Sunday, September 3, 2017

व्यूहरचना

महाभारत वाचताना चक्रव्यूहाचा उल्लेख येतो. आपणापैकी अनेकांना माहित आहे की अभिमन्यूचा मुलगा अभिमन्यू कौरवांनी लावलेल्या चक्रव्युहात शिरला होता. परंतु त्यातून बाहेर कसे पडायचे याचे ज्ञान नसल्याने तो तेथेच मारला गेला.
युद्धात एका विशिष्ट पद्धतीने सैनिकांना उभे करणे याला व्यूह म्हणत असत. यात सैनिक कसे उभे आहेत, विविध सैन्यविभाग (पायदळ, घोडदळ इत्यादी) कोठे आहेत, सेनानायक कोठे असतील, जेव्हा कूच करण्याची वेळ येईल तेव्हा कोण कसे जाईल याची सर्व नियोजन या व्युहरचनेत असे. दोन्ही बाजूंच्या सेना रोज वेगवेगळे व्यूह रची असत आणि त्यासंबंधी अतिशय गुप्तता बाळगली जात असे.
एखाद्या सैन्याने एक व्यूहरचना केल्यास दुसरा पक्ष त्या व्युहाला भगदाड पाडू शकेल अशी व्युहरचना करून शत्रूवर चालून जात असे. काही प्रमाणात बुद्धिबळात वापरल्या जाणाऱ्या व्युहाप्रमाणेच हे असे.
महाभारत युद्ध अठरा दिवस चालले. यात प्रचंड प्रमाणात नरसंहार झाला.  कौरव आणि पांडव यांच्या वंशातील फक्त पाच पांडव आणि अर्जुनाचा नातू (अभिमान्युचा मुलगा) परीक्षित हे पुरूषच युद्धसमाप्तीनंतर जिवंत राहिले. परीक्षित हा ही मातेच्या उदरात होता आणि अपुऱ्या दिवसांचा मृतवत जन्मला. कृष्णाने उपाय केल्याने तो वाचला. परंतु त्याची प्रकृती क्षीण राहिली. महाभारत युद्धात भारतवर्षातील (अफगाणिस्तान पासून उत्तरपूर्व राज्यांपर्यंत) बहुतेक सर्व राज्ये सामील झाली होती. या अतिप्रचंड नरसंहारामुळे (युद्धानंतर पांडवांची सर्व सेना अश्वत्थामाने ब्रम्हास्त्र टाकून मारली. कौरवांची सेना युद्धातच मारली गेली) भारतवर्षात पुरुषांची संख्या अत्यंत कमी झाली. याचे परिणाम भारताला पुढील हजार वर्षे भोगावे लागले.
महाभारत युद्धात पुढील व्यूह वापरले गेले.

  1. चक्रव्यूह
  2. वज्र व्यूह
  3. क्रौंच व्यूह
  4. अर्धचन्द्र व्यूह
  5. मंडल व्यूह
  6. चक्रशकट व्यूह
  7. मगर व्यूह
  8. औरमी व्यूह
  9. गरुड़ व्यूह
  10. श्रीन्गातका व्यूह
या व्युहांची माहिती पुढील लेखांत घेऊ.
Image result for महाभारत व्यूह रचना