Saturday, August 20, 2016

कृष्ण : एक कुशल नेता

मागील वर्षी गोकुळाष्टमीच्या सुमारास 'विकास पुरुष' कृष्णाबद्दल माहिती घेतली. यादवांचे गोकुळातून द्वारकेच्या बंदरावर स्थलांतर हे त्यांना त्यांच्या गोपालनाच्या व्यवसायातून बाहेर काढून आयात-निर्यातीच्या व्यापारात आणण्यासाठी उपयुक्त ठरले आणि अल्पावधीतच द्वारका सोन्याची झाली.

कृष्णाचे युद्धतंत्रही अद्वितीय होते. दुर्योधनाने महाभारत युद्धात यादव सेना घेतली आणि कृष्ण अर्जुनाचा सारथी बनला. युद्धात सेनेपेक्षा नेतृत्व महत्वाचे ठरते हे अर्जुनाला पूर्णपणे माहित होते. दुर्योधनाने हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर घेतले पण त्या हार्डवेअर/सॉफ्टवेअरचा निर्माता अर्जुनाकडे ठेवला. या निर्मात्याला हे हार्डवेअर/सॉफ्टवेअर कसे जॅम करायचे याची माहिती असणार हे दुर्योधन विसरला.

या युद्धात बलरामाची सहानुभूती दुर्योधनाकडे होती. यादवांच्या सेनेचे नेतृत्व बलरामाने केले असते. अशा परिस्थितीत ही सेना पांडवांना भारी ठरू शकली असती. कृष्णाने बलरामाला पटवून दिले की ही युद्ध अधर्माने होणार आहे आणि त्याच्यासारख्या धार्मिक माणसाने त्यापासून दूर राहिले पाहिजे. बलराम त्यामुळे तीर्थयात्रेला निघून गेला.

युद्धापूर्वीच कृष्णाने पुर्वेपासुन पश्चिमेपर्यंत स्वत: आणि पांडवांना लग्नसंबंध जोडून आपलेसे करून घेतले होते. जरासंधाचे मगध हे अत्यंत बळकट साम्राज्य होते. भरतील अनेक राज्ये त्यांना खंडणी देत असत. अनेक राजांना जरासंधाने तुरुंगात ठेवले होते. कंस हा 'शूरसेन' या यादवांच्या संस्थानाचा राजा होताच, पण जरासंधाचा सेनापती होता. त्याला मारून कृष्णाने जरासंधाशी वैर घेतले होते. जरासंधाशी कृष्णाशी अठरा युद्धेही झाली होती आणि प्रत्येक युद्धात कृष्णाला काही प्रदेश गमवावा लागला होता (गोकुळ द्वारकेला हलविण्यामागे हे  ही एक कारण होते). मगध साम्राज्याशी युद्ध करणे शहाणपणा नसल्याने राजसूय यज्ञ प्रसंगी कृष्णाने जरासंधाला भीम अथवा अर्जुनाशी एकट्याने मल्लयुद्ध करण्याचे आव्हान दिले. कृष्णाला माहित होते की जरासंध अर्जुनाला आपल्यासामान लेखित नाही. अपेक्षेप्रमाणे त्याने भीमाशी मल्लयुद्धाचे आव्हान स्वीकारले आणि भीमाने त्यात जरासंधाला ठार मारले. कृष्णाने जरासंधाच्या मुलाला राज्यावर बसविले आणि एक प्रबळ साम्राज्य आपल्या मित्रांच्या यादीत जोडले. तसेच जरासंधाने बंदिवासात ठेवलेल्या राजांना सोडून दिले आणि त्यांना मित्र बनविले. याच राजसूय यज्ञात कृष्णाने जरासंधाचा तेव्हाचा (कंसानंतर झालेला) सेनापती जयद्रथ यालाही एकट्याला गाठून मारले.

राजसूय यज्ञापूर्वी झालेले प्रबळ यवन राजा (यवन प्रदेशातील राजा - सोबतचा नकाशा पहा) कालयवन  याचे  आक्रमण त्याने कसे थोपविले हे मागील लेखात विस्तृत लिहिले आहे.

