
यांनी लिहिलेल्या 'भुवनाभूडयम' हा त्यांचा एकमेव काव्य मजकूर खूप प्रसिद्ध आहे. पण आजही ते काव्य पुरातत्व शास्त्राचा एक विषय बनलेले आहे.त्यांचा उल्लेख संस्कृतचे एक महान अभ्यासक केला जातो.
५) वेताळभट्ट........
विक्रम आणि वेताळची गोष्ट तर आज खूप जगप्रसिद्ध आहे.त्या 'वेताळ पंचविशी' किंवा 'सिंहासन बत्तीशी' चे हेच जन्मदाते होते. पण आज त्यांचे नाव कुठेही ऐकायला मिळत नाही.सम्राट विक्रमादित्य यांच्या नेतृत्वाचा वेताळभट्ट यांच्यावर किती मोठा पगडा होता हे लक्षात येईल. त्यांनी लिहून अजरामर केलेला 'वेताळ-पचिसी' किंवा 'सिंहासन बत्तीशी' ही एकच आवृत्ती आज आपणाला पहायला मिळते.
६) घटखर्पर......
ज्यांना संस्कृत समजतं त्या व्यक्तीला सहज समजू शकते की 'घटखर्पर' हे एखाद्या व्यक्तीचे नाव असूच शकत नाही.हे त्यांचे खरे नाव देखील नाही.अशी मान्यता आहे की त्यांनी अशी प्रतिज्ञा केली होती की जी कुणीही व्यक्ती किंवा कवी त्यांना अनुप्रास आणि यमक या कवितेच्या प्रकारात हरवू शकेल किंवा पराभूत करेल, त्यांच्या घरी तुटलेल्या खापरीने घटखर्पर आजीवन पाणी भरायला राहतील. पण त्यांची प्रतिज्ञा आजन्म तशीच राहिली म्हणजे त्यांना कुणीही पराभूत करुन शकले नाहीत. तेव्हापासून त्यांचे नाव 'घटखर्पर' प्रसिद्ध झाले आणि मूळ नाव नाहीसे झाले.
'घटखर्पर काव्यम' असे त्यांच्या रचनेचे नाव आहे. हे काव्य यमक व अनुप्रास यावरचे एक अतुलनीय ग्रंथसंपदा म्हणून प्रसिद्ध आहे.
त्यांचा आणखी एक ग्रंथ 'नितीसार' या नावाने ओळखला जातो.
७) कालिदास.......
यांचं नाव पूर्ण भारतात कुणी ऐकलं नसेल असं होवूच शकत नाही.असे मानले जाते की कालिदास सम्राट विक्रमादित्यचे लाडके कवी होते. राजा विक्रमादित्य यांच्या व्यक्तिमत्त्वाचेच उज्ज्वल रूप त्यांनी आपल्या ग्रंथातही चित्रित केले आहे. कालिदास यांच्यावर देवी सरस्वती कृपावंत होती असेच म्हणावे लागेल. त्यांच्या सारखा रचनाकार या भारतभूमी वर परत कुणी झाला नाही. त्यांची चार काव्य आणि तीन नाटकं प्रसिद्ध आहेत. अभिज्ञान शाकुंतल, मालविकाग्निमगत्र, विक्रमोवर्शीय ही तीन नाटके आणि ऋतूसंहार, मेघदूत रघूवंश, कुमारसंभवम् हे त्यांचे काव्य आजही श्रेष्ठ आहे
८) वराहमिहिर.....
भारतीय ज्योतिष शास्त्रानुसार यांचे स्थान आजही श्रेष्ठ आहे त्यांनी अनेक ग्रंथसंपदा लिहिली आहे. त्यापैकी - 'बृहज्जातक', 'सूर्यसिद्धांत', 'बृहस्पति संहिता', 'पंचसिद्धांत' हे मुख्य आहेत. 'गणक तरंगिणी', 'लागू-जातक', 'समस संहिता', 'विवाह पटल', 'योग यात्रा' इत्यादी ग्रंथाचा उल्लेख केला जातो.
त्यांचीच रचना असलेली दिल्ली येथील मेहरोली या भागातील सूर्यघड्याळ आणि इतर भौगोलिक रचना तसेच दिल्लीतील प्रसिद्ध जंतर मंतर हे त्यांच्याच काळात बांधण्यात आले आहे.
९) वररूची.......
महाकवी कालिदास यांच्याप्रमाणे वररुची यांचीही गणना एक श्रेष्ठ कवींमध्ये केली जाते.त्यांनी लिहिलेल्या 'सदुक्तिकर्णामृत', 'सुभाषितावली' आणि 'शारंगधर संहिता' ही त्यांची रचना म्हणून गणली जाते.
पण त्यांच्या नावावर मतभेद आहेत. कारण या नावाने तीन व्यक्ती इतिहासात प्रसिद्ध आहेत, त्यापैकी-
१. पाणिनी या व्याकरणावर आधारित ग्रंथाचे लेखक - वारुची कात्यायन,
२. प्राकृत प्रकाश या ग्रंथांचे रचनाकार - वररुची
३. सूक्त या ग्रंथांचे रचनाकार- वररुची
असा हा भारतवर्षातील एक महान योध्दा चक्रवर्ती सम्राट विक्रमादित्य यांचा दरबार....

