Sunday, April 29, 2018

जात

आज का असे वाटते जातीचा रंग सच्चा आहे
आयुष्यातल्या मैत्रीचा धागा मात्र कच्चा आहे

मुंजीला जेवलो तो बर्व्या आज ब्राम्हण आहे
भंडारा लावून जेजुरी चढलो तो सुर्व्या मराठा आहे

कांबळ्याने सोललेला ऊस खाल्ला तो दलित आहे
खरंच का हेच आमच्या मैत्रीचे फलित आहे

लहानपणी खेळताना कधीच नव्हते कळले
कोणालाही लागले तरीही थुंकी लावून चोळले

चिखल असो वा माती नखशिखांत अंगभर लोळले
मैत्रीचे सारे नियम बिनदिक्कतपणे पाळले

बर्व्याचे बाबा गंभीर असताना रक्तदान केले
सुर्व्याने दिलेल्या रक्ताने बर्व्याचे बाबा वाचले

कांबळ्याने आणलेल्या औषधाचे पैसे कुणी दिले
त्यावेळी हे हिशोब कुणीच नाही मागितले

बाबा वाचले म्हणून बर्व्याने देवाला पेढे ठेवले
पण पहिले दोन पेढे मैत्रीच्या देवांना दिले

अश्रु भरल्या डोळ्यांनी छातीशी कवटाळले
एका बापामुळे तिघे पोरके होताना वाचले

सुर्व्याच्या बाबांचे कलेवर सीमेवरून आले
शत्रूच्या गोळ्यांनी शरीर पिंजून सारे गेले

जातीचे प्रमाणपत्र गोळ्यांनी नाही पाहिले
खांद्यावर घेताना तिघे हमसाहमशी रडले

अशा ह्या मैत्रीला ग्रहण कशामुळे लागले
खट्याळपणा कुणाचा अन् सारे रान पेटले

इतिहासातल्या घटनांवरून राजकारण तापले
जिवाभावाच्या मित्रांचे चेहरे कावरेबावरे झाले....

(Whatsapp वरुन साभार)

मी आता जाणार आहे : जीवन आनंदगावकर

मी आता जाणार आहे सोडून सार्या लौकिका
शोधण्याला श्रेय माझे , वेळ गेला हा फूका !
आलो येथे मी कशाला हेच मजला नाठवे
जन्मजन्मांतरीचे शाप हे, पुन्हा मज भोवती का?

सोबतीने तुमच्या मारल्या रेघा, शोधल्या दाही दिशा
गावले काहीच नाही चिवडल्या नुसत्या आशा !
प्राक्तनाच्या गावात या, दैव माझे विखरून गेले
सांजवेळी बहरलेली केव्हाच विरली ती नशा!

रोज आता आठवणींचे पंख, मी तोडीत जातो
पायवाटेवर विखरून पडली ती पहा माझी दशा!
कैद माझी भोगतो, या पेशीपेशीतून माझ्या
दगड घेऊन माझ्या आता मागे तुम्ही लागू नका!

दिली असतील वचने कधी, ती मला संपवून गेली
फास माझ्या गळ्यातला तो उगा हलवू नका!

मी आता जाणार आहे सोडून साऱ्या लौकिका! !

कविता जीवन आनंदगावकर

Sunday, April 22, 2018

उतार

आता उतार सुरू
किती छान
चढणे ही भानगड नाही
कुठलं शिखर जिंकायचं नाही
आता नुस्ता उतार
समोरचं,झाडीनं गच्च भरलेलं द्रुश्य
दरीतून अंगावर येणारा
आल्हाददायक वारा
कधी धुकं, तर कधी ढगही
टेकावं वाटलं तर टेकावं
एखाद्या दगडावर
बसलेल्या छोट्या पक्ष्याशी
गप्पा माराव्यात,
सुरात सूर मिसळून...
अरे, हे सगळं इथंच होतं?
मग हे चढताना का नाही दिसलं?
पण असू दे
आता तर दिसतंय ना
मजेत बघत
उतरू हळूहळू
मस्त मस्त उतार

अनिल अवचट

Saturday, April 21, 2018

पंच महाभूतांच्या मंदिरांचे रहस्य

♢♢♢♢♢ पंच महाभूतांच्या मंदिरांचे रहस्य ♢♢♢♢♢

संदर्भ Vilas Joshi यांची फेसबुक पोस्ट

अश्या अनेक गोष्टी आहेत, ज्या कळल्या तर आपण अक्षरशः थक्क होतो. थिजून जातो. आज ज्या गोष्टी आपल्याला अशक्य वाटतात, त्या अडीच/तीन हजार वर्षांपूर्वी आपल्या भारतीयांना कश्या काय निर्माण करता आल्या असतील हे प्रश्नचिन्ह मोठं होत जातं.......

#हिंदू तत्वज्ञानामधे पंच महाभूतांचे विशेष महत्त्व आहे.  ही पंच महाभूतं म्हणजे #जल, #वायू, #आकाश, #पृथ्वी आणि #अग्नी. आपलं सारं जीवनचक्र या पंच महाभूतांच्या आधाराने गुंफलेलं असतं अशी मान्यता आहे.

आपल्या देशामध्ये या पंच महाभूतांची भव्य आणि वैशिष्ठ्यपूर्ण मंदिर आहेत हे आपल्यापैकी किती जणांना माहीत असेल ?

फार थोड्या लोकांना.त्यातून ते जर शंकराचे उपासक असतील तर हे माहीत असण्याची थोडी तरी शक्यता आहे. कारण ह्या पंच महाभूतांची मंदिरं म्हणजे शिव मंदिर,भगवान शंकराची मंदिर आहेत. पण यात काही मोठं वैशिष्ट्य किंवा रहस्य नाही.

□ मग वैशिष्ट्य कशांत आहे.....?????

पंच महाभूतांच्या ह्या पाच मंदिरांचं वैशिष्ट्य किंवा रहस्य यात आहे की यातील तीन मंदिरं, जी एकमेकांपासून काही शे किलोमीटर लांब आहेत, ती एका सरळ रेषेत आहेत..!
होय.अक्षरशः एका सरळ रेषेत आहेत..!!
]]] ती तीन मंदिर आहेत [[[

  • श्री कालहस्ती मंदिर
  • श्री एकंबरेश्वर मंदिर,कांचीपुरम
  • श्री तिलई नटराज मंदिर,त्रिचनापल्ली

आपण पृथ्वीवर एखादी जागा ठरविण्यासाठी कोआर्डिनेटस चा उपयोग करतो, ज्याला आपण अक्षांश आणि रेखांश म्हणतो. यातील अक्षांश (Lattitude) म्हणजे पृथ्वीवर आडव्या मारलेल्या (काल्पनिक) रेघा. जसं विषुववृत्त, कर्कवृत्त वगैरे. आणि रेखांश (Longitude) म्हणजे उभ्या मारलेल्या (काल्पनिक) रेघा.