कृष्णाचे हेरखातेही सक्षम होते. युद्धाला दहा दिवस लोटले तरी एकही पांडव ठार झाला नाही हे पाहून दुर्योधन अस्वस्थ झाला. त्याने कौरवांचे सेनापती पितामह भीष्म यांची भेट घेऊन निर्भत्सना केली. भीष्मांना पांडव जवळचे वाटत असल्यानेच ते मनापासून युद्ध करीत नाहीत असे वक्तव्य केले. यामुळे भीष्म व्यथित झाले. त्यांनी एका दिवसात सर्व पांडवांना ठार मरीन अथवा सेनापतीपद सोडेन अशी प्रतिज्ञा केली. आपल्या हेरांकरवी कृष्णाला हे कळताच तो चिंतीत झाला. भीष्मांच्या युद्धकौशल्याची त्याला कल्पना होती. तसेच 'भीष्मप्रतिज्ञा' ही  काय चीज असते हे ही त्याला माहित होते. त्याने द्रौपदीबरोबर भीष्मांना भेटण्याचे ठरविले. कौरवांच्या छावणीत हेरांचा सुळसुळाट असल्याने कोणालाही प्रवेश नव्हता. कृष्णाने एका गरीब शेतकऱ्याचा वेश घेतला. द्रौपदीलाही शेतकरणीचा वेश दिला. ते दोघे भीष्मांच्या छावणीत प्रवेश करू लागले. द्वारपालांनी त्यांना अडविले. कृष्णाने गयावया केल्या. परंतु द्वारपालाने त्याला लाथा-बुक्क्यांनी मारले. नंतर दया येऊन फक्त द्रौपदीला आत सोडले. आत भीष्म ध्यानस्त बसले होते. द्रौपदीने त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार केला. इतक्या रात्री दुर्योधानाचीच पत्नी आली असणार असे समजून भीष्मांनी 'सौभाग्यवती भव' असा आशीर्वाद दिला. डोळे उघडल्यावर त्यांनी द्रौपदीला ओळखले. कोणाबरोबर इतक्या रात्री आलीस असे विचारल्यावर तिने 'एका शेतकऱ्याबरोबर' असे उत्तर दिले. परंतु भीष्मांनी ओळखले. त्यांनी छावणीबाहेर येऊन कृष्णाचे पाय धरले आणि सन्मानाने आत नेले. भीष्मांनी द्रौपदीला 'सौभाग्यवती भव' आशीर्वाद दिल्याने तो खोटा ठरणार नाही असे कृष्णाने भीष्माचार्यांना सांगितले. भीष्मांनी तर दुसऱ्या दिवशी सर्व पांडवांना मारण्याची प्रतिज्ञा घेतली होती. आणि भीष्म हे पराक्रमात पांडवांना भारी ठरणारे होते. त्यामुळे कृष्णाने उपाय विचारला. तेव्हा शिखंडीआडून अर्जुनाने बाण सोडल्यास भीष्म प्रतिकार करणार नाहीत असे भीष्मांनी सांगितले. 'शिखंडी तारुण्यात येईपर्यंत स्त्री म्हणून वाढला. नंतर एका यक्षाने त्याला पौरुषत्व दिले. पण भीष्म त्याला 'स्त्री ' मानीत असल्याने ते शिखंडीवर बाण सोडणार नाहीत'  असे भीष्मांनी कृष्णाला सांगितले. या रहस्याचा वापर करून कृष्णाने भीष्मांना शरपंजरी केले.

यानंतर कौरवांचा सेनापती झालेल्या कर्णावर (तेव्हाच्या युद्धशास्त्राच्या नियमाविरुद्ध जावून) तो नि:शस्त्र अवस्थेत असताना आणि रथातून पायउतार झालेल्या अवस्थेत बाण सोडण्यास अर्जुनाला सांगितले.

त्यानंतर कौरवांचा सेनापती झालेल्या द्रोणांवर अश्वत्थामा गेल्याचे धर्माकडून वदवून ते नि:शस्त्र अवस्थेत प्रार्थना करीत असता दृश्द्युम्नामार्फत हल्ला करून मारले. यावेळी भीम आणि अन्य पांडव दृष्ट्द्युम्नावर धावून गेले. परंतु कृष्णाने त्यांना आवरले.