Saturday, July 24, 2021

जर्सी गाय

संदर्भ  फेसबुक   "कृषिधन - संगत रानातल्या ऊन वाऱ्याशी "
भारतीय देशी गाय व विदेशी जर्सी काउ मधील फरक

मुळामध्ये cow ह्या इंग्रजी नावाने फार मोठा वैचारीक गोंधळ सर्वांचा करुन ठेवलेला आहे. युरोपमधे दुध देणारया जर्सी ,होल्स्टेन फ्रीजीयन या प्राण्यांस इंग्रज लोक cow म्हणत.भारतात आल्यावर त्याना त्यांच्या काउ सारखी थोडीफार दिसणारी चार पायांची दूध देणारी भारतीय गाय दिसली.म्हणुन त्यानी आपल्या देशी गायीलाही" काउ " असे संबोधले.तत्कालीन आपल्या विद्वान भाषांतर करणारयाने "cow चे मराठीत गाय "असे भाषांतर केले.तिथुन पुढे वैचारीक गोंधळाला सुरुवात झाली.आपण लहान पणापासुन काउ ला म्हराठीत गाय म्हणतात असेच शिकत आलो आहे .त्यामुळे या दोंहोतील फरक लक्षात येत नाही.
गायींचे मुळ स्थान भारत देश आहे.गायीला प्राचीन काळापासुन संस्कृत मधे गौ हिंदीमधे गैया तर मराठीत गाय असे आपल्या देशात संबोधले जाते.प्राचीन काळी आपला इंग्रजांशी काही संबंध नसल्यामुळे गायीला इंग्रजी नाव देण्याचा प्रश्न कधी उद्भवला नव्हता .
बाह्य अंगाने morphologically पाहीले असता विदेशी काउ -- जर्सी , होल्स्टेन फ्रीजीयन आणी भारतीय देशी गाय
यांच्यामधे प्रचंड फरक आहे.
देशी गायीला वशींड hump असते तर विदेशीला वशींड नसते.देशी गायीच्या वशींडामधे सुर्यकेतु नावाची नाडी असते.या नाडीच्या सहायाने ति सुर्यापासुन येणारी सुर्यतत्वे स्वर्णक्षार शोषून घेते.त्यामुळे देशी गायीच्या दूधात तुपात व गोमुत्रात सुर्यतत्वाचे प्रमाण अधिक असुन ते औषधी असते.देशी गायीचे गोमुत्र जगातील महान औषधी मानले जाते ,गोमुत्राच्या कॅनसरवरील प्रभावी औषधी उपयोगामुळे त्यास अमेरिकेचे पेटंट मिळाले आहे (क्र.6410056).
कासवापासुन ते हत्तीपर्यंत फक्त आणी फक्त भारतीय देशी गायीच्या पाठीला वशींड असते.
देशी गायीचा चेहरा ज्याप्रमाणे आई आपल्या मुलाकडे प्रेमाणे पाहते तसा स्नेहमयी प्रेमळ असतो.तर विदेशी जर्सीचा चेहरा भेसुर भयानक असतो.
देशी गायीच्या शरीराची कधीच दुर्गंधी येत नाही .देशी गायीच्या शरीरातुन आयुर्वेदिकदृष्ट्या गुग्गुळाचा सुगंध येतो असे म्हटले जाते.तर विदेशी जर्सीच्या शरिराचा अतिशय घाणेरडा वास येतो यांच्या गोठ्याच्या लांबुनच हा घाणेरडा वास अनुभवास येतो.
देशी गायीचे शरीर अटोपशीर असते तर विदेशीचे शरीर ओबडधोबड असते.
देशी गाय झोपताना देखील अटोपशीर झोपते.कधीही भेसुरपध्द्तीने पाय वर करुन झोपत नाही.विदेशी जर्सी मात्र डुकराप्रमाणे पायाला तणावा देउन झोपते.
देशी गायीचे हंबरणे व विदेशी जर्सीचे हंबरणे यात मोठा फरक आहे.देशी वासरु हंबरताना त्यातुन" मा "असा ध्वनी प्रतीत होतो.
विदेशी जर्सीच्या शिळ्या दुधाचा व शेणाचा मशाळ fishy असा घाणेरडा वास येतो.
कोणत्याही जिद्न्यासु व्यक्तीने 5 मिनिट देशी गाय व विदेशी जर्सी समोर ठेउन निरिक्षण केले असता त्यास फार मोठा फरक जाणवेल .विदेशी जर्सी हा प्राणी डुकरापासुन जीनेटीक इजीनिअरींगने बनविला असा अनेक शास्त्रद्न्यांचा दावा आहे.डुक्कर एका वेळेस 10 ते 12 पिलाना जन्म देते.इतक्या मोठ्या संख्येने पिलाना सांभाळणारया डुकराची दुध उत्पादन क्षमता भरपुर असते.ते जीनस जर्सीमधे टाकल्याचा दावा केला जातो.