या तीन मंदिरांचे अक्षांश–रेखांश आहेत

  1. श्री कालहस्ती मंदिर 13.76 N 79.41 E वायू
  2. श्री एकंबरेश्वर मंदिर 12.50 N 79.41 E पृथ्वी
  3. श्री तिलई नटराज मंदिर 11.23 N 79.41 E आकाश


यातील रेखांश हा तिन्ही मंदिरांसाठी 79.41 E आहे. अर्थात तिन्ही मंदिरं एका सरळ रेषेत आहेत. कालहस्ती आणि एकंबरेश्वर मंदिरांमधील अंतर सव्वाशे किलोमीटर आहे तर एकंबरेश्वर आणि तिलई नटराज मंदिरांमधील अंतर हे पावणे दोनशे किलोमीटर आहे. ही तिन्ही मंदिरं नक्की केंव्हा बांधली, ते सांगता यायचं नाही. या भूभागावर राज्य केलेल्या #पल्लव, #चोल इत्यादी राजांनी ह्या मंदिरांचे नूतनीकरण केल्याचे उल्लेख सापडतात. पण किमान तीन हजार वर्षांपेक्षाही जास्त, ही मंदिरं जुनी असतील हे निश्चितपणे म्हणता येईल.
》》》

आता इथे खरं आश्चर्य हे आहे, की साधारण तीन हजार वर्षांपूर्वी, इतक्या लांबच्या लांब अंतरावरील ही मंदिरं एकाच उभ्या सरळ रेषेत कशी बांधली असतील..?
याचा अर्थ, त्या काळात #नकाशाशास्त्र इतकं प्रगत होतं की अक्षांश–रेखांशांच ज्ञान त्यांना होतं ? पण अक्षांश–रेखांशांचं परिपूर्ण ज्ञान असलं तरी एका सरळ रेषेत मंदिर बांधण्यासाठी नकाशा शास्त्रा बरोबरच कंटूर मेप चं ज्ञान त्यांना आवश्यक होतंच!
की
इतर कुठली एखादी पध्दत त्या काळात वापरली गेली, जी आज काळाच्या पडद्याआड गेलेली आहे..?
सारंच अतर्क्य.....!

ही गंमत इथेच संपत नाही, तर इतर दोन मंदिरांबरोबर जेंव्हा ह्या एका सरळ रेषेत असलेल्या मंदिरांना जोडलं जातं, तेंव्हा झालेल्या रचनेतून विशिष्ट कोण निर्माण होतात.

याचा अर्थ, त्या काळातली आपल्या वास्तुविशारदांची #झेप लक्षात घ्या. जमिनीच्या, काही हजार चौरस किलोमीटर पसरलेल्या भूभागावर ते पंच महाभूतांच्या पाच शैव मंदिरांचा मोठा पट मांडतात.आणि त्या रचनेतून आपल्याला #काही_सुचवू पाहतात. आपलं दुर्भाग्य की आपण त्यांची ती ज्ञानाची कूट भाषा समजू शकत नाही.

या पंच महाभूतांच्या मंदिरांपैकी एक मंदिर आंध्र प्रदेशात आहे, तर उरलेली चार, तामिळनाडू मधे आहेत. यातील वायू तत्वाचं प्रतिनिधित्व करणारं, श्री कालहस्ती मंदिर, हे आंध्र प्रदेशातल्या चितूर जिल्ह्यांत, तिरुपतीहून साधारण पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे. #स्वर्णमुखी या लहानश्या नदीच्या तीरावर हे मंदिर उभारलेले आहे. हजारों वर्षांपासून ह्याला ‘दक्षिण कैलास’ किंवा ‘दक्षिण काशी’ म्हटले जाते.

हे मंदिर अत्यंत प्राचीन असले तरी मंदिराचा आतला गाभाऱ्याचा भाग पाचव्या शतकात तर बाहेरचा, गोपुरांचा भाग हा अकराव्या शतकात बांधलेला आहे. पल्लव, चोल आणि नंतर विजयनगर च्या राजांनी ह्या मंदिराची डागडुजी आणि बांधकाम केल्याचे उल्लेख सापडतात. आदी #शंकराचार्य ह्या मंदिरात येऊन गेल्याचे उल्लेख अनेक साहित्यात मिळतात. खुद्द शं‍कराचार्यांच्या ‘शिवानंद लहरी’ मधे ह्या मंदिराचा आणि येथील ‘भक्त कणप्पा’ चा उल्लेख आहे.
हे मंदिर पंच महाभूतांपैकी वायू तत्वाचे प्रतिनिधित्व करते. याचे काही चित्तवेधक संदर्भ मिळतात/दिसतात.

या मंदिरातील शिवलिंग हे पांढरे असून ते स्वयंभू आहे असे मानले जाते. या शिवलिंगाला (हे वायुतत्व असल्यामुळे) कधीही #स्पर्श केला जात नाही. मंदिराचे पुजारी सुध्दा ह्या मुख्य लिंगाला कधीच स्पर्श करीत नाहीत. अभिषेकासाठी आणि पूजेसाठी एक वेगळे उत्सव लिंग बाजूला ठेवले आहे. गंमत म्हणजे ह्या मंदिराच्या गाभार्‍यात एक दिवा सतत जळत असतो आणि तो सतत फडफडत असतो. हे थोडं नीट समजून घेतलं पाहिजे. कारण मंदिराचा गाभारा हा लहान असुन त्याला कोठेही हवा यायला जागा नाही. पुजाऱ्यांनी मुख्य द्वार बंद केलं तरी त्या दिव्याच्या ज्योतीचं फडफडणं चालूच असतं..! कुठलाही वारा नसताना, दिव्याची ज्योत फडफडत राहणं हे कां होतं ?

》》》याचं कोणतंही #शास्त्रीय कारण आजतागायत मिळू शकलेलं नाही.《《《

मात्र येथील शिवलिंग हे वायुतत्व असल्याने दिव्याची ज्योत सतत फडफडत असते, असं येथील लोकांचं म्हणणं आहे!!
या मंदिरापासून साधारण सव्वाशे किलोमीटर दक्षिणेला अगदी सरळ रेषेत पंच महाभूतांपैकी दुसरे मंदिर आहे – श्री एकंबरेश्वराचे मंदिर.
तामिळनाडूच्या प्रसिध्द कांचीपुरम मधे हे पृथ्वी तत्वाचे प्रतिनिधित्व करणारे मंदिर आहे.

पृथ्वी तत्व असल्याने हे शिवलिंग मातीचे बनले आहे. असे मानले जाते की शिवशंकराच्या प्राप्तीसाठी एका आंब्याच्या झाडाखाली, पार्वती ने आराधना केली. आणि ती देखील मातीच्या शिवलिंगाच्या स्वरूपाची. म्हणूनच ह्याला एकंबरेश्वर म्हणतात. तामिळ मधे एकंबरेश्वर म्हणजे आंब्याच्या झाडाचा देव. आजही मंदिराच्या आवारात एक प्राचीन आंब्याचे झाड उभे आहे. #कार्बन_डेटिंग ने ह्या झाडाचे वय साडेतीन हजार वर्षे निघाले आहे, असे म्हटले जाते. ह्या झाडाला चार वेदांचे प्रतीक समजले जाते. असं म्हणतात, ह्या झाडाला चार वेगवेगळ्या स्वादाचे आंबे लागतात.
हे मंदिर, ‘#कांचीपुरम’ ह्या मंदिरांच्या शहरात आहे. कांचीपुरम हे ‘कांजीवरम’ साड्यांसाठी जगप्रसिध्द आहे.ह्या मंदिरात तामिळ, तेलगु, इंग्रजी आणि हिंदीत एक फलक लावलाय की हे मंदिर ३,५०० वर्ष जुनं आहे. नेमकं किती जुनं हे सांगता येणं कठीण आहे. पुढे पाचव्या शतकात पल्लव, नंतर चोल आणि पुढे विजयनगर च्या राजांनी ह्या मंदिराची डागडुजी केल्याचे उल्लेख आढळतात.
ह्या दोन मंदिरांच्याच अगदी सरळ रेषेत, दक्षिण दिशेत, ह्या एकंबरेश्वर मंदिरापासून साधारण पावणे दोनशे किलोमीटर अंतरावर पंच महाभूतांचे तिसरे मंदिर आहे – तिलई नटराज मंदिर. आकाश तत्वाचे प्रतिनिधित्व करणारे हे मंदिर, तामिळनाडू च्या चिदंबरम या शहरात आहे.
खुद्द #पतंजली ऋषींनी स्थापन केलेले हे अत्यंत प्राचीन असे मंदिर आहे. नेमके केंव्हा बांधले हे सांगणं कठीण आहे. मात्र पाचव्या / सहाव्या शतकात, पल्लव आणि चोल राजांनी याची डागडुजी आणि काही नवीन बांधकाम केल्याचे उल्लेख आढळतात. ह्या मंदिरात ‘#भरतनाट्यम’ च्या १०८ विभिन्न मुद्रा दगडी खांबांवर कोरलेल्या आहेत. याचाच अर्थ, अत्यंत विकसित असं भरत नाट्यम हे नृत्य शास्त्र काही हजार वर्षांपूर्वी सुध्दा अस्तित्वात होतं, हे सिध्द होतं..!
मात्र