युद्धाच्या समाप्तीनंतर दुर्योधन हा एकाच कौरव जिवंत राहिला होता. कृष्णाने त्याला भीमाबरोबर गदायुद्धाचे आव्हान दिले. यात दुर्योधनाची जीत होते आहे असे दिसल्यावर त्याने भीमाला कमरेखाली गदा मारण्याची खुण केली आणि भीमाने दुर्योधनाला मारले. या अधर्माने झालेल्या गदायुद्धाने या युद्धाचा पंच असलेला बलराम खवळला आणि भीमाला मारण्यास धावला. परंतु कृष्णाने त्याला आवरले.

युद्ध केवळ पराक्रमाने नव्हे तर पद्धतशीर योजना आखून जिंकता येते याची जाणीव असलेला कृष्ण महाभारतात एक यशस्वी नेता म्हणूनच वावरतो.




Friday, August 12, 2016

भाारत

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ही पोस्ट..........
857 ते 1947 पर्यंत अखंड भारत सात देशांत विभागला गेला. वर्ष
1947 मध्ये झालेली भारत पाकिस्तान फाळणी ही मागील
2500 वर्षांतील देशाची 24 वीं फाळणी होती.
इतिहासात हा उल्लेखच नाही
ज्या राजांनी, शक्तींनी मागील 2500 हजार वर्षांत
भारतावर आक्रमण केले त्यांनी अफगानिस्तान, मॅनमार,
श्रीलंका, नेपाळ, तिबेत, भूटान, पाकिस्तान, मालद्वीप
किंवा बांग्लादेशावर आक्रमण केल्याचा उल्लेख
इतिहासातील कुठल्याच ग्रंथात नाही. त्यामुळे हे देश म्हणून
अखंड भारत असावे याला पुष्टी मिळते. पाकिस्तान आणि
बंगलादेशाची निर्मिती कशी झाली याचा इतिहास
सर्वांनाच माहिती आहे. परंतु, भारताचे तुकडे होऊन इतर देश कसे
निर्माण झाले, याची फारशी माहिती कुणाला नाही.
अशी होती अखंड भारताची सीमा
उत्तरेकडे हिमालय आणि दक्षिणेकडे हिंद महासागर या
भारताच्या सीमा होत्या, असा उल्लेख प्राचीन इतिहासात
आहे. परंतु, पूर्व आणि पश्चिमेच्या सीमेची काहीही माहिती
नाही. कैलास मानसरोवरवरून पूर्वेकडे गेले की, आताचा
इंडोनेशिया आणि पश्चिमेकडे गेले की इराण हा आर्यान प्रदेश
हिमालयाच्या अंतिम टोकाला आहे. अॅटलस यांच्या
मतानुसार, जेव्हा आपण पूर्व व पश्चिमेकडून श्रीलंका किंवा
कन्याकुमारीला पाहू तेव्हा लक्षात येईल की, हिंद महासागर
हा इंडोनेशिया व आर्यान (इराण) पर्यंतच आहे. या संगमानंतर
महासागराचे नाव बदलते. या प्रकारे हिमालय, हिंद महासागर,
आर्यान (इराण) आणि इंडोनेशियाच्या मधातील संपूर्ण भू-
भागाला हा आर्यावर्त किंवा भारतवर्ष असे म्हटले जात असे.
आतापर्यंत 24 विभाजन
राइट विंग इतिहासकारांनुसार, वर्ष 1947 मध्ये भारत-पाक
फाळणी झाली. मागील 2500 वर्षांत हे भारताचे 24 वे
विभाजन होते. इंग्रजांच्या उल्लेखानुसार 1857 ते 1947 पर्यंत
भारताची ही सातवी फाळणी आहे. 1857 मध्ये भारताचे
क्षेत्रफळ 83 लाख वर्ग किमी होते. आताचे क्षेत्रफळ 33 लाख
वर्ग किमी आहे. भारताच्या शेजारील राष्ट्रांचे क्षेत्रफळ 50
लाख वर्ग किमी आहे.
काय आहे अखंड भारत