भारतीय देशी गाय व विदेशी जर्सी यामधील शास्त्रीय फरक
देशी गायीला Bos in dicus हे शास्रीय नाव आहे.तर विदेशी जर्सीला Bos taurus हे शास्रीय नाव आहे.या Bos जीनस मधे 6प्रकारचे वेगवेगळे प्राणी आहेत .
1.Bos indicus भारतीय देशी गाय
2.Bos gaurus गवा
3.Bos frontalis मिथुन
4.Bos mutus याक
5.Bos javanicus बेनटेंग
6.Bos taurus विदेशी जर्सी ,होल्स्टेन फ्रीजीयन इ. गायसदृश प्राणी .
वर दर्शविण्यात आलेले सर्व सहा प्रकारचे प्राणी त्यांच्या स्पेसिज वेगवेगळ्या असल्यामुळे एकमेकापासुन वेगळे आहेत.जर आपले शात्रद्न्य जर्सीला गाय म्हणत असतिल तर त्यानी याक मिथुन बेंटेंग याना देखील गाय म्हणावे अन्यथा ते सर्व वेगवेगळे प्राणी आहेत हे तरी मान्य करावे म्हणजे शेतकरयांची होणारी फसवणुक टळू शकेल.आज कित्येक शेतकरी हा फरक न समजल्यामुळे खरया देशी गायीएवजी जर्सीसारखे रोगकारक प्राणी गाय समजुन पाळत आहेत, त्यांचे विषारी मुत्र गोमुत्र समजुन पित आहेत,देशी गायीचा जर्सी बरोबर संकर करुन अनावधानाने देशीगायीच्या वंशाची हत्या करण्याच्या पातकामधे सहभागी होत आहेत.कित्येक मठ मंदिरान्मधे फरक न समजल्यामुळे देशी गायी एवजी जर्सी पाळली जात आहे.जो फरक वांगे व बटाटे , घोडा व गाढव , मांजर व वाघ यामधे आहे तोच फरक वरिल सहा प्रकारच्या प्राण्यान्मधे आहे.
Solanum melongena वांगे
Solanum tuberosum बटाटा.
जर उद्या एखादा उपटसुंभ शास्त्रद्न्य वांगे व बटाटा यांचा जिनस एक आहे म्हनुन ती दोनही एकच आहे असे समजुन संशोधन करु लागला तर गोंधळ उडुन जी शेतकरयाची समाजाची व राष्ट्राची हानी होइल नेमकी तीच हानी भारतीय देशी गायी व विदेशी जर्सी सारखे प्राणी याना एकच समजुन गेल्या 40 वर्षात कृषी संशोधकानी जे संकरीकरण घडवून आणले त्यामुळे झाली. अशा मुर्खपणामुळे अखंड भारत देशातील देशी गोवंश नाश पावून नामशेष होण्याच्या मार्गावर आला.एकेकाळी देशी गायीच्या दुधाने समृध्द असणारया देशात आता देशी गायीचे आयुर्वेदिक दुध औषधालाही मिळणे दुरापास्त झाले.जर्सीच्या दुधाने मधुमेह ह्रदयरोग कॅनसर या रोगांचे प्रचंड प्रमाण वाढले.
धक्कादायक बाब म्हणजे गेल्या आठ दशकात ब्राझील , अमेरिका ,ऑस्ट्रेलिया ,मलेशीया या देशानी भारतातुन देशी गायी नेउन त्यांचे शुद्ध रुपात उत्तम संवर्धन केले आहे.ब्राझीलमधे 60 लाख भारतीय गीर गायी आहेत. ब्राझीलच्या शास्त्रद्न्यानी गीर गायीची शुध्द रुपात उत्तम जोपासना करुन दिवसाला 64 लिटर इतके दूध उत्पादन साध्य केले आहे.ब्राझीलच्या एकुण दुध उत्पादनामधे भारतीय गीर गायीचा 80% वाटा असुन देशाची अर्थव्यवस्था भारतीय गायींच्या आधाराने उभी केली आहे.ब्राझील जागतिक बाजारात भारतीय गायी ब्राझीलीयन कॅटल नावाने विकत आहे.
त्यामुळे संकरीकरणावर बंदी आणून भारतीय देशी गाय वाचवणे काळाची गरज आहे.नाहीतर निसर्गाचा हा अनमोल ठेवा आपण कायमस्वरुपी गमावून बसू.