कोठेही खांबांवर, शंकराच्या अनेक मुद्रा कोरल्या असल्या तरी, #नटराज ची मूर्ती किंवा मुद्रा कोरलेली नाही. ती मुख्य गर्भगृहात विराजमान आहे.
येथे भगवान शंकर हे नटराजाच्या रुपात असुन सोबत #शिवकामी अर्थात पार्वती ची प्रतिमा ही आहे. मात्र नटराजाच्या रूपातील शिवप्रतिमेच्या उजव्या बाजूला थोडी मोकळी जागा आहे, तिला ‘चिदंबरा रहस्यम’ असे म्हटले जाते. या मोकळ्या जागेला सोन्याच्या चकत्यांच्या हारांनी सजवले जाते. येथील मान्यतेनुसार ही मोकळी जागा, मोकळी नसून ते (आकारहीन) आकाशतत्व आहे.
पूजेच्या वेळा सोडून इतर वेळी ही मोकळी जागा लाल पडद्याने आच्छादित असते. पूजेच्या वेळेला हा लाल पडदा बाजूला करून त्या (आकारहीन) शिव तत्वाची अर्थात आकाश तत्वाची पूजा केली जाते.अशी मान्यता आहे की येथे शिव आणि कालीमातेच्या स्वरुपात पार्वती, ह्यांनी नृत्य केले होते.
ह्या चिदंबरम पासून साधारण चाळीस किलोमीटर अंतरावर कावेरी नदी समुद्राला जाऊन मिळते. या भागात आठव्या/नवव्या शतकात चोल राजांनी जहाजांसाठी गोदी बांधली होती. ह्या जागेचं नाव आहे – पुम्पुहार. एके काळी हे फार मोठे आणि पूर्व किनाऱ्यावरचे फार प्रसिध्द बंदर होते. आज मात्र ते एक लहानसे गाव राहिले आहे.


==》या पुम्पुहार मधे काही वर्षांपूर्वी पुरातत्व विभागाने उत्खनन केलं आणि त्यांना अक्षरशः #खजिना गवसला.
सुमारे दोन/अडीच हजार वर्षांपुर्वीचे एक अत्यंत समृध्द आणि विकसित शहर त्यांना सापडले. या नगराचे नियोजन, त्यातील रस्ते, घरं, नाल्या, पाण्याचा निचरा इत्यादी गोष्टी बघून आजही थक्क व्हायला होतं.
एकुणात काय, तर आजपासून किमान दोन/तीन हजार वर्षांपूर्वी ह्या परिसरात एक अत्यंत समृध्द आणि विकसित अशी संस्कृती नांदत होती, ज्या संस्कृतीने पंचमहाभूतांच्या पाच मंदिरांचा एक मोठा पट, ह्या विशाल जागेत मांडला होता..!

ह्या तीन मंदिरांनी तयार केलेल्या सरळ रेषेशी विशिष्ट कोण करून उभं आहे, पंच महाभूतांपैकी चौथं मंदिर – जंबुकेश्वर मंदिर. त्रिचनापल्ली जवळ, तिरुवनाइकवल गावात हे मंदिर आहे. पंच महाभूतांपैकी जल तत्वाचे प्रतिनिधित्व करणारे, कावेरी नदीच्या उत्तर किनाऱ्यावर असलेल्या ह्या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे शिवलिंगाखाली पाण्याचा लहानसा पण खळाळता झरा आहे. त्यामुळे हे शिवलिंग सतत पाण्यात बुडलेले असते.

ब्रिटीश काळात #फर्ग्युसन ह्या पुरातत्ववेत्त्याने या मंदिराबाबत बरेच संशोधन केले, जे अनेकांनी प्रमाण मानले. त्याच्या मते चोल वंशाच्या प्रारंभिक काळात या मंदिराचे निर्माण झाले. मात्र त्याची #निरीक्षणं_चुकीची_होती हे आता समोर येतंय. मंदिरात आढळलेल्या एका शिलालेखावरून हे मंदिर इसवी सनापूर्वी काही शे वर्ष अस्तित्वात होते हे सिध्द झालेले आहे.

त्या सरळ रेषेत असलेल्या तीन मंदिरांशी विशिष्ट कोण केलेले, पंच महाभूतांच्या मंदिरांपैकी शेवटचे, मंदिर आहे – अरुणाचलेश्वर मंदिर. तामिळनाडू च्या तिरुअन्नामलई मधे असलेलं हे मंदिर, पंच महाभूतांच्या अग्नी तत्वाचे प्रतिनिधित्व करते. भारतातल्या मोठ्या मंदिरांपैकी हे एक आहे. एका पहाडावर बांधलेले हे मंदिर, विशाल परिसरात पसरलेले आहे. सातशे फुटांपेक्षा जास्त उंच असलेल्या भिंतींच्या आत बांधलेल्या ह्या मंदिराच्या गोपुरांची उंची १४ मजली इमारती च्या बरोबर आहे.

☆☆☆☆☆

ही पाच शिव मंदिरं आणि त्यांची जमिनीवरची रचना अक्षरशः अद्भुत आहे. यातील तीन मंदिरं एका सरळ रेषेत असणं हा योगायोग असू शकत नाही. अत्यंत विचारपूर्वक, आंध्र आणि तामिळनाडू च्या विस्तीर्ण पटावर बांधलेली ही मंदिरं म्हणजे चमत्कार आहे. त्यांच्या रचनेतून निर्माण होणारी कूट भाषा आपण जर समजू शकलो तर प्राचीन काळातील ज्ञानाची अनेक रहस्यं आपल्यापुढे उलगडू शकतील