आज भारताच्या चारही बाजूने असलेले देशांत 1800 वर्षांपूर्वी
बोली, संस्कृती, नृत्य, पूजापाठ, पंथ, वेशभूषा, संगीत सर्वच
भारतासाखरे होते. परंतु, परराष्ट्राचा संपर्क आल्याने त्यांची
संस्कृती बदलली.
2500 वर्षांत भारतावर झालेले हल्ले
मागील 2500 वर्षांत भारतावर अनेक अक्रमणे झाली. यामध्ये
यूनानी, यवन, हूण, शक, कुषाण, र्तगाली, फ्रेंच, डच आणि
इंग्रेजांचा समावेश आहे. या सर्वांत इतिसाहात उल्लेख आहे.
परंतु, या काळात अफगानिस्तान, मॅनमार, श्रीलंका, नेपाळ,
तिब्बेट, भूटान, पाकिस्तान, मालद्वीप किंवा बांग्लादेशावर
आक्रमण झाल्याचा उल्लेख नाही.
रशिया आणि इंग्रजांनी बनवला अफगानिस्तान
26 मे 1876 रोजी रशिया आणि ब्रिटिश शासनामध्ये 'गंडामक
संधी' नावाचा करार झाला. त्या आधारे अफगानिस्तान
नावाचा नवा देश स्थापन झाला. पूर्वी हा देश भारताचाच
भाग होता. या करारामुळे तो भारतापासून वेगळा झाला. या
प्रदेशात राहणारे प्राचीन काळात शैव पंथीय होते. नंतर त्यांनी
बुद्ध धम्म स्वीकारला. पुढे ते मुस्लीम झाले. सम्राट शाहजहान,
शेरशाह सुरी आणि महाराजा रणजित सिंह यांच्या
शासनकाळात कंधार (गंधार) चा स्पष्ट उल्लेख आहे.
1904 मध्ये दिला स्वतंत्र देशाचा दर्जा
पृथ्वी नारायण शाह यांनी मध्य हिमालयाच्या परिरातील
लहान लहान 46 राज्यांना एकत्र करून नेपाळ नावाचे राज्य
तयार केले होते. इंग्रजांनी वर्ष 1904 मध्ये या डोंगरवस्तीतील
राजांसोबत करार करून नेपाळला स्वतंत्र देशाचा दर्जा प्रदान
केला. या प्रकारे नेपाळचे भारतापासून विभागाजन झाले.
इंग्रजांच्या खेळीमुळे भूटान भारतापासून वेगळे
1906 मध्ये इंग्राजांनी भारताच्या ज्या भागाला
भारतापासून तोडले. तोच आज भूटान. इसवी सन सहाव्या
शतकापासून या देशाने बौद्ध धर्माचा अंगीकार केला.
कसा तयार झाला तिबेट
वर्ष 1914 मध्ये तिबेटला केवळ एक पक्ष मानत भारतातील
ब्रिटिश सरकार आणि चीनमध्ये एक करार झाला. त्या अंतर्गत
तिबेटला एक बफर राज्य म्हणून मान्यता देताना हिमालयला
विभाजित करण्यासाठी मॅकमोहन रेषा निर्माण करण्याचा
निर्णय झाला. यामध्ये हिमालयाची वाटणी करण्याचाही
डाव रचण्यात आला. पुढे चीनच्या साम्रज्यवादी भूमिकेमुळे
हा भाग चीनच्या ताब्यात गेला.
इंग्रजांनी दिली मान्यता
आपल्या नौसेनेला बळ देण्यासाठी इंग्रजांनी श्रीलंका आणि
नंतर मॅनमारला वेगळा देश म्हणून मान्यता दिली. ऐतिहासिक
आणि सांस्कृतिकदृष्ट्या हे दोन्ही देश भारताचा भाग होते.
भाषिक अस्मितेमुळे बंगलादेश
धर्माच्या आधारे 1947 मध्ये पाकिस्तानची निर्मिती झाली.
मात्र, पुढे भाषिक अस्मितेमुळे बंगाल भाषिकांनी 16 डिसेंबर
1971 ला पाकिस्तानपासून तुटून बांगलादेशाच्या
नावाखाली वेगळा देश निर्माण केला.

