पाया : कवी : विंदा करंदीकर : 'विरूपिका' मधून
(कविता आठवली तशी लिहिली आहे)
मित्रा, माझा आशावाद दोन पायांवर उभा नसून चारशे चाळीस पायांवर उभा आहे.
कसा ते ऐक,
तरुणांना भडकाविल्याच्या आरोपाखाली सोक्रेटीसवर अथेन्सच्या न्यायालयात खटला झाला
आणि त्याला विषाचा प्याला घेण्याची शिक्षा झाली
(ती त्याने कशी भोगली ते प्लेटोला विचार, ते विषयांतर होईल)
पण सारे काही एवढ्यावरच संपलेले नाही.
त्या खटल्यातील पाचशे ज्युरींपैकी दोनशे वीस ज्युरींनी त्याला निर्दोष ठरविले.
(त्यांना कधीकधी भेटावेसे वाटते, पण ते विषयांतर झाले)
मित्रा, माझा आशावाद सोक्रेटीसवरच्या दोन पायांवर उभा नसून
त्या दोनशेवीस ज्युरींच्या चारशे चाळीस पायांवर उभा आहे.

No comments:
Post a Comment