Friday, April 20, 2018

मीरा मिनी कार

‘सामान्य माणसाची कार’ म्हणून आपल्या सगळ्यांनाच रतन टाटांची नॅनो माहितेय, पण आपल्यापैकी खूप कमी लोकांना ही गोष्ट माहित असेल की अशा प्रकारचा प्रयोग देशात साधारणतः ५० वर्षापूर्वीच झाला होता. अगदी नॅनो पेक्षाही छोटी आणि नॅनोमध्ये असणारे जवळपास बरेचसे फीचर्स असणारी कार १९७५ साली मुंबईच्या रस्त्यावर धावली होती. ही कार ‘मीरा’ या नावाने ओळखली जात असे आणि ती कार बनवली होती एका मराठी माणसाने. शंकरराव कुलकर्णी त्यांचं नांव. विशेष म्हणजे शंकररावांचं शिक्षण फक्त सातवीपर्यंत झालेलं. इचलकरंजीच्या एका सातवी पास महाराष्ट्रीयन माणसाने देशाला, इतिहासातील सर्वात छोटी आणि सामान्य माणसाच्या बजेटमधली कार दिली होती. कारची किंमत होती १२००० रुपये. सिंगल वायपर, रिअर इंजिन, ५
सीटर, २० किमी प्रतिलिटर मायलेज ही या कारची काही महत्वाची फीचर्स होत. विशेष म्हणजे या कारचे बहुतेक महत्वाचे पार्टस देसी होते. कारचं इंजिन देखील भारतीय बनावतटीचं होतं. त्या काळात शंकरराव चव्हाण, शंतनुराव किर्लोस्कर, मोहन धारिया, राजारामबापू पाटील यांसारख्या अनेक प्रतिष्ठितांनी या कारमधून प्रवास केला होता. किर्लोस्करमध्ये काम करणाऱ्या शंकररावांनी आपल्या १५ जणांच्या टीमसोबत १९४५ मध्ये कार बनवण्याच्या आपल्या कल्पनेवर काम सुरु केलं. १९४९ मध्ये शंकररावांनी या कारचं पहिलं मॉडेल तयार केलं. त्यात ड्रायव्हरच्या पाठीमागच्या सीटवर दोन माणसं बसू शकत असत. पुढच्या दोन दशकांच्या काळात या मॉडेलमध्ये अनेक सुधारणा करून अद्ययावत असे अजून ५ मॉडेल त्यांनी बनवले. शंकररावांनी जी पहिली कार बनवली होती तीचा आरटीओ मधला नोंदणी क्रमांक होता एम.एच.के.१९०६. इचलकरंजीच्या रस्त्यावर तर शंकरराव कार केव्हापासूनच चालवत होते, परंतु व्यावसायिक पातळीवर या कारच्या निर्मितीत उतरण्यासाठी सर्वप्रथम मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’ इथं ही कार प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली होती. त्यावेळी खंडाळा घाटातून प्रवास करत शंकररावांनी ती मुंबईत आणली होती. १९७५ साली जयसिंगपूर नगरपालिकेने या कारच्या
निर्मितीसाठी शंकररावांना प्लांट स्थापन करण्यासाठी जागा देखील उपलब्ध करून दिली होती. परंतु लालफितीतला कारभार आणि नोकरशाहीचा ढिम्म प्रतिसाद यांमुळे पुढे या प्रकल्पाचं पुढं काहीच होऊ शकलं नाही. मीरा कारचं मॉडेल मोठ्या प्रमाणात प्रत्येक्षात येण्यासाठी सरकारी मदतीची आवश्यकता होती, तसंच अनेक शासकीय परवानग्या देखील गरजेच्या होत्या. त्या मिळविण्यात शंकररावांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागला. शिवाय त्याच काळात सुजुकीसुद्धा या क्षेत्रात भारतात प्लांट सुरु करण्याच्या तयारीत असल्याने शंकररावांना सरकारकडून परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे हा प्रकल्प तिथेच रखडला. अनेक आर्थिक अडचणींना देखील शंकररावांना सामोरं जावं लागलं.

संदर्भ http://www.bolbhidu.com/know-about-shankarrao-kulkarnis-small-car-meera/

Sunday, April 8, 2018

अष्टावक्र गीता


Image may contain: 2 people, people sitting, shoes and living room"दमलास? चल परत जाऊ. आज इतकं पुरे. पुन्हा कधीतरी जाता येईलच.

""नाही गुरुजी. मी दमलोय; पण आपण इतके वर आलोय, आज शिखरावर पोहोचायचंच! कधी एकदा पोहोचतोय आणि मग तुम्ही ते सत्य सांगताय, असं झालंय मला.‘‘

""माझं वचन नीट आठव. ही मोहीम पुरी होईपर्यंत, जर माझी आज्ञा तू निरपवादपणे पाळलीस, तर ते सत्य सांगेन‘ असं म्हणालो होतो मी.‘‘

""होय गुरुजी. पण आता शिखर जवळ आलं असेल. इतकं वर आल्यावर सोडून द्यायचं म्हणजे..‘‘

""कितीही वर आलो असू! तरी मी सांगतो म्हणून, हे सगळे कष्ट वाया जाऊ द्यायला तू तयार आहेस का नाही?‘‘

""ठीक आहे गुरुजी. मी आजची सगळी धडपड वाया जाऊ द्यायला तयार आहे. म्हणत असाल तर परत जाऊ या.‘‘

""शाबास! आता मी तुला ते सत्य सांगतो‘‘.

""पण शिखर न येताच?‘‘

""तसं नव्हे. तू परतीला तयार झालास म्हणून! ते सत्य हे आहे, की शिखर असं नाहीच. ही अंतहीन चढण आहे आणि ज्या तळापासून आपण निघालो ना, तेच खरं पोचण्याचं स्थान होतं! तू उत्तीर्ण झालास. चल आता तिथं जाऊ, जिथं आपण असतोच; फक्त "पोहोचलो‘ असं वाटत नसतं इतकंच! "

या एकाच गोष्टीत अष्टावक्र गीतेचे सार आहे.

Wednesday, April 4, 2018

गौतम बुद्धाचा अनात्मवाद

No automatic alt text available.बौद्ध धर्म 'अनात्मवाद' सांगतो. पण गौतम बुद्धाने आपल्या मागील जन्माच्या आठवणी सांगितल्या आहेत. त्या 'जातककथा' या नावाने प्रसिद्ध आहेत. जर 'आत्मा'च नसेल तर पुनर्जन्म कसा अशा शंका उद्भवतात. या संदर्भात अनेकांच्या मनात गोंधळ असतो. कालच एका पोस्टवर यावरून चर्चा चालू होती. माझ्या मित्रांच्या माहितीसाठी त्या चर्चेतील माझी COMMENT येथे पुनरुधृत करीत आहे.

गौतम बुद्धाने भवचक्राची संकल्पना मांडली. मृत्युच्या शेवटच्या क्षणी एक खोलवर ठसा उमटविलेला संस्कार (वासना/इच्छा) डोके वर काढतो, तो चार स्कंधान्च्या (वेदनास्कंध, संज्ञास्कंध, संस्कारस्कंध, विद्यानस्कंध) समुच्चयाला नव्या रूपस्कंधाशी (शरीराशी) जोडतो.त्यामुळे नवा जन्म मिळतो आणि आपल्याला जीवनाचे सातत्य जाणवते.

जेव्हा हा संस्कारसंचय नष्ट होतो आणि नवा संस्कार बनत नाही तेव्हा माणूस मुक्त होतो (बौद्ध शब्दावलीप्रमाणे 'निर्वाणाला' पोचतो). मग मृत्युच्या वेळी कोठलाही संस्कार आपले शीर उभारीत नाही. मग नवा जन्म मिळत नाही. यावेळी काहीच उरत नाही. आत्मासदृश काहीही उरत नाही. म्हणूनच बुद्धदर्शन शून्यवाद सांगणारे म्हणून ओळखले जाते. अन्य बहुसंख्य (काही अपवाद वगळता) भारतीय दर्शनांत मुक्तीनंतर आत्मा परमात्म्यात विलीन होतो असे म्हटले आहे. या दृष्टीने बौद्ध दर्शन वेगळे आहे. ते अनात्मवादी आहे.

अशाप्रकारे पुनर्जन्म (भवचक्र) ही संकल्पना बौद्ध धर्मातही आहे. स्वत: तथागताचे मागील अनेक जन्म त्यांना आठवले आणि त्याच जातक कथा होत.

अन्य भारतीय दर्शनात ज्याला 'वासना' म्हणतात त्याला बौद्ध शब्दावलीत 'संस्कार' (पाली शब्द 'संखारा') म्हणतात.

प्राचीन भारतीय दर्शने (बौद्ध , जैन धरून) अनेक आहेत. त्यात भेद असला तरी थोडाच आहे. त्या दर्शनांचे उद्गाते ज्या काळात होऊन गेले त्यांनी त्या काळाची भाषा वापरली आहे. म्हणून ही दर्शने प्रथमदर्शनी वेगळी वाटतात. चार्वाक दर्शन (लोकायत) हेच वेगळे असावे. पण चार्वाक दर्शनाची संहिता उपलब्ध नाही. त्याच्यावरील टीका उपलब्ध आहेत. त्यावरूनच ते दर्शन काय म्हणते याचा अंदाज करावा लागतो.

तेव्हा सर्व भारतीय दर्शने मूलत: सारखीच गोष्ट सांगतात. त्यात थोडाच फरक आहे.