Saturday, April 9, 2016

श्री राम

राम हा भारतीय संस्कृतीत अंशावतार मनाला जातो. त्याला मर्यादापुरुषोत्तम म्हणूनही ओळखले जाते. सामाजिक रुढींची बंधने पाळणारा आणि त्या चौकटीत राहून आपले अवतार कार्य करणारा अशी रामाची ओळख सांगता येईल. या दृष्टीने पूर्णावतार असणाऱ्या कृष्णाहून तो वेगळा ओळखता येतो.

श्री राम म्हटले की प्रथम डोळ्यापुढे येतो तो वडिलांची आज्ञा प्रमाण मानून वनवासाला निघणारा राम. यावेळी खरे तर त्याने वडिलांची अन्यायकारक आज्ञा धुडकावून लावली असती तरी प्रजाजन त्याच्या बरोबर होते. परंतु त्याने सामाजिक रूढींना प्रमाण मानत वनवास पत्करला.

यावेळी येथील वैदिक समाज आणि अवैदिक जनसमूह यांच्यातील संघर्ष पराकोटीला पेटलेला दिसतो. म्हणूनच दक्षिणेतील वनात राहणारा अवैदिक समाज (ज्याला असुर म्हणूनही संबोधले जाते) वैदिकांचे वनात येऊन राहणे हा त्यांच्या संस्कृतीवरील हल्ला मानीत होता आणि त्यांचे यज्ञ उध्वस्त करीत होता. या असुरांकडे लढण्याची अस्त्रे म्हणजे परशु, भाले अशी जवळून लढण्याची अस्त्रे होती तर रामासाराख्या वैदिकांकडे लाबून लढाई करता येण्यासाखी धनुष्य-बाणासारखी अस्त्रे होती. राम हा धनुष्य चालविण्यात तरबेज असल्याने वैदिक ऋषी त्याच्याकडे तारणहार म्हणून बघत असत.

यावेळी  दक्षिणेकडे असुर राज्यांचे प्राबल्य होते. उत्तरेकडील अत्यंत प्रबळ असे मगधेचे असुर साम्राज्य बळीराजाला फसवून वैदिकांनी आधीच  ताब्यात  घेतले  होते. दक्षिणेकडे लंकेत पराक्रमी रावण राज्य करीत होता. त्याच्या उत्तरेला वालीचे साम्राज्य होते. दंडकारण्य परिसरात रावणाची बहिण शूर्पणखा राज्य करीत होती (शूर्पारक बंदराचे नाव त्यावरूनच आले असावे). आंध्र, ओरिसा बंगाल परिसरात बळीचे वंशज (औड्र, पौंड्र) राज्य करीत होते.  दंडकारण्यातील ऋषींच्या आश्रमावर असुरांचे  हल्ले  होत  होते. अशावेळी राम आपल्या  बायको  आणि  भावासह या अरण्यात वनवासाला आले. त्यावेळची ही भू-राजकीय परिस्थिती विचारात घेतली तरच रामाच्या पराक्रमाचे महत्व वैदिकांना का वाटले  आणि रामाची अवतारात गणना कशी झाली हे लक्षात येते.

सुरुवातीलाच रामाने शूर्पणखेचे नाक कापून रावणाला आव्हान दिले. त्याकाळी असुरांमध्ये असलेल्या परंपरेत (आणि वैदिकांतही बहुपत्नीत्वाची पद्धत होतीच) शुर्पणखेची मागणी अयोग्य नव्हती. यज्ञात व्यत्यय आणणाऱ्या असुरांबरोबर कोठलीही  सोयरिक  रामाला  मान्य  नसावी. रामाने तिची खोडी  काढली  आणि नंतर नाक कापले. 'नाक कापणे' ही  येथील  परंपरेनुसार अपमान करण्याची परमावधी होती. याद्वारे रामाने रावणाला आव्हान दिले. याला उत्तर म्हणून रावणाने सीतेला पळविले. रावण हा नितीमत्ता पालनाचे आदर्श असलेल्या असुर कुळातील होता, शंकराचा भक्त होता, ध्यानी होता हे येथे लक्षात घेतले पाहिजे. म्हणूनच त्याने सीतेला बंदिवासात ठेवली परंतु कोठलेही अत्याचार केले  नाहीत.

