Monday, March 25, 2024

मृत्यू : खलिल जिब्रान


'तुम्हाला खरंच मृत्यूचे रहस्य
जाणून घ्यावयाचे आहे?
जोपर्यंत तुम्ही
तुमच्या काळजाच्या तळापासून
त्याचा शोध घेत नाही,
तोपर्यंत मृत्यूचे सौंदर्य व महात्म्य
तुम्हाला कसं समजू शकेल?
रात्री घुबडाला सारे काही दिसते.
पण दिवसा मात्र...
तो आंधळा असतो.
त्याला प्रकाशाची गुढता समजेल?
तुम्हाला जर खरोखर
मृत्यूचे अंतरंग जाणून घ्यायचे असेल,
तर तुम्ही तुमचे ह्रदय
जीवनासमोर संपूर्ण उघडे करा!
एक लक्षात घ्या,
नदी आणि समुद्र एकच असतात.
त्याचप्रमाणे जीवन आणि मृत्यू
एकच आहेत.
एकाच नाण्याच्या दोन बाजू!
तुम्हाला जर मृत्यूला जाणवायचं असेल,
तर त्यासाठी जीवनाला
नीट जाणून घ्यावं लागेल.
आपण सगळ्यांनी
एकमेकांना धरून राहायला हवे.
आपली मानसिकता बदलून
आपण हे समजून घ्यायला हवे की,
जन्म आणि मृत्यूच्या पलीकडे
अथांग, अनंत असे काहीतरी आहे.
त्यासाठी आपल्याला
अफाट असे परिश्रम घ्यावे लागतील.
आपणा सर्वांना
मृत्यू हा गाठणार आहेच.
म्हणून म्हणतो,हे दु:ख असतानाच
त्याला नीट समजून घ्या.
ते पुढे ढकलू नका.
तुम्ही विमनस्क असतानाच
त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग
तुम्ही समजून घ्या.
त्या दु:खांला,
तुमचे काळीज कुरतडण्याची,
संधी देऊ नका.
एकटेपणामुळे तुमचे हास्य
लोप पावू देऊ नका.
त्याने वेदना झाली तरीही
मनापासून ते सगळे समजून घ्या.
तुमच्या मनातून
एकटेपणा,दु:ख काढून टाका.
तुम्ही स्वतःचे मन तपासून पहा.
तेव्हाच तुम्हाला कळेल की,
'मी'पणाच्या जाणिवेतून
मुक्त झाल्यावरच
आपल्याला जन्म आणि
मृत्युच्या पलीकडे जाता येते.
खलिल जिब्रानच्या 'प्राॅफेट' या ग्रंथातील
'मृत्यू' ही कविता
अनुवाद: जीवन बळवंत आनंदगांवकर

Friday, March 22, 2024

Journey of Thought - Para-Pashyanti-Madhyama-Vaikhari

 Ancient Indian philosophy has undertaken a meticulous examination of daily occurrences in a highly systematic manner. Bhatrihari Rishi (circa 450-500 AD) emerged as a notable grammarian, elucidating the process of verbal expression in his work 'Vakyapadiya'.

The words articulated through speech are essentially the initial reflections conceived within the mind. Gradually, these verbal expressions evolve into what is termed as 'Vaikhari Vani'. This Vaikhari Vani emanates from the realm of 'Madhyama Vani'. Analogously, the melodious notes produced by a flute are not contained within the instrument itself; rather, they stem from the breath of the flutist, with the flute serving as a conduit for their manifestation. Similarly, the spoken words mirror the thoughts conceived within our minds.
These thoughts take shape within our consciousness in the form of words, facilitated by a particular language. Whether it be Marathi, Hindi, or English, these thoughts are articulated through the corresponding linguistic medium. Initially, these thoughts manifest within our minds in a subtler form known as Madhyama, preceding the outward expression of Vaikhari.
However, prior to their verbalization, these thoughts undergo a process of incubation within the mind. This phase, characterized by the inception of thoughts before their verbal formulation, is termed 'Pashyanti' by Bhartrihari Rishi.
Preceding the transition of thoughts into Pashyanti, the mind assumes a state of nirvicara-nirvichara, devoid of cogitation. This state mirrors the essence of 'Aakash' (Space), the subtlest of the 'Panchamahabhutas' (Five elements), with its tanmatra (essence) being the word itself. From this realm, thoughts emerge into the consciousness in the Pasyanti state, marking the initial stirrings of cognition.
As thoughts descend into Pasyanti, accompanying bodily sensations arise, such as alterations in breathing patterns or tingling sensations. By cultivating awareness of these bodily sensations, one can intercept the transition of thoughts from Pasyanti to Madhyama. Reacting with equanimity during this phase helps in averting agitation caused by these thoughts. However, unconscious reactions to these sensations often lead to restlessness.
Vipassana meditation offers a pathway to heighten awareness of bodily sensations, thereby fostering inner tranquility. This ancient practice, referenced in the Vedas, was traditionally transmitted through the Guru-Shishya tradition, lacking detailed exposition in ancient scriptures. Gautama Buddha painstakingly revived the lost knowledge of Vipassana and devised a structured teaching methodology for its dissemination to the masses. Personally, I acquired this wisdom through participation in a Vipassana camp under the guidance of Goenka Guruji.
In homage to Sage Bhartrihari, whose scholarly inquiry delved into the genesis of thoughts.
©Santosh Factory Thane
This and similar articles are available on my blog.