Tuesday, April 3, 2018

ओव्हरअर्निंगचं व्यसन..?

Image result for overearning
Forwarded article from WhatsApp

*ओव्हरअर्निंगचं व्यसन..?*

“आपण सगळेच गरजेपेक्षा खूपच जास्त काम करतो आहोत” असा मुद्दा गुगलचा सीईओ लॅरी पेज यानं एका भाषणात मांडला होता. पेजचं हे विधान अर्थातच हातावर पोट असलेल्या, घराचं भाडं भरण्यासाठी किंवा रोजचं दोन वेळचं जेवण मिळवण्यासाठी काम करणार्या प कामगारांना उद्देशून नव्हतं. पेजला अभिप्रेत होतं ते “ओव्हरअर्निंग..!” पुरेशा गोष्टी मिळवल्यानंतरही मौजमजेसाठी वेळ न काढता अक्षरश: अहोरात्र काम करुन पैसे मिळवणं या प्रवृत्तीला शिकागो विद्यापीठाच्या ख्रिस्तोफर हीस या प्राध्यापकानं “ओव्हरअर्निंग” म्हणलं होतं.

“ओव्हरअर्निंग” म्हणजे काय ते समजावून सांगताना हीसनं एक मजेदार प्रयोग केला होता. या प्रयोगात विद्यार्थ्यांनी “समोरचं बटण दाबून सुरेल संगीत ऐकायचं किंवा गोंगाट ऐकायचा” यापैकी एक पर्याय निवडायचा होता.

पाच मिनिटांच्या पहिल्या टप्प्यात एखादा विद्यार्थी जितक्या वेळा गोंगाट ऐकणं पसंत करेल (उदा. २० वेळा) तितकी चॉकोलेटस् त्याला मिळणार होती. पण या टप्प्यात ती चॉकोलेटस खायला मात्र त्याला परवानगी नव्हती.

याच प्रयोगाच्या दुसऱ्या पाच मिनिटांच्या टप्प्यात गोंगाट ऐकून मिळालेली चॉकोलेटस खाणं सक्तीचं होतं. दुसऱ्या टप्प्यात काही विद्यार्थ्यांनी शांतपणे संगीत ऐकायचा आनंद सोडून देऊन गोंगाट ऐकणं पसंत केलं.

आपण साधारण ३ ते ४ चॉकोलेटस खाऊ शकू असं कबूल केलेलं असतानाही त्यांनी १० पेक्षा जास्त चॉकोलेटस मिळवली. ती खाण त्यांना शक्य झालं नाही. ते सगळे “ओव्हरअर्नर्स” आहेत असं हीसनं जाहीर केलं.

ओव्हरअर्नर्समध्ये आपण खर्च करु शकणार नाही त्यापेक्षा खूप जास्त मिळवण्याची एक खोलवर दडलेली आकांक्षा असते. कामाच्या अतिरेकानं त्यांना ताण आला किंवा जगण्यातला आनंद संपला तरी त्यांना त्याची तमा नसते.

“सॉयकॉलॉजिकल सायन्स”च्या एका अंकात याबद्दल लेख प्रकाशित झाला होता. काम करताना आनंद वाटतो, भविष्याबद्दल अनिश्चितता वाटते आणि इतरांपेक्षा जास्त संपत्ती मिळवावीशी वाटते ही कारणं सांगून भरपूर पैसे साठल्यावरही खूप काम करणारी माणसं हा लेख वाचून प्रत्येकाला आठवणार आहेतच. पण....

त्या यादीत आपलंच नाव पहिलं आहे का? हे तपासायला हवं..!

Sunday, April 1, 2018

तक्रार कशाला करायची?


Shripad Kulkarni यांची फेसबुकपोस्ट
तक्रार कशाला करायची?
(अंतर्मुख करणारा प्रश्न)

महाभारतातील दोन पात्रामधील अतिशय सुरेख संवाद:

कर्ण कृष्णाला विचारतो - " माझा जन्म झाल्याबरोबर माझ्या आईने मला सोडून दिले,

कारण मी अनौरस संतती होतो.
यात माझी काय चूक होती?

मला द्रोणाचार्यांनी शिक्षण नाकारलं,
कारण मी क्षत्रिय नाही मानला जात होतो.

परशुरामांनी मला विद्या दिली, पण मला शाप दिला की ती विद्या मी विसरून जाईल.
कारण मी क्षत्रिय होतो.

एक गाय चुकून माझ्या बाणांनी मारली गेली, आणि
गायवाल्यानी माझी चूक नसताना मला शाप दिला.

द्रौपदीच्या स्वयंवरात मला अपमान सहन करावा लागला.

कुंतीने शेवटी माझे सत्य तिच्या मुलांना वाचवण्यासाठीच सांगितले.

मला जे काही मिळाले ते दुर्योधनाचे उपकार म्हणून मिळाले.
तर मी त्याची बाजू घेतली यात माझे काय चुकले?"

कृष्णाने उत्तर दिले:
"कर्णा, माझा जन्म कारागृहात झाला.

जन्माच्या अगोदरपासूनच मृत्यू माझी प्रतीक्षा करीत होती.

रात्री जन्म झाल्याबरोबर लगेच मला माझ्या आईवडिलांपासून वेगळे करावे लागले.

तुम्ही तलवारी, रथघोडे, धनुष्यबाणांच्या आवाजात लहानाचे मोठे झालात.

मला गौशाला, शेणमाती मिळाली आणि मी चालायला पण लागलो नव्हतो तेव्हापासून माझा जीव घेण्याचे अनेक प्रयत्न केले गेले.

ना कोणती सेना, ना शिक्षण.

मीच त्यांच्या वाईटाचा कारण आहे, असे लोकांकडून मला ऐकायला मिळायचे.

तुमचे गुरु तुमच्या पराक्रमाचे कौतुक करायचे, तेव्हा मला साधे शिक्षण पण मिळाले नाही.

संदीपनी मुनींच्या गुरुकुलात प्रवेश झाला तेव्हा मी 16 वर्षाचा होतो.

तुम्ही तुमच्या पसंदीच्या मुलीशी लग्न केले.

माझं जिच्यावर प्रेम होते ती मला मिळाली नाही, तर ज्यांची मी राक्षसांच्या तावडीतून सुटका केली त्या माझ्या पदरी पडल्या.

मला माझ्या सर्व समाजबांधवांना जरासंधाच्या अत्याचारापासून वाचवण्यासाठी यमुना काठापासून नेऊन समुद्राच्या काठी (द्वारका) वसवावे लागले.
मला पळपुटा (रणछोडदास) म्हणतात.

जर दुर्योधन जिंकला तर तुला भरपूर श्रेय मिळेल.
धर्मराज जिंकला तर मला काय मिळेल, फक्त युद्ध आणि नुकसानीचा दोष.

एक गोष्ट लक्षात घे कर्णा...
प्रत्येकाला आयुष्यात कष्ट आहेत

आयुष्य कोणासाठीही सोपे नाही

दुर्योधनाच्या आयुष्यात बऱ्याचशा अप्रिय घटना घडल्या आहेत आणि तसेच युधिष्ठिराच्या पण.

परंतु काय योग्य (धर्म) आहे हे तुझ्या अंतरात्माला पण कळते...

कितीही वेळा आपल्या बरोबर अयोग्य गोष्टी झाल्या,
किती वेळा आपल्याला अपमान सहन करावा लागला,
कितीही वेळा आपल्याला आपल्या वाटेचे नाकारले गेले,

तरीही
त्यावेळी आपण कसा प्रतिसाद देतो याला महत्व आहे.

तक्रारी थांबव कर्णा!

आयुष्यात घडलेल्या अप्रिय घटनामुळे तुला अधर्म करण्याचा अधिकार मिळत नाही.

