Saturday, October 15, 2016

सप्त पाताळ

आपल्या संस्कृतीत सप्त पाताळांचा उल्लेख आहे. पाताळ लोक हे सात  असून खाली  असल्याचे म्हटले आहे. अनेकांना त्यामुळे ही पाताळे जमिनीखाली असल्याचे वाटते आणि म्हणूनच ही काही कविकाल्पना असावी असे वाटते. परंतु माझ्या लहानपणीच मी पाताळे दक्षिणेकडील खंड असल्याचे ऐकले होते. (दक्षिण दिशा नकाशात खाली असते) यापैकी ऑस्ट्रेलिया आणि द. अमेरिका ही काही पाताळे असल्याचे मला  सांगितले गेले होते.

मोठा झाल्यावर सुदैवाने कामानिमित्ताने जगप्रवास करण्याची आणि अनेक संस्कृती जवळून बघण्याची संधी मिळाली. भारतीय प्राचीन साहित्याची गोडी होतीच. म्हणून पाताळ प्रदेशासंबंधी प्राचीन साहित्यातील उल्लेख आणि या प्रदेशातील माणसे/संस्कृती  यांचा तुलनात्मक अभ्यासही करता आला.

पाताळे ही सात आहेत. पूर्वीच्या समजुतीप्रमाणे पृथ्वीचे खंड सात आहेत.
ही  सात पाताळे पुढील प्रमाणे 
अतल -
येथे मयाचा पुत्र बल याचे वास्तव्य आहे. त्याने ९६ माया निर्माण केल्या आहेत.२) वितल -येथे भगवान शंकर हाटकेश्वर नाव धारण करून आपल्या गणांसह व भवानीसह रहातात. प्रजापतीने निर्माण केलेल्या सृष्टीची वृध्दी करीत तो तिथेच असतो.३) सुतल -येथे बलीराजा नित्य वास्तव्य करीत असतो. भगवान त्रिविक्रमाने त्याला सर्व लक्ष्मी अर्पण केली आहे. बली येथे भगवंताची आराधना करतो. प्रत्यक्ष भगवान हरि त्याचा द्वाररक्षक आहे.४) तलातल -येथे महाबलाढ्य असूरश्रेष्ठ मय वास्तव्य करीत असतो. त्याच्यावर कल्याणकारी शंकराचा वरदहस्त आहे. तो मायावी राक्षसांना नित्य पूजनीय आहे.५) महातल -येथे सर्व सर्पांचा परिवार रहात असतो. सर्व सर्प सामर्थ्यसंपन्न व क्रूर आहेत.६) रसातल -येथे बलश्रेष्ठ व साहसी असुर राहातात.७) पाताल -येथे नागलोकांचे स्वामी व श्रेष्ठ नाग राहातात. हे अत्यंत रागीट, प्रचंड शरीराचे व अति विषारी आहेत.या पाताळाच्या मूल प्रदेशात भगवानाची अनंत नावाची अतिशय तामसी कला आहे. हा सामर्थ्यसंपन्न, उदार, असंख्य गुणांचा साठाच आहे.


वरीलपैकी अतल आणि तलातल यथे मय आणि त्याच्या मुलाची सत्ता होती. मेक्सिको आणि दक्षिण अमेरिकेतील प्राचीन संस्कृती 'मायन संस्कृती' या नावाने ओळखली जाते. या  संस्कृतीच्या फारशी माहिती नाही. मयाच्या नावावरूनच हे नाव आले हे उघड आहे. मायन राजाचे अकबराच्या काळात भारतीय राज्याशी संबंध असल्याचे पुरावे मिळाले आहेत. मेक्सिकोतील माणसे भारतीय माणसांसारखीच दिसतात. तेथे सर्व पुरुष मिशा राखतात (अमेरिकेत मिशा ठेवत नाहीत). मेक्शिकन जेवण भारतीय जेवणासारखेच असते. ते पोळपाट लाटणे वापरून चपात्या बनवितात (त्याला tortile म्हणतात). हे Tortille गव्हाचे असतात. त्यांच्या जेवणात कोशिंबिरी, चटण्या, आमट्या असतात. मी मेक्सिकोत असताना तेथील कंपनीतील रीसेप्शानिस्ट मी मेक्सिकन नाही हे मान्य करण्यास तयार नव्हती.

ऑस्ट्रेलियातील मूळ रहिवाशी (ज्याला aborigines म्हणतात) भारतीय संस्कृतीचे जवळचे आहेत. ते निसर्ग पूजक आहेत. जमिनीला ते देव मानतात. त्यांचे पूर्वज पाणी असलेल्या ठिकाणी (waterhole) त्यांना भेटण्यास येतात अशी त्यांची श्रद्धा आहे.

यावरून ऑस्ट्रेलिया आणि द. अमेरिका हे पाताळ लोकांपैकी असावेत असे दिसते. बळीराजालाही अशाच एका खंडावर पाठविले असावे.