Monday, August 21, 2017

धबाबा लोटल्या धारा

गिरीचे मस्तकी गंगा। तेथुनी चालिली बळे ।
धबाबा लोटल्या धारा । धबाबा तोय आदळे ।।

गर्जतो मेघ तो सिंधू । ध्वनिकल्लोळ उठीला ।
कडय़ासी आदळे धारा । वात आवर्त होतसे ।।

तुषार उठती रेणू । दुसरे रज माजले ।
वात मिश्रीत ते रेणू । सीत मिश्रीत धुकटे ।।

कर्दमू निवडेना तो । मनासी साकडे पडे ।
विशाल लोटली धारा । ती खाली रम्य विवरे ।।




No comments:

Post a Comment