म्हणून मित्रानो, तुमच्या आयुष्यात आलेल्या कठीण व अतिवाईट प्रसंगी देखिल तुम्ही चांगलाच विचार करा, चांगलंच वागा आणि प्रत्येक माणसाला आणि प्राण्याला सहकार्य करा. स्वच्छंदी व्हा आणि हे विसरून जा कुणी तुम्हाला वेदना दिली की आनंद...!

भारतीय विज्ञान

Dattatraya Padmakar Joshi यांची फेसबुक वरील पोस्ट

मित्र दिपक आकुत ह्याची पोस्ट शेअर करतोय

आपले वेद आणि प्राचीन ज्ञान संपूर्ण थोतांड आहे का ? आणि आधुनिक विज्ञान परिपूर्ण आहे का ? ( एक अभ्यासपूर्ण विवेचन )

सदरील लेखात आपण विज्ञान आणि वैज्ञानिक आणि त्यांचे शास्त्रीय दृष्टीकोन याचा उहापोह केला आहे. ठीक आहे. विज्ञानात वैज्ञानिक निसर्ग नियमाना जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारतो, उत्तरे शोधतो. तर्कावर आधारित सिद्धांत मांडतो. ते गणितीय पद्धत वापरून सिद्ध करतो हि सगळी तार्किक दृष्टी आहे. आपला हा सुद्धा दावा आहे कि मानवाने ३०० वर्षात अफाट प्रगती केलेली आहे.

सूर्य-चंद्र ग्रहणे, कोणत्या दिवशी, नेमक्या कोणत्या वेळी, जगात कुठे, कशी दिसतील याची अचूक गणिते या सिद्धांताच्या आधारे आपण गेली तीनशे वर्षे करीत आहोत. असा आपला दावा आहे

ज्या माणसाला वेद म्हणजे काय आहे हे माहित नाही. ज्या माणसाला उपनिषदे म्हणजे काय हे माहित नाही. ज्या माणसाला प्राचीन भारतीय गणिती पद्धत म्हणजे काय हे माहित नाही. ज्या माणसाला प्राचीन भारतीय खगोलशास्त्र, अंतराळशास्त्र काय हे माहित नाही त्या माणसाला हा लेख वाचून विज्ञानाबद्दल प्रेमाचे भरते येणे स्वाभाविक आहे. परंतु हे सगळे अर्ध सत्य आहे. मध्यंतरी एका विद्वानाने अशीच टिप्पणी केली होती सगळे काही वेदात असेल तर तुम्ही पुढचे १० -१५ शोध आजच लावा कि, विज्ञान हे शोध लावण्याची वाट का पहात बसला आहात.

तर विज्ञान विरुद्ध प्राचीन भारतीय ज्ञान / अध्यात्म या विषयावर आपण मुद्देसूद, पुराव्यांच्या सह चर्चा करूया. विज्ञानाचे जे प्रेमी असतील त्यांनी आवर्जून हा लेख वाचावा माझ्या मुद्द्यांच्या बद्दल काही आक्षेप असतील ते नोंदवावे. आणि जर माझे मुद्दे योग्य असतील तर मान्य करण्याचा मोठेपणा सुद्धा दाखवावा.

१) https://www.speakingtree.in/…/mystery-behind-the-iro…/288949

या पेज ला भेट द्या. कुतुब मिनार च्या समोर एक लोहस्तंभ आहे. २२ फुट उंच सुमारे ६.५ टन वजन असणारा wrought iron अर्थात ओतीव लोखंडाचा बनलेला स्तंभ. ज्याचे वय कमीत कमी १६०० वर्षे आहे. ज्याच्यावर एक अत्यंत पातळ असे आवरण चढवले आहे ज्यामुळे गेली १६०० वर्षे या खांबाला गंज लागलेला नाही. आय आय टी कानपूर च्या धातू तज्ञांनी अभ्यास करून एका विशिष्ट रासायनिक प्रक्रियेचा उल्लेख केला आहे ज्याचे आवरण फक्त १० micron आहे त्यामुळे हा स्तंभ अजूनही गंज पकडत नाही.

आपल्या महान वैज्ञानिक प्रगती चे मापदंड असणाऱ्या कोट्यावधी रुपयांच्या कारला सुद्धा मुंबईच्या खाऱ्या वातावरणात ३ ते ५ वर्षात बुडाला भरपूर गंज लागतो आणि मुंबईतील जुनी कार नेहमीच निम्म्या किमतीला विकली जाते. १६०० वर्षांच्या पूर्वी जिवंत असणारी अंधश्रद्धाळू विज्ञान परान्मुख माणसे जे करून गेली आहेत त्याची नक्कल तरी करण्याची आजच्या वैज्ञानिकाची आणि त्यांच्या समर्थकांची तयारी आहे का ??

२) https://www.quora.com/What-is-so-unique-about-the-Lepakshi-…

लेपाक्षी मंदिर आंध्र प्रदेश. या मंदिरात एक दगडाचा स्तंभ ( column ) आहे तो अधांतरी आहे. त्या खांबाच्या खालून आपण एक इंच जाडीची कोणतीही वस्तू फिरवून त्याची खात्री करून घेऊ शकतो. याच पद्धतीचा दीपस्तंभ मी विजयनगर साम्राज्यात सुद्धा पहिला होता. एक मेकानिकल इंजिनियर म्हणून मी तो कसा बनवला असेल हे नक्की सांगू शकतो. सुमारे १० टन वजन असणारा एक २ फुट व्यास असणारा दगड घ्या. त्याच्यावर तुम्हाला हवे तसे नक्षीकाम करा ( सुमारे ५ ते १० वर्षे लागणार हे करायला पारंपारिक हत्यारे वापरून. ) नंतर त्या खांबाच्या एका बाजूला एक मोठे गोल भोक करा त्यात लोहकांत दगड ( चुंबकीय गुणधर्म असणारा दगड ) घट्ट ठोकून बसवा. नंतर जिथे हा स्तंभ उभा करायचा असेल तिथे जमिनीत या दगडाचे वारा, पाउस, उन, वादळ या सगळ्या प्रकारात सुद्धा रक्षण करू शकेल इतका मजबूत पायाचा दगड बसवा त्यात तितकाच मजबूत पायाचा लोहकांत दगड ठोकून बसवा. आता या दोन्ही लोह्कांत दगडांचा असा संयोग हवा कि त्यांनी परस्परांना दूर तर लोटले पाहिजे पण ते स्थिर सुद्धा राहिले पाहिजेत ( १० टन वजनाचा दगड घेऊन आजच्या कोणत्याही वैज्ञानिकाने हे करून दाखवावे ) मग खालील दगडावर हा वरील दगड ढकलत ढकलत आणा दोन्ही दगड एकमेकांच्या चुंबकीय क्षेत्रात आले कि ते स्थिर होतील. आणि नंतर १००० वर्ष तसेच राहतील.. ( अजून किती काळ राहतील ते माहित नाही ) असा अफलातून तंत्रज्ञानाचा वापर करणारी मंडळी निर्बुद्ध होती ? त्यांना विज्ञान तुमच्या न्यूटन पेक्षा कमी समजत होते असे तुमचे मत आहे का ? बर हे करणारी मंडळी कलाकार होती, शिल्पी होती, तुमच्या पुरोगामी भाषेत बहुजन.. ब्राह्मण सुद्धा नव्हती तरी त्यांचे गणित, विज्ञान आणि निसर्गाचा अभ्यास इतका पक्का होता कि ती मंडळी या गोष्टी लीलया करत होती.

३) महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर किरणोत्सव : आदिमाया महालक्ष्मीचे हे मंदिर कमीत कमी १००० वर्ष जुने आहे. या मंदिरात भूगोलाचा अभ्यास करून मुख्य द्वार असे बनवले आहे कि दर वर्षी विशिष्ट नक्षत्र असताना सूर्याचे पहिले किरण हे देवीच्या पायावर पडते आणि जसा सूर्य वर वर जातो ती किरणे तिच्या मुखापर्यंत पोचतात. हा सोहळा किरणोत्सव म्हणून ओळखला जातो. ज्या लोकांनी हे मंदिर बांधले त्यांचा भूगोल अत्यंत पक्का असल्या शिवाय आणि त्यांचे गणितीय ज्ञान अत्यंत चपखल असल्याशिवाय हे शक्य होऊ शकेल ? आज असेच एक मंदिर उभे करायचे ठरले तुमचे शास्त्रज्ञ सध्या ज्ञात असणारी साधने आणि तंत्रज्ञान घेऊन सुद्धा १००० वर्ष टिकेल अशी वस्तू निर्माण करू शकतील ? आणि याच पद्धतीचा किरणोत्सव तुमच्या न्यूटन च्या मूर्तीवर पाडून दाखवू शकतील ???

४) कैलाश मंदिर वेरूळ : वेरूळ येथील लेणीनच्या मध्ये असणारे कैलास मंदिर हे जगातील पहिले आधी कळस मग पाया या पद्धतीने बांधलेले मंदिर आहे. ७व्या शतकात बांधलेले हे मंदिर एकाच शीलाखंडाला पूर्णपणे कोरून बनवले आहे. कमीत कमी तीन पिढ्या या मंदिराच्या निर्मितीसाठी राबल्या आहेत. त्या काळातील लोकांना एकच इतका मोठा दगड कसा ओळखू आला असेल. त्याचे माप कसे कळले असेल कि त्यांनी बरोबर तीन मजली मंदिर उभे केले. आधी कळस मग पाया पद्धती वापरून बनवलेले हे एकमेव मंदिर म्हणजे शिल्पकलेचा आणि तत्कालीन लोकांच्या भूमीच्या गर्भाच्या अभ्यासाचा एक जिवंत नमुना आहे.

५) https://plus.google.com/10125792996259494…/posts/gTq2Jyaj8ga

बाण स्तंभ. सोरटी सोमनाथाचे कुप्रसिद्ध मंदिर आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे हे मंदिर गझनीच्या मोहमदने १७ वेळा लुटले होते. या मंदिरात एक बाणस्तंभ आहे. त्या स्तंभावर संस्कृत मध्ये असे कोरले आहे कि या स्तंभापासून अंतर्क्तिका पर्यंत सरळ रेषा मारली तर भूमी लागत नाही. या लेखासोबत त्याच्या लिंक सुद्धा दिल्या आहेत. गुगल map चा फोटो सुद्धा दिला आहे. त्या काळातील लोकांच्याकडे आज असणारी कोणतीही सामुग्री नसताना सुद्धा ते या पद्धतीची घोषणा कशी काय करू शकले असतील ? आज च्या विज्ञानाकडे याचे उत्तर आहे ?? त्यांनी नक्की कोणती यंत्रे, कोणती तंत्रे वापरली असतील ज्यामुळे त्यांना हे ज्ञान प्राप्त झाले ???

६) http://justfunfacts.com/interesting-facts-about-meenakshi-…/

मीनाक्षी टेम्पल मदुराई : सुमारे २५०० वर्ष जुने मंदिर. बांधकाम करताना ३० ते ३५ टन वजनाच्या शिळा हत्तींच्या सहाय्याने ढकलत आणून निर्मिती केलेली आहे. या मंदिरात सहस्त्रखंबी मंडप आहे. त्यात ९८५ खांब आहेत आणि त्यातील काही खांबांवर आपण नाणे वाजवले तर सा ते नि असे सप्तसूर ऐकू येतात. मी मध्यंतरी डिस्कव्हरी वर एक कार्यक्रम पाहिला होता ज्यात या मंदिराचे वर्णन आहे. त्यात त्यांना सुद्धा हाच प्रश्न पडला कि २५०० वर्षांच्या पूर्वी ३० टन वजनाचा दगड कसा हलवला असेल. त्या साठी त्यांनी एक दगड आणला सुमारे २५ टन वजनाचा कारण आजच्या वैज्ञानिक दृष्ट्या प्रगत भारतात दगड वाहण्यासाठी असणारा सगळ्यात मोठा ट्रेलर सुद्धा २५ टन वजनच वाहून नेऊ शकतो. आणि जुन्या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे त्यांनी लाकडी ओंडके तासून गोल केले त्यावर तो दगड टाकून त्यांनी हत्तींचा वापर करून ढकलून पहिले आणि त्यांना तसे करता आले . ( ज्याला आपण तरफ चे तत्व किंवा लिव्हर आर्म प्रिन्सिपल म्हणतो त्याच तत्वाचा वापर करून हि अत्यंत अवजड वस्तू हत्तींनी लीलया ढकलून दाखवली )

७) https://en.wikipedia.org/wiki/Konark_Sun_Temple

कोणार्क चे सूर्य मंदिर : संपूर्णपणे लोह्कांत दगड वापरून बनवलेले मंदिर म्हणजे कोणार्क चे सूर्य मंदिर. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे लोह्कांत दगड एकमेकांचे magnetic forces balance करून घट्ट बसवले होते. त्या नंतर त्यावर शिल्पे घडवली. मंदिराचा कळस हा सुद्धा लोह्कांत दर्जाचा होता आणि तो कळस संपूर्ण मंदिराचे magnetic forces control करत असे. या मंदिराच्या आत जे राशी चक्र काढले होते ते या पद्धतीचे होते कि रोज सूर्य उगवताना ज्या राशीत असेल त्या राशीवर बरोबर सूर्याचे पहिले किरण पडणार. अर्थात रोज राशी बदलला अनुसरून किरणांची जागा बदलणार. कल्पना करा याला भूगोल आणि स्थापत्याचा काय दर्जाचा अभ्यास लागला असेल.

या मंदिराची मला माहित असणारी कथा सांगतो. हे मंदिर समुद्र किनाऱ्याच्या जवळ आहे. आणि त्या भागात समुद्र किनारा अत्यंत खडकाळ आहे. या किनाऱ्याजवळ येणारी जहाजे त्यातील लोखंड या magnetic forces ने ओढली जाऊन खडकावर आपटून फुटून जात असत. ज्यावेळी वास्को द गामा भारतात आला त्याच्या दोन पैकी एका जहाजाचा याच पद्धतीने खडकावर आदळून अंत झाला. त्याला यात मंदिराचा काही तरी परिणाम आहे हे लक्षात आले त्याने जहाजावरून तोफा डागल्या. त्यामुळे मंदिराचा कळस निखळला. कळस निघाल्याने सगळे magnetic forces unbalance झाले आणि मंदिर जवळ जवळ उध्वस्त झाले. नंतर ब्रिटीश कालखंडात ब्रीतीशाना कल्पना होती कि आपण हे मंदिर पूर्ववत करू शकत नाही. त्यांनी मंदिराच्या गर्भगृहात चक्क कोन्क्रीट ठासून भरले.

आजच्या महान विज्ञान आणि वैज्ञानिकांना आवाहन आहे. ते कोन्क्रीट काढा आणि पुन्हा ते मंदिर पूर्ववत करून दाखवा.

८) https://en.wikipedia.org/wiki/Varāhamihira

हि माझी पोपटपंची नाही. विकिपीडियाच वराह मिहीर चे गणितातील योगदान सांगतो आहे. सदरील ऋषींच्या बद्दल अजून एक ज्ञात बाब म्हणजे ते सूक्ष्म देह धारण करून ( यावर विज्ञानाचा बिलकुल विश्वास नाही ) अंतराळात भ्रमण करत असे. आणि त्यांनी काही श्लोक लिहिले आहेत ज्यात त्यांनी तुम्ही अंतराळात प्रवास करत असला आणि तुम्हाला जिथे आहात तेथून सूर्य अथवा पृथ्वी दोन्ही सुद्धा दिसत नसेल तरीपण आपले लोकेशन ( स्थान ) कसे ओळखावे आणि प्रवास करावा यावर मार्गदर्शन केलेले आहे.