कुंडलिनी विद्या भाग १३

मागील लेखात आपण पहिल्या तीन चक्रांवर (मूलाधार, स्वाधिष्ठान आणि मणिपूर) ध्यान कसे करायचे याची माहिती घेतली. आता पुढील चक्रांकडे वळू. 

खालील तीन चक्रे म्हणजे मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र आणि मणिपूर चक्र ही आपल्या या जीवनातील गोष्टींशी संबंधीत आहेत. तर वरील तीन चक्रे म्हणजे विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्रार ही चक्रे दैवी गोष्टींशी संबंधित आहेत. अनाहत चक्र हे यामधील दोहोंचा सांधा जुळविणारे चक्र आहे. या दृष्टीने अनाहत चक्राचे महत्व आहे. प्राणाधारणा करताना आपण श्वासाचा उपयोग करतो हे आपल्याला माहीत आहेच. 

मणिपूर चक्राच्यावर हुदयाच्या पातळीत पाठीच्या कण्यात अनाहत चक्र आहे. या चक्रातून अनाहत नाद (कोठल्याही आघाताशिवाय निर्माण झालेला नाद) ऐकू येतो . हा नाद अत्यंत मधुर असा जाणवतो. हा नाद विश्वनिर्मितीचा नाद आहे असे मानतात. ख्रिश्चनिटी आणि सुफीझममध्येही या दैवी नादाला खूप महत्व दिलेले आहे. हे चक्र वायू या पंचमहाभूतांशी जोडले गेलेले आहे. दहा प्रकारचे जे वायू (प्राण, अप्पन, समन इत्यादी) आपल्या आयुर्वेदात सांगितले आहेत ते या चक्राशी संबंधित आहेत. हे वायू आपल्या शरीरातील सूक्ष्म ऊर्जा दर्शवितात. आपल्या भाव-भावना या वायूंवर अवलंबून असतात. हे चक्र आपल्याला योग्य-अयोग्य गोष्टींची पारख करण्याची शक्ती देते. म्हणजेच आपला विवेक जागृत करते. तुमच्या पुढील आयुष्यासाठी तुमची नीतिमूल्ये निश्चित करते. ही नीतिमूल्येच तुम्ही आता वरील चक्रांचे  भेदन करण्यास योग्य झालात का हे ठरविते आणि तशा तुम्हाला सूचना देते. ममता या चक्राशी संबंधित आहे.  आसपासचा निसर्ग आणि आपण एकाच असल्याची भावना हे चक्र भेदन केल्यावर निर्माण होते. हे चक्र आपल्या  रोगप्रतिकार शक्तीशीही संबंधित आहे.  या चक्राची व्याप्ती छातीपासून गळ्यापर्यंत आहे. या चक्रावर ध्यान करताना फुफ्फुसातील हालचाल स्पष्ट जाणवली पाहिजे. तसेच हृदयाची स्पंदने स्पष्टपणे कळली पाहिजेत. फुफ्फुसे आणि हृदय यांच्यातील संवेदना स्पष्ट कळल्यावर हृदयाच्या पातळीवर मणक्यात ध्यान करावे. अनाहत चक्र हे ऐहिक आणि दैवी चक्रांच्या मध्ये आहे. आपण या चक्राचा भेद केला की आपल्याला दैवी चक्रांचा भेद करत पुढे जायचे की पुनश्च ऐहिक चक्रांत जायचे हे ठरविण्याची एक संधी मिळते. काहीजण पुनश्च ऐहिक चक्रांत जाण्याचा निर्णय घेतात. अशा व्यक्तींना ऐहिक सुख भरपूर मिळते आणि ते त्यातच समाधानी असतात. 

अनाहत  चक्राच्या वर घशात विशुद्ध चक्र आहे. पंचमहाभूतांशी संबंधित असे हे शेवटचे चक्र. हे चक्र थायरॉईड ग्रंथीशी संबंधित आहे. थायरॉईड ग्रंथीचा आपल्या शरीरावर आणि मनावर किती मोठा परिणाम होतो हे आधुनिक विज्ञानही जाणते. पाठीच्या मणक्याचा शेवट जेथे होतो तेथे हे चक्र आहे. या दृष्टीने या चक्राचे महत्व आहे. या चक्रावर ध्यान केले असता गळ्यातून मेंदूत जाणाऱ्या रक्तप्रवाहाची स्पष्ट जाणीव होते. हे चक्र भेदण्याचा आणखी एक मार्ग आहे. जिभेच्या टोकाच्या संवेदना घेऊन हळू हळू जिभेच्या मागच्या टोकापर्यंत (पडजीभ) गेले की हे मागचे टोक घशाला चिकटलेले असते तेथपर्यंत संवेदना मिळविता येतात. हे चक्र आकाश तत्वाशी संबंधित असल्याने ते भेदले गेले की असीम शांततेचा अनुभव येतो. हे चक्र भेदले गेल्यावर आपले मन स्वार्थापासून मुक्त होते, विशाल होते, विशुद्ध होते. त्यामुळे मनाच्या अनेक आजवर अज्ञात राहिलेल्या शक्ती मोकळ्या होतात. हे चक्र आपल्या मेंदूला चालना देऊन बुद्धी तीक्ष्ण बनविते. हे चक्र अत्यंत शक्तिशाली असल्याने तसेच ते विशुद्ध स्वरूपात असल्याने ते पांढरा हत्ती (ऐरावत) या चिन्हाद्वारे दर्शविले जाते. (मूलाधार चक्र हे काळ्या हत्तीच्या चिन्हाद्वारे दर्शविले जाते. ही हत्तीद्वारे दर्शविलेली प्रचंड ऊर्जा आता शुद्ध स्वरूपात उपलब्ध झाली आहे हा त्याचा अर्थ आहे.) हे चक्र आकाश तत्वाशी संबंधित आहे. आकाश तत्व हे सर्वात सूक्ष्म तत्व आहे. ते तत्व वाणीशी संबंधित आहे. ऐकणे आणि आवाज काढणे या दोन्ही क्रियांशी संबंधित आहे. म्हणूनच हे चक्र भेदले गेल्यावर आवाज मृदू बनतो, आवाजात एक प्रकारची संमोहन शक्ती येते. हे चक्र भेदले गेल्यास निरनिराळे हार्मोन्स स्रवण्यात झालेल्या बदलामुळे दाढीमिशांचे आणि अंगावरील केस झपाट्याने वाढू लागल्याचाही अनुभव येतो. (हिमालयात काही व्यक्तिंना अंगावर भरपूर केस असलेले साधू भेटल्याचे आपण कधीकधी वाचतो.) अनाहत चक्र भेदले गेल्यावर आनंदाचा झरा आपल्या मनात वाहू लागतो. आपल्याला समाजासाठी काही कार्य करण्याची प्रेरणा मिळते. मणिपूर अथवा स्वाधिष्ठान चक्रातूनही कार्याची प्रेम मिळते. पण ही स्वाधिष्ठान चक्रातून मिळणारी प्रेरणा ही संपूर्ण स्वार्थविरहीत असते. या एकाच गोष्टीवरून आपण एखाद्याचे विशुद्ध चक्र भेदले गेले आहे काय याचा अंदाज बांधू शकतो. हे चक्र भेदले गेल्यावरच माणूस परमेश्वरापुढे संपूर्ण नतमस्तक होऊ शकतो. हे चक्र अनेक सिद्धींचे माहेरघर आहे. अर्थात सिद्धीच्या मागे लागून कधीही साधना करता येत नाही. हे चक्र ध्वनीशी संबंधित असल्याने बीजमंत्राच्या (हं) उच्चारणाचा हे चक्र भेदण्यास खूप उपयोग होतो. 

