आजपर्यंत वार ही पाश्चिमात्य कल्पना असून त्याला शास्त्रीय (खगोलशास्त्रीय) आधार नाही अशी माझी कल्पना होती.
परंतु फेसबुकवरील NL Soli यांच्याकडून मौल्यवान माहिती मिळाली.
ती आपल्यापर्यंत पोचविण्यासाठी हा प्रयत्न
-----------------------------------------------------------------------------
वार (आणि तास) हा प्राचीन भारताने जगाला दिलेला विचार आहे. होरा या कालविभागापासून वाराची उत्पत्ती झाली. एका अहोरात्रीचे म्हणजे दिवसाचे २४ समान भाग केले असता त्यातील एक भाग म्हणजे होरा. 'होरा' या शब्दाचा अपभ्रंश होऊन इंग्रजीत Hour हा शब्द आला. प्रत्येक होर्याला कुठलातरी ग्रह अधिपती (होरेश) असतो. त्याचे नांव वाराला दिले आहे.
सूर्यसिद्धान्त या ग्रंथात भूगोलाध्याय या विभागात पुढील वर्णन आहे.
मन्दादधः: क्रमेण स्युश्चतुर्था दिवसाधिपा:। होरेशा: सूर्यतनयादधोधः क्रमशस्तथा॥
तसेच "उदयात् उदयेत् वारः" एका सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंतचा कालावधी तो वार असा या सूत्राचा अर्थ आहे.
धार्मिक सोयींसाठी हिंदू पंचांगात सूर्योदयापासून दिवसाचा व वाराचा प्रारंभ होतो असे समजले जाते. मुसलमानी हिजरी पद्धतीनुसार सूर्यास्ताला नवीन वार सुरू होतो तर, इंग्रजी गेगोरियन आंतरराष्ट्रीय कालगणनेनुसार मध्यरात्री बारा वाजता नवीन वाराची सुरुवात होते. असे असले तरी, तिन्ही पद्धतींनुसार सूयोदयापासून सूर्यास्तापर्यंत एकच एक समान वार असतो.
"आमंदात् शीघ्रपर्यंतम् होरेशा:" असे वारांचे सूत्र आहे. म्हणजे मंद ग्रहापासून शीघ्र ग्रहापर्यंत होर्यानुसार.
मंदग्रह ते शीघ्र ग्रह असे आहेत --

- शनी
- गुरू
- मंगळ
- रवी
- शुक्र
- बुध
- चंद्र
प्रत्येक ग्रहाचा एक होरा असतो.
शनिवारी पहिला होरा अथवा तास हा शनीचा, पुढील तास गुरूचा, तिसरा मंगळाचा, चौथा रवीचा, पाचवा शुक्राचा, सहावा बुधाचा, सातवा चंद्राचा. याप्रमाणे तीन वेळा २१ होरे झाल्यावर २२वा पुन्हा शनीचा, २३वा गुरूचा, २४वा मंगळाचा येतो. असे २४ तास पूर्ण होतात. त्यानंतर दुसरा दिवस रवीच्या होर्याने सुरू होतो शनिवारनंतर रविवार येतो. पुन्हा २४ होरे मोजले की तिसर्र्या दिवसाचा पहिला होरा चंद्राचा म्हणजे सोमाचा. म्हणून रविवारनंतरचा वार सोमवार.
No comments:
Post a Comment