Friday, February 22, 2019

अद्वैत वेदांत आणि विज्ञान


गेले काही आठवडे 'दृक्-दृश्य विवेक' या ग्रंथाचा अभ्यास चालू आहे. पूर्ण होण्यास अजून काही आठवडे जातील. हा ग्रंथ अद्वैत वेदांताचा 'प्रकरण ग्रंथ' (Introductory Text) म्हणून ओळखला जातो. या ग्रंथाचा अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात आली. अद्वैत वेदांत 'हे विश्व ब्रह्म असून दृश्य जग माया आहे' असे मानते.'माया म्हणजे स्थल-काल-कार्यकारणभाव (Space-Time-Causal Relationship)'. विज्ञानाचे हेच क्षेत्र आहे. म्हणजेच असे म्हणता येईल की विज्ञान मायेच्या क्षेत्रातील नियमांचा अभ्यास करते.

अद्वैत वेदांत तीन प्रकारच्या जीवाचा उल्लेख करते.
१>पारिमार्थीक जीव : हा म्हणजेच ब्रह्म
२> व्यावहारिक जीव : हा जीव बाह्य जगातील व्यवहार सांभाळतो. आपण ज्याला सामान्य भाषेत जीव म्हणतो तो हाच जीव. याच जीवाला पुनर्जन्म असतो असे अद्वैत वेदांत मानते. आपल्याला आपल्या ब्रह्मस्वरूपाची जाणीव होताच हा जीव पारिमार्थीक जीवात विलीन होतो.
३> प्रातिभासिक जीव : स्वप्नात आपण उपस्थित असतो, स्वप्ने अनुभवतो. हा स्वप्ने अनुभवणारा जीव म्हणजेच प्रातिभासिक जीव. जाग येताच हा प्रातिभासिक जीव व्यावहारिक जीवात विलीन होतो.

व्यावहारिक जीवासाठी व्यावहारिक जगातील नियम महत्वाचे असतात. म्हणूनच या जीवासाठी विज्ञानाचे महत्व आहे. परंतु मायेच्या क्षेत्रात ब्रह्म येत नसल्याने ते विज्ञानाच्या क्षेत्रात येत नाही. म्हणूनच अद्वैत वेदांतानुसार विज्ञानाच्या नियमांनी अथवा कार्यकारणभावाने ( Logical Thinking) ब्रह्म (अथवा परमेश्वर) सिद्ध करणे हास्यास्पद आहे. ब्रह्म हे केवळ अनुभवाचे क्षेत्र आहे.

2 comments:

  1. Clear, concise and succinct. Thank you for