पुढील दोन चक्रांसंबंधी जाणून घेऊ पुढील लेखात. 

Wednesday, July 21, 2021

कुंडलिनी विद्या भाग १२

 मागील लेखात सांगितल्याप्रमाणे कुंडलिनी  विद्या आत्मसात करण्याचा हा तिसरा टप्पा खूप सोपा आहे. फक्त पहिले दोन टप्पे नीट आत्मसात केले पाहिजेत. त्यासाठी पुरेसा वेळ आणि संयम ठेवता आला पाहिजे. 
या सात चक्रांच्यामधील सर्वात खालचे चक्र म्हणजे मूलाधार चक्रापासून या ध्यानाला सुरुवात करा. पायाच्या बोटांपासून कमरेपर्यंत सर्व अवयवांची संवेदना बघा. गुदद्वाराची संवेदना बघा. गुदद्वाराच्या आत जेवढे शक्य आहे तेथपर्यंत मोठ्या आतड्याच्या संवेदना पहा. त्यानंतर पाठीच्या शेवटच्या मणक्याची संवेदना बघा. काही दिवस अशा प्रकारे ध्यान केल्यावर आपण या चक्राचा मंत्र  (लं )ऐकत अथवा म्हणत ध्यान करू शकता. या चक्राचा रंग डोळ्यापुढे आणू शकता. या चक्राचे ज्ञानेंद्रिय नाक असल्याने वासावर ध्यान करू शकता. आपल्याला या चक्रावर ध्यान करण्यासाठी अनेक प्रकार उपलब्ध आहेत. आपल्या व्यक्तिमत्वाला योगय वाटेल अशा प्रकाराने हे ध्यान करता येईल. प्रत्येक चक्राचा  मंत्र आणि अन्य माहिती इंटरनेटवर अनेक ठिकाणी उपलब्ध आहे. मला श्री. कमल नारायण सीठा (https://www.youtube.com/watch?v=qxonnL0UMeU) यांचे youtube वरील लेक्चर ऐकत ध्यान करणे छान वाटले. आपल्या व्यतिमत्वाला साजेसे youtube lecture आपल्याला शोधावे लागेल. 

या चक्राच्या ठिकाणाहून आपणास पुरेशा संवेदना मिळू लागल्या की पुढील चक्राकडे जावे. एक चक्र भेदण्यास काही महिने लागतात. घाई करू नये. 

त्यानंतरचे चक्र स्वाधिष्ठान चक्र आहे. आपली लैंगिक इंद्रिये ते साधारण बेंबीच्या थोडे खालपर्यंत या चक्राची व्याप्ती आहे. या भागातील संवेदना घेऊन लैंगिक इंद्रियांच्या किंचित वरच्या पातळीत पाठीच्या कण्यात संवेदना घ्याव्यात. मूलाधारचक्राप्रमाणेच या चक्राचे ध्यान करावे. 

या नंतर मणिपूर चक्र आहे. साधारण बेंबीच्या पातळीवर पाठीच्या मणक्यात हे चक्र आहे. बेंबीपासून छाती सुरु होईपर्यंतचा भाग या चक्राच्या कक्षेत येतो. बेंबीच्या आसपासचा भाग आपल्या शरीराचा महत्वाचा भाग आहे.  संवेदना नीटपणे मिळविणे अत्यंत आवश्यक आहे. पोटातील आतडी, जठर आणि अन्य इंद्रिये या चक्राच्या कक्षेत येतात. 

या नंतरची चक्रे पुढील लेखात. 