मध्यंतरी डिस्कव्हरीवर मंगलयान सफल झाल्यावर एक कार्यक्रम दाखवला गेला. त्यात नासा पहिली प्रयत्नात का अपयशी झाली याची चर्चा होती. आणि भारत का सफल झाला याचे सुद्धा विवरण होते. मंगलयान मंगल ग्रहाच्या कक्षेत स्थिर करताना एक समस्या वर सांगितल्या प्रमाणेच उद्भवली कि मंगल यान मंगल ग्रहाच्या उलट बाजूला होते. एका बाजूला सूर्य अन दुसऱ्या बाजूला पृथ्वी होती यानाला या पैकी काहीही दिसत नव्हते. या ठिकाणी वराह मिहीर ने सांगितलेली पद्धत वापरून प्रोग्राम बनवला होता आणि तो परफेक्ट होता त्या प्रमाणे मंगल यान सफलपणे मंगळावर उतरले.

९) http://www.ancientpages.com/…/atomic-theory-invented-2600-…/

आचार्य कणाद ज्यांनी अणु त्याच्या गर्भातील छोटे पार्टिकल यांच्यावर शास्त्रीय भाष्य केलेले आहे. आणि हा लेख वाचा. मी सांगत नाही तज्ञ अश्या पाश्चात्य विद्वानांनी सुद्धा यावर शिक्का मोर्तब केलेलं आहे.

१०) वैदिक गणित, आपले पंचांग आणि त्यावर आधारित पर्जन्य मानाचे अंदाज:

गणित हा भारतीयांनी जगाला दिलेला शोध आहे. शून्यावर आधारित गणमान पद्धती हि भारताची देण आहे. भारतातून हे ज्ञान मध्य पूर्वेला गेले अरब लोकांनी ते युरोपात नेले. त्यामुळे गणिताला युरोपियन लोक अरेबिक म्हणत आणि अरबी लोक हिंदसा म्हणत अर्थात हिंद मधून आलेली गणन पद्धत. यावर आधारित आपले पंचांग हे आज सुद्धा सगळ्यात परफेक्ट आहे. आपल्याकडे पर्जन्यमान दर्शवणारे जितके ग्रंथ आहेत ते नक्षत्रांची स्थिती आणि त्यानुसार पर्जन्य आणि येणारे पिक हा अंदाज वर्तवतात तो अंदाज आपल्या हवामान खात्याच्या अंदाजापेक्षा अधिक चांगला असतो.

११) ज्या विज्ञानाच्या यशाच्या आपण गप्पा मारत असतो त्याचा पाया उत्तम गणिती ज्ञान हा आहे आणि त्यात भारतीय खूप आधी पासून तज्ञ आहेत. आज तुम्ही गणिताचे ऑलिम्पियाड जिंकलेल्या कोणत्याही मुलाला विचारा तू काय करणार तो सांगतो मी पाय चे मूल्य अधिकाधिक चांगले मांडणार. पाय हा वर्तुळाचा व्यास मोजण्यासाठी वापरला जाणारा स्थिरांक आहे.

https://hindufocus.wordpress.com/…/the-sanskrit-verse-for-…/

http://www.sanskritimagazine.com/…/value-pi-upto-32-decima…/

पाय चे मूल्य ३२ अंशापर्यंत या श्लोकातून समजते. पाय चे मूल्य शुल्बसूत्रातून काढले गेले आहे. आधुनिक विज्ञानाने पाय चे मूल्य २२ अंशापर्यंत काढले आहे.

१२) आपण गणन करण्यासाठी जी पद्धत वापरतो त्यात इंग्रजी अक्षरात

trillion च्या पुढे गणना नाही. आपल्या पद्धतीत. पद्म, महापद्म, अर्व, खर्व पर्यंत गणन करण्यासाठी शब्द आहेत.

१३) https://www.speakingtree.in/…/from-kedarnath-to-rameswaram-…

प्राचीन भारतातील हि सात शिव मंदिरे एकाच अक्षांशाला संदर्भ घेऊन बांधली आहेत. सर्व मंदिरे एकमेकांच्या पासून कमीत कमी काही हजार किलोमीटर दूर आहेत. असे असताना त्यांना ती एका रांगेत बांधता आली याचा अर्थ त्यांचे भूगोलाचे आणि अक्षांश आणि रेखांशाचे ज्ञान किती परिपूर्ण होते याचे द्योतक आहे.

मी इथे दिलेली माहिती म्हणजे सागरातील काही थेंब आहेत. शक्यतो प्रत्येक मुद्याचे स्पष्टीकरण सुद्धा देण्याचा प्रयत्न केला आहे. आधुनिक विज्ञान म्हणजे कचरा आहे असे माझे बिलकुल मत नाही. आधुनिक विज्ञानाची दृष्टी वेगळी आहे. प्राचीन ऋषींची दृष्टी वेगळी होती. त्यांच्या दृष्टीत लोककल्याणाची तळमळ अधिक होती. त्यांची दृष्टी अधिक निसर्गपूरक होती. दुर्दैवाने सध्याचे विज्ञान हे निसर्गाला आव्हान देण्यासाठी विकसित होते आहे. भारतीय ऋषींनी विकसित केलेले विज्ञान हे निसर्ग आणि मानव यांनी शांततापूर्वक सहजीवन व्यतीत करावे असे होते.

याठिकाणी मला चीनमधील एक महान विचारवंत कान्फूशियस याचे एक वाक्य उधृत करायचे आहे. तुम्ही निसर्गाच्या नियमांना बांधील राहून काही निर्माण केले तर निसर्ग ते टिकण्यास मदत करतो. तुम्ही निसर्गाला आव्हान देऊन काही निर्माण केले तर निसर्ग ते उध्वस्त करण्याच्या उद्योगाला लागतो.

आपले आजचे विज्ञान असे संहारक होऊ लागले आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आपण पर्यावरणाच्या बदलांशी झुंजतो आहोत.

मी अध्यात्माच्या मार्गावर चालणारा एक छोटा पांथस्थ आहे. मला स्वतःला प्राचीन विज्ञान आणि अर्वाचीन विज्ञान असा लढा उभा करण्यात काहीही रस नाही.

पण इथे मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते आपल्या देशात चार प्रकारचे लोक आहेत. पहिल्या प्रकारात त्यांना भारतीय आणि त्यातल्यात्यात हिंदू म्हणून जन्माला आलो याची लाज वाटते. त्यांना आपले सगळे जुने ज्ञान म्हणजे कचरा वाटतो आणि ते पाश्चिमात्य ज्ञानाच्या प्रेमात पडलेले असतात. दुसऱ्या प्रकारातील लोक स्वार्थी असतात. त्यांना वेद आणि प्राचीन ज्ञान यातील शून्य माहिती असते परंतु काहीही असले तर ते वेदात आहे म्हणून हि मंडळी ठोकून मोकळी होतात. त्यांचे वेद आणि प्राचीन ज्ञानाच्या बद्दलचे प्रेम बेगडी आणि स्वतःची तुंबडी भरणारे आहे. तिसऱ्या प्रकारातील लोक श्रद्धाळू असतात. लोक म्हणतात म्हणजे वेदात काही तरी भारी असेल असा विचार करून ते गप्प बसतात हि पाप भीरु मंडळी असतात. आणि स्वार्थी लोक यांनाच फसवतात. चौथ्या प्रकारात माझ्या सारखे लोक असतात. जे आपली मती वापरून या प्राचीन ज्ञान सागरातील एक दोन थेंब जरी मिळवता आले तरी त्याची चव कृतज्ञपणे चाखतात...

माझा लेख सर्वत्र प्रसारित करण्यास काहीही हरकत नाही..

सुजीत भोगले