Thursday, March 21, 2024

षड्रस

 आपल्याकडे अन्नाच्या संदर्भात षडरस भोजन असा उल्लेख केला जातो. अर्थात अन्न सहा रसांनी / चवींनी युक्त असेल तर त्याने रसपरिपोष होतो. देहाचे पोषण होते आणि जिव्हेची वासना तृप्त होते. 


हे षडरस कोणते ?


गोड चव : पृथ्वी आणि जल (पाणी), कफ दोष वाढविणारा व पित्त-वाताला शांत करणारा आहे.


आंबट चव : पृथ्वी आणि अग्नि, पित्त-कफ वाढवून वाताला शांत करणारा आहे.


खारट चव : पाणी आणि अग्नि, कफ-पित्त वाढवून वाताला शांत करणारा आहे.


तिखट चव : हवा आणि अग्नि, पित्त-वात वाढवून कफाला शांत करणारा आहे.


कडू चव : हवा आणि आकाश, वात वाढवून पित्त-कफाला शांत करणारा आहे.


तुरट चव : हवा आणि पृथ्वी, वात वाढवून पित्त-कफाला शांत करणारा आहे.


यात केवळ जिव्हेची रसना तृप्त करणे हा हेतू नाही. यात केवळ जठराग्नी प्रदीप्त झाला आहे त्याचे शमन हा हेतू सुद्धा नाही तर देह ज्या त्रिदोषांना धारण करतो त्यांचे शमन होणे सुद्धा यामध्ये अभिप्रेत आहे.. 


आपल्याकडे उगीच 'उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म' म्हणत नसत. तर अन्न शिजवताना इतका सूक्ष्म आणि देहाचे सर्वांगीण पोषण घडवण्याचा विचार त्याच्यामागे असे... 


आपल्याकडे भोजन बनवणारी स्त्री ही अन्नपूर्णा देवीचे रूप मानले गेले आहे. नवविवाहिता आपल्या घरी येताना अन्नपूर्णा देवी घेऊन येते.. त्याचे कारण तेच.. ती अन्नपूर्णा होऊन आपल्या घरी येते... 


हे स्त्रियांना सांगावे लागणे हे मला लज्जास्पद वाटत आहे... 


आपल्या संस्कृतीचे हे अधःपतन शोचनीय आहे.

Saturday, March 9, 2024

जोहार

आजचा जागतिक महिला दिन भारतीय महिलांसाठी विशेष महिला दिन असतो. या दिवशीच चितोडमधील महिलांनी आपल्या अब्रूरक्षणासाठी पेटत्या कुंडात उड्या घेऊन आत्मसमर्पण केले होते. चितोडमध्ये तीन वेळा जोहार झाले.
यापैकी दुसरा जोहार आठ मार्च रोजी झाला. 

पहिला जोहार १३०३ मध्ये झाला. याची नक्की तारीख माहीत नाही. चितोडचा राजा रतन रावळ सिंग याच्या अधिपत्याखाली असलेल्या चितोडगडावर अल्ला उद्दीन खिलजी याने आक्रमण केले. यावेळी आपल्या अब्रूरक्षणासाठी चितोड किल्ल्यातील राणी पद्मिनी हिने ७०० स्त्रियांसह किल्ल्यातील कुंडामध्ये अग्नी पेटवून त्यात उडी घेतली. रतन रावळ सिंग यांच्यासह किल्ल्यातील सर्व पुरुषांनी लढत हौतात्म्य पत्करले. 

 दुसरा जोहार ८ मार्च १५३५ रोजी झाला. या वेळी हा किल्ला राणा प्रतापची आजी कर्मावती हिच्या ताब्यात होता. गुजरातच्या बहादूर शहाने या किल्ल्यास वेढा घातला. आपला पराभव समोर दिसताच राणी कर्मावतीने किल्ल्यातील स्त्रियांसह जोहार केला. किल्ल्यातील सर्व पुरुषांनी बहादूर शहाच्या सैन्याशी लढत हौतात्म्य पत्करले. चितोडमधील तिसरा जोहार २२ फेब्रुवारी १५६८ रोजी झाला. हा केला त्यावेळी राणा प्रतापचे वडील उदयसिंह यांच्या ताब्यात होता. त्याला अकबराच्या सैन्याने वेढा घातला. परंतु किल्ल्यातील गुप्त मार्गाने उदयसिंह आणि त्यांचे कुटुंबीय निसटले. या किल्ल्याच्या रक्षणासाठी उदयसिंहाने जयमल राठोड आणि पट्टा सिसोदिया यांच्या ताब्यात दिला होता. एके दिवशी सकाळी अकबराच्या सैन्याने जयमल राठोड याला स्फोटकांनी नुकसान झालेल्या किल्ल्याच्या डागडुजीची पाहणी करताना पहिले. त्यांनी त्याला ठार केले. आता किल्ल्याचे रक्षण करणे कठीण आहे हे राजपुतांच्या लक्षात आले. त्या दिवशी रात्री किल्ल्यातील सर्व स्त्रियांनी जोहार केला. दुसऱ्या दिवशी पहाटे किल्ल्यातील सर्व पुरुषानी केसरीया (साका) करून लढत हौतात्म्य पत्करले. 

 सोबतच्या चित्रात चितोड येथील किल्ल्यातील जोहारकुंड आहे. आजही हा पवित्र परिसर दुर्लक्षित आहे. 

 महिला दिनाच्या शुभेच्छा 

 संतोष कारखानीस ठाणे