Saturday, July 17, 2021

कुंडलिनी विद्या भाग ११

आता आपण या लेखमालेच्या तिसऱ्या टप्प्याला - कुंडलिनी ध्यानाला - सुरुवात करीत आहोत. यापूर्वी अनेक गुरूंनी आधीचे पूर्वतयारीचे दोन टप्पे गृहीत धरून हे कुंडलिनी ध्यान शिकविण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे कुंडलिनी ध्यान हे काहीतरी गहन आणि कठीण गोष्ट आहे अशी कल्पना जनमानसात रूढ झाली आहे. खरे तर पहिले दोन टप्पे मनापासून घाई न करता पार केले तर हा तिसरा टप्पा खूपच सोपा आहे. आपल्या हे लक्षात आले असेल की पहिले दोन टप्पे आत्मसात करणे फार कठीण नाही. त्यातील प्रत्येक टप्पा हा समजण्यास सोपा आहे. मात्र संयम हवा, येथे घाई अजिबात चालणार नाही. 

आधी सांगितल्याप्रमाणे कुंडलिनी ध्यानात काही चक्रांची संकल्पना केलेली आहे. ही चक्रे म्हणजे प्रत्यक्षातली चक्रे नसून आपले महत्वाचे चेतातंतू पाठीच्या मणक्यातून जेथून निघतात त्या जागा. हे चेतातंतू शरीराच्या काही महत्वाच्या अवयवांत जातात. तसेच त्यांचे दुसरे टोक मेंदूमध्ये जाते. हे दुसरे टोक मेंदूत जेथे जाते तेथे आपल्या मनाच्या काही घडामोडींवर नियंत्रण करणारी केंद्रे असतात. त्यामुळे या चक्रांवर ध्यान केले असता त्या विशिष्ट अवयवांवर तसेच मानसिकतेवर चांगला परिणाम होतो. मात्र आपण प्रत्यक्ष चेतातंतूंना कार्यक्षम करीत असल्याने हे ध्यान शांतपणे करावे लागते. घाईघाईत केल्यास वाईट परिणामही होऊ शकतो.

कुंडलिनी शास्त्रानुसार आपल्या शरीरात अशी अनेक चक्रे कल्पिलेली आहेत. मात्र यातील सात चक्रे महत्वाची आहेत. ही चक्रे खालपासून डोक्यापर्यंत क्रमाक्रमाने भेदत जायचे आहे. हा क्रमही महत्वाचा आहे. प्रत्येक चक्र भेदले जाताना आपल्या काही आंतरिक शक्ती/सिद्धी जागृत होतानाही कदाचित जाणवतील. सिद्धी प्राप्त झाल्याचे लक्षात आले तरी त्याकडे दुर्लक्ष करून त्याची वाच्यता कोणाकडेही न करणेच इष्ट. मग सिद्धींचे प्रदर्शन ही तर खूप दूरची गोष्ट झाली. या सिद्धी म्हणजे तपोभंग करणाऱ्या अप्सरांसारख्या मानल्या गेल्या आहेत. या सिद्धींमध्ये आपण गुंतून पडलो तर पुढील साधनेत खंड पडतो. आपला अहंकार जागृत होऊन आपण साधनेतून भ्रष्ट होऊ शकतो. आपली नजर आपल्या अंतिम उद्दिष्टावर असली पाहिजे. 

कुंडलिनी ध्यानासंबंधी आणखी काही जाणून घेऊ पुढील लेखात. 

Wednesday, July 14, 2021

कुंडलिनी विद्या - भाग १०

 आपण या लेखात विपश्यना ध्यानाच्या थोडे खोलात शिरू. 
विपश्यना ध्यानासाठी प्रथम एका पायाच्या अंगठ्यापासून सुरुवात करून एक एक बोट करत सर्व बोटे, तळपाय, पाऊल, घोटा, पोटरी, गुढगा. मांड्या, पृष्ठभाग अशा क्रमाने त्या पायातील संवेदना बघाव्या. नंतर दुसरा पाय बघावा. अशाच क्रमाने डोक्याच्या वरच्या बिंदूपर्यंत (टाळू) संवेदना बघाव्या. शरीराचा एकही भाग सुटता काम नये. या संवेदना बघताना मनाची स्थिरता महत्वाची  आहे. एखादी संवेदना परत व्हावी अशी अपेक्षा करावे अथवा एखादी संवेदना होऊ नये अशी अपेक्षा करणे यामुळे एकाग्रता भंग पावेल. विपश्यना होणार नाही. 
सर्व शरीराच्या संवेदना जाणवू लागल्या की शरीराच्या आतील संवेदनांची नीट जाणीव घ्यावी. यासाठी शरीराला छेदून जाणारी पद्धत वापरावी. म्हणजे छातीपासून सुरु करून शरीराच्या आतून पाठीपर्यंत संवेदना अनुभवाव्यात. तोंडाच्या आत जिभेच्या टोकापासून सुरुवात करून जिभेच्या दुसऱ्या टोकापर्यंत (पडजीभ) जावे. नंतर वरील बाजूला असलेल्या सर्व दातांच्या संवेदना अनुभवाच्या. मग खालील सर्व दातांच्या. तसेच डोळे, कान इत्यादी अवयवांच्या संवेदना आतून अनुभवाव्या. आपल्याला या स्पर्शाच्या संवेदनेबरोबरच आवाज, गंध, चव इत्यादी संवेदनांवरही ध्यान करायचे आहे. 