रावणाने सीतेला पळविल्याने रामाचे आव्हान स्वीकारल्याचे स्पष्ट झाले होते आणि आता रामाला माघार घेणे शक्य नव्हते. बरोबर सेना नसताना रावणाच्या बलाढ्य सेनेशी सामना करायचा होता. यात त्याला सुग्रीवाची मदत झाली. वाली-सुग्रीव हे येथील अवैदिक परंपरेतील जनसमुहांमध्ये (वानर) होते. कोणालाही फसविणे हे त्यांच्या नीतिमत्तेत बसत नव्हते. परंतु रामाने सुग्रीवाचा पराभव होत आहे हे दिसताच कपटाने वालीला मारले. त्याला निरनिराळी कारणे देण्याचा कितीही प्रयत्न  केला तरी हे येथील अवैदिकांच्या नीतिमत्तेच्या कल्पनाच्या बाहेर होते. रामाला रावणाचे आव्हान स्वीकारण्यासाठी सुग्रीवाची मदत घेणे अपरिहार्य होते त्यासाठी काहीही करण्यास त्याची तयारी होती आणि वैदिकांच्या नितीमत्तेतही ते बसणारे होते.

रावणाचा पराभव करण्यासाठी रामाने भेदनीती वापरली. बंधुप्रेमाचा आदर्श असलेल्या रामाने रावणाच्या भावालाच फितविले आणि युद्ध जिंकले. सीतेला घरी आणल्यावर केवळ एका परिटाच्या बोलण्यावरून तिला वनात टाकून दिले. राम हा स्वत:च्या अंतर्मानापेक्षा जनरीतीच्या मर्यादांना अधिक महत्व  देत  होता.
मात्र सीतेने धरणीत प्रवेश केल्यावर (उंच कड्यावरून उडी मारल्यावर) रामाने आपले जीवनकार्य संपविण्याचे ठरविले आणि शरयू नदीत प्रवेश केला.
त्याकाळी वैदिकांचे पाय दक्षिणेत रोवणारा म्हणून त्याचा समावेश अवतारात केला गेला. 