जर विपश्यना सुरु असताना मन विचलित होत आहे असे जाणवले तर काही काळ प्राणधारणेकडे यावे आणि मन स्थिर झाले की परत विपश्यना सुरु करावी. 

विपश्यनेच्या प्रगती झाली की संपूर्ण शरीरात रक्ताचा प्रवाह जाणवू लागेल. संपूर्ण शरीरात एकाच प्रकारची सुखद संवेदना जाणवू लागेल. संपूर्ण शरीर एकाच प्रकारे कंपन पावते आहे असे जाणवू लागेल. आपल्या विपश्यना ध्यानाची या पातळीपर्यंत प्रगती झाली की कुंडलिनी ध्यानाला सुरुवात करायची आहे. 
काहींना हा खूपच दूरचा पल्ला वाटेल. पण आपण नित्य नियमाने रोज ध्यान करू लागलो तर काही महिन्यांत अथवा वर्षात हा पल्ला गाठणे कठीण नाही. येथे सातत्य महत्वाचे आहे. काही जण मागील जन्मात खूप साधना करून आलेले असतात. अशांची प्रगती एका विशिष्ट टप्प्यापर्यंत अत्यंत वेगाने होते. कारण त्यांनी हा टप्पा मागील जन्मात गाठलेला असतो. परंतु आपण कोठल्या टप्प्यावर आहोत हे ध्यानाला सुरुवात केल्यावरच कळू शकते. म्हणूनच ही साधना खूप जटील, दूरवरची वाटत असली तरी कदाचित आपण यात पूर्वजन्मीच प्रगती केलेली असेल. जरी या जन्मी आपण उद्दिष्टांपर्यंत पोचू शकलो नाही तरी पुढील जन्मी आपल्याला त्याचा फायदा होऊ शकेल. 

सातत्य आणि मनाची स्थिरता ही विपश्यना ध्यानात प्रगती करण्याची गुरुकिल्ली आहे. 

पुढील लेखात आपण कुंडलिनी ध्यानासंबंधी माहिती घेऊ. 

Monday, July 12, 2021

कुंडलिनी विद्या भाग ९

तुम्ही ध्यानाचा पहिला टप्प्यामध्ये म्हणजेच प्राणधारणेमध्ये गेल्या एका महिन्यात प्रगती केली असेल असे मी मानतो.  प्राणधारणेमुळे आपल्याला खूप शांतता अनुभवायला आली असेल. मनातील सतत चालणारे अनावश्यक  विचारांचे चक्र मंदावले असेल. शांत झोप लागत असेल. कौटुंबिक पातळीवर, कामाच्या ठिकाणावर आणि अन्य लोकांसोबतच्या संबंधात सुधारणा झाली असेल. ध्यानाला सुरुवात केल्यावर ताबडतोब दिसून येणारे हे फायदे आहेत. अर्थात आपले मुख्य उद्दिष्ट अजून खूप पुढे आहे. आपल्याला अजून खूप मार्गक्रमणा करायची आहे. पण या प्रवासातला आनंद मनमुराद उपभोगायचा आहे. आपल्याला एक महिना प्राणधारणा करूनही  हे फायदे अनुभवाला येत नसतील तर प्राणाधारणा करताना आपली कोठेतरी चूक होते आहे हे निश्चित. अशा व्यक्तींनी माझ्याशी कॉमेंटमधून अथवा मेसेज बॉक्सतर्फे संपर्क साधावा. 

आता आपण दुसऱ्या टप्प्याकडे निघालो आहोत. हा टप्पा विपश्यना ध्यानाचा आहे. मागील लेखात लिहिल्याप्रमाणे आपण पहिल्या टप्प्यात आपल्या ध्यानाचा पाया मजबूत केला. कमकुवत असलेला पायाच खचला तर त्यावर अगदी भक्कम बांधलेली इमारतही कोसळते. म्हणून मजबूत पाया सर्वात महत्वाचा.  आता भिंती, छप्पर उभे करायचे आहे. वादळात छप्पर उडून जाता कामा नये. एखादा भूकंपाचा धक्का बसला तरी भितींना तडे जात काम नयेत. कोठल्याही मानसिक वादळात अथवा मोठ्या मानसिक धक्क्यात आपण उन्मळून पडू नये असे आपले ध्यान असले पाहिजे. हेच काम विपश्यना करणार आहे. 

आपण या लेखात विपश्यना ध्यानचं विवेचनाचा सुरुवात करू. 'वास्तवाचा संपूर्ण स्वीकार' अशी ध्यानाची एक व्याख्या करता येईल. विपश्यना ध्यानात जाण्यासाठी आपले शरीर हे एक माध्यम म्हणून काम करते. आपल्या शरीराला पंचेंद्रियांद्वारे विविध संवेदना जावणतात, मनात विचार येतात. या सर्वांचा संपूर्ण स्वीकार म्हणजे विपश्यना ध्यान. 