Monday, January 11, 2016

असहिष्णुता : लेखक संजय सोनवणी

खेद...विरोध नेमका कशाचा हवा?
गतकाळात रमवत, त्याच चश्म्यातून भविष्याकडे पाहत आपल्या अनुयायांना पुढे नेण्याची स्वप्ने दाखवत मागेच ओढत राहणा-या विचारधारांचा.
यातून प्रगतीही होत नाही आणि मानसिकता पुराणपंथी बनत जाते. मानवी स्वातंत्र्य म्हणजे नेमके काय हे ते समजुच देत नाहीत कारण त्यांना अबौद्धिक गुलामच हवे असतात. ते अनुयायांचे असे काही ब्रेन वाशिंग करुन टाकतात कि त्यांची स्वतंत्र विचार करण्याची प्रेरणाच नष्ट होते. किंबहुना विचार करायचीच त्यांना भिती वाटू लागते.
असे एका साच्यात घडलेले लोक काही नवनिर्मिती करू शकतील याची सुतराम शक्यता नसते. ते कधी स्वातंत्र्याचा मुक्त श्वास घेऊ शकतील याचीही संभावना नसते. आणि इतरांनीही स्वतंत्र विचार केलेला त्यांना आवडत नाही. किंबहुना इतरांचेही स्वातंत्र्य बंदिस्त करत त्यांनाही आपल्या झापडबंद अविचारशील विचारधारेत आणण्याचा त्यांचा जबरदस्त प्रयत्न असतो. येत नसतील तर त्यांना संपवुनच टाकायचे हेच काय ते धोरण असते. कारण ते भेकड असतात. त्यांना विचारांचीच भिती वाटते, प्रकाशाला घाबरणा-या दिवाभितांसारखी. ते प्रकाशावरच तुटून पडू पाहतात.
खेद या अविचा-यांचा असायला हवा. विरोधही. कारण ते इतरांनाच घातक आहेत म्हणून नव्हे तर स्वत:च्या अनुयायांसाठी तर जास्तच घातक आहेत. रक्तशोषक किड्यांप्रमाणे ते आपल्या अनुयायांचा आत्मा आधी शोषतात मग नंतर बाह्य कक्षेतील माणसांवरही तेच प्रयोग करायला सिद्ध होतात. अनुयायांनीही किमान झापडबंद होऊ नये असा प्रयत्न करायला हवा. स्वत:चे स्वातंत्र्य म्हणजे पारतंत्र्यातील स्वातंत्र्य नव्हे हे समजावून घ्यायला हवे. जगात आजवर अगणित अशा राज्यव्यवस्था, हुकुमशहा, संघटना झाल्या आहेत, मानवी दुर्दैव कायम असेल तर पुढेही होत राहतील.
यात माणसाचे माणुसपण कोठे राहिले?आमचा विरोध अशा माणुसपणाला हिरावणा-या अविचारी, एककल्ली, एका साच्यातले माणसे बनवण्याचा अहर्निश प्रयत्न करत राहत, खोट्या आशा, खोटी स्वप्ने आणि खोटे शत्रू समोर ठेवत हिंस्त्र प्रेरणा देत माणसाने माणसांनाच फसवत राहणारी व्यवस्था आणण्याच्या प्रयत्नांना असला पाहिजे.
आम्हाला अखिल मानवांचे स्वातंत्र्य हवे आहे.
सर्वांना स्वतंत्र अस्तित्व जपण्याचा, विचार करण्याचा व आपले विचार निर्भयपणे मांडण्याचा, आपापले धर्म (उपद्रव न निर्माण करता) पाळण्याचा, राजकीय हवे ते विचार बाळगण्याचा अधिकार सहिष्णुता सर्वप्रथम मान्य करते. मानवी सहजीवन हे एकमेकांचा सन्मान करत, एकमेकांचे अधिकार मान्य करत संविधानाच्या चौकटीत जीवन जगण्याचे स्वातंत्र्य घेणे व देणे म्हणजे सहिष्णुता होय. सहिष्णुतेचे तत्वज्ञान मानवाचा मुलभूत व्यक्तिस्वातंत्र्याचा सन्मानाच्या संकल्पनेवर उभे आहे. महात्मा गांधी जे म्हणत, "मला केवळ भारताचे नव्हे तर भुतलावरील सर्व मानवांचे स्वातंत्र्य हवे आहे." ही उदात्त भुमिका सहिष्णुतेच्या संकल्पनेचा गाभा आहे. स्वत:चे स्वातंत्र्य इतरांचे स्वातंत्र्य संकुचित करण्यासाठी नाही याचे भान प्रत्येक सहिष्णू ठेवत असतो. आपले राष्ट्र "सेक्युलर" राष्ट्र आहे. हा सेक्युलरिझम बहुतेक विद्वान फक्त "धर्म-निरपेक्ष" या शब्दाशी जोडतात, जे चुकीचे आहे. सेक्युलर या शब्दातून ध्वनित होणारा अर्थ खूप व्यापक