विपश्यना ध्यानाला सुरुवात करण्यापूर्वी रोज किमान दहा मिनिटे प्राणधारणा  करावी. नंतर कोणत्याही एका पायापासून सुरुवात करावी. प्रथम पायाच्या अंगठ्याला  काय संवेदना मिळत आहेत ते पाहावे. कदाचित कसला स्पर्श जाणवत असेल, कदाचित काही वेदना जाणवत असेल अथवा अन्य काही संवेदना असेल. ही संवेदना नीट जाणून घ्या. मात्र या संवेदनेबद्दल नकार नको. म्हणजेच समाज वेदना असेल तर ती कधी जाईल या संबंधी विचार नको. जे आहे त्याचा स्वीकार करून दुसऱ्या बोटाकडे जावे. त्या पायाची सर्व बोटे, तळपाय, पाऊल, घोटा अशा क्रमाने संपूर्ण पायाच्या संवेदनांकडे बघावे. मग दुसऱ्या पायाच्या संवेदनांकडे बघावे. अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने संपूर्ण शरीराच्या संवेदना जाणून घ्याव्यात. एकही अवयव अथवा शरीराचा लहानात लहान भागही यापासून सुटता कामा नये. पायापासून डोक्यापर्यंत संवेदना जाणून झाल्यावर उलट्या क्रमाने डोक्यापासून पायापर्यंत संवेदना जाणून घ्याव्यात. नंतर परत पायापासून डोक्यापर्यंत अशाप्रकारे हे ध्यान रोज किमान एक तास करावे. 

या सर्व ध्यानात मनाची स्थिरता महत्वाची आहे. कोणत्याही संवेदनेबद्दल अभिलाषा (ही संवेदना मला सारखी होत राहो) अथवा द्वेष (ही संवेदना कधी जाईल) नको. विपश्यनेबद्दल अधिक जाणून घेऊ पुढील लेखात. 

Friday, July 9, 2021

कुंडलिनी विद्या भाग ८

 एका लहानश्या मध्यंतरानंतर आपण परत या लेखमालेला सुरुवात करत आहोत. 

आपण सगळ्यांनी प्राणधारणेला सुरुवात केली  असेल. प्राणधारणा हा कोठल्याही ध्यानप्रकाराचा पाया आहे. रोज एक तास किमान एक महिना प्राणाधारणा केल्याशिवाय पुढील टप्प्याला सुरुवात करू नका. कुंडलिनी ध्यान हे शरीर-मन यात संवाद निर्माण करते. आपली चेतासंस्था (Nerves System) जागृत करते. म्हणूनच हे ध्यान करताना अत्यंत सावकाश टप्प्याटप्प्याने पुढे जायचे आहे. घाई केलीत तर शरीर-मनाला इजा होऊ शकते.  

प्राणधारणा हा पाया पुरेसा भक्कम झाल्यावर आपल्याला त्यावर बांधकामाला सुरुवात करायची आहे.  बांधकाम क्षेत्रात असलेल्यांना माहीत असेल, घराच्या बांधकामाचे तीन  प्रमुख टप्पे असतात. पाया हा पहिला टप्पा , भिंतीच्या-छत वगैरेचे बांधकाम हा दुसरा टप्पा आणि  फरशा  बसविणे, प्लम्बिंग-वायरिंग, रंगरंगोटी आणि बाकीची सजावट हा  झाला तिसरा टप्पा. तसेच या कुंडलिनी ध्यानातही तीन प्रमुख टप्पे आहेत. दुसरा टप्पा हा 'विपश्यना ध्यानाचा' आहे. विपश्यना  ध्यानाची पद्धत अत्यंत प्राचीन आहे. वेदांत तिचे उल्लेख आहेत. परंतु विपश्यना ही गुरूच्या सानिध्यातच शिकविली जात असल्याने तिचे विस्तृत वर्णन वेदात  नाही. गौतम बुद्धाने अत्यंत परिश्रमाने या विद्येच्या  बारकाव्यांचा शोध घेतला आणि सामान्य लोकांना ती शिकविण्यासाठी नियोजनबद्ध अभ्यासक्रम तयार केला. गोएंका गुरुजींच्या विपश्यना शिबिरांत (http://www.dhamma.org) विपश्यना विद्या या गौतम बुद्धाने आखून दिलेल्या पद्धतीने शिकविली  जाते. मी ही गोएंका गुरुजींच्या विपश्यना केंद्रात  प्रत्येकी दहा दिवसांची नऊ शिबीरे केली आहेत. आजवर मी कोणालाही विपश्यना शिकविण्याचे टाळत होतो. कारण हा विषय त्या शिबीरातच चांगला शिकविला जातो आणि समजतो असे .मला वाटते. पण सध्याच्या करोनाच्या संकटात शिबिरांत जाऊन ही विद्या शिकणे कठीण आहे. तसेच अनेकांना लॉकडाउन काळात मानसिक अस्थैर्याला तोंड  द्यावे लागत आहे. त्यांना ताबडतोब मदतीची गरज आहे. म्हणून मी हा विषय इंटरनेट माध्यमातून शिकवायला घेतला आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी  जमेल तेव्हा या शिबिरांत जाऊन यावे असे मी सुचवेन. 

यानंतर तिसरा टप्पा हा घराच्या सुशोभीकरणाचा म्हणजेच कुंडलिनी ध्यानाचा असेल.