आहे. तो मानवाच्या (नागरिकांच्या) सौहार्दमय सहजीवनाशी निगडित आहे. प्रत्येकाला आपले स्वतंत्र विचार करण्याचा, जीवन जगण्याचा, धर्म, अर्थविषयक श्रद्धा-विचार ठेवण्याचा, आपापली खाद्य ते जीवनसंस्कृती (अन्य कोणालाही उपद्रव होणार नाही व वर्तन कायद्यांच्या चौकटीत असेल या पद्धतीने) जपण्याचा अधिकार आहे. ही बाब सहिष्णुता मान्य करते. ज्याक्षणी सहजीवनाची संकल्पना हद्दपार होऊ लागते तत्क्षणी ते ते समाज असहिष्णू होत जातात असे म्हणावे लागेल.
आम्हाला आमची मुले ते पतवंडे व त्याहीपुढील पिढ्या मुक्त वातावरणात वाढवायच्या आहेत कि द्वेषाने, हिंसेने भरलेल्या जहरी, जगण्याची कसलीही शाश्वती नसलेल्या वातावरणात सडू द्यायच्या आहेत याचा निर्णय आताच घ्यावा लागणार आहे. असहिष्णुतेच्या तत्वज्ञानाचा पाया मिथ्या वर्चस्ववादात आहे. कोण कोणावर कशी सत्ता (आणि कसल्याही प्रकारे) गाजवू शकतो हे सिद्ध करण्यासाठी आहे. नव-याची बायकोवर व आईबापाची मुलांवर प्रेमविरहित वर्चस्व गाजवण्याची इच्छा जेथे जन्माला येते तेथेच माणसाच्या असहिष्णुतेचा प्रवास सुरु होतो. अनिर्बंध आकांक्षांतुन खोटेपणा, हिंस्त्रता, द्वेष इत्यादिचा आधार घेत असहिष्णूता टोक गाठत जाते व अंतता: अमानवी बनते. आम्हाला जर आमचे भवितव्य असे अमानवी बनवायचे नसेल तर आताच सावध होणे आवश्यक आहे.
असहिष्णुतेचे तत्वज्ञान हे दुस-यांवर सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि राजकीय वर्चस्व स्थापन करण्यासाठी जन्माला येते. या चारही बाबी या तत्वज्ञानात हातात हात घालून वावरत असतात. त्यांना वेगळे करता येत नाही. Theory of others  हा या तत्वज्ञानाचा पहिला नियम असतो. हा नियम म्हणजे आपण (स्वधर्मीय वा विचारप्रणालीचे) व इतर अशी विभागणी सर्वप्रथम काळजीपुर्वक केली जाते. आपले धर्म/तत्वज्ञान हे इतरांपेक्षा कसे पुढारलेले आहे, इश्वरप्रणित आहे, श्रेष्ठ आहे, पुरातन आहे, हे लिहिणे, सांगत राहणे, बिंबवने व त्यातुनच हाडाचे कट्टर अनुयायी तयार करणे ही स्वभावत:च पुढील पायरी असते. या प्रवसात सुरुवातीला जमतील ती सत्तास्थाने (आर्थिक/राजकीय) प्रप्त करत जात अंतिम उद्देश साध्य करायचा असतो सत्ता संपादनाचा. त्यासाठी शत्रू मानलेल्या वर्ग-गटांबाबत द्वेष पसरवत प्रसंगी हिंसक होण्याची त्यांची अर्थातच तयारी असते, कारण द्वेष केल्याखेरीज, त्यांच्याबाबत खोटे का होईना भय निर्माण केल्याखेरीज आपले लोक एका झेंड्याखाली राहणार नाहीत याची त्यांना खात्रीच असते. आपले अनुयायी स्वतंत्र विचार करणार नाहीत, एक साच्याचे बनतील यासाठी ते अपरंपार कष्ट घेत असतात. कोणी स्वतंत्र विचार मांडत असतील, त्यांच्या विचारांनी आपल्यला हवी तशी समाजरचना करण्यात अपयश येणार असेल, अडथळे येणार असतील तर त्यांना धमकावून गप्प करण्याचे प्रयत्न होतात, एनकेन प्रकाराने अंधारात फेकले जाते व तेही जमणार नसेल तेंव्हा सरळ हत्या केल्या जातात. अमेरिकेतील कु-क्लक्स क्लान या गुप्त संघटननेने अनेक ज्यू व बायबलमधील तत्वज्ञानाविरोधी जाणा-या विचारवंतांची हत्या केली हा इतिहास आहे. भारतात अलीकडेच झालेल्या तीन विचारवंतांच्या हत्याही याच परिप्रेक्षात पहाव्या लागतात. आयसिसचा झालेला उदय याच तत्वज्ञानातून झाला आहे. किंबहुना सर्वच दहशतवादांमागेही हेच तत्वज्ञान व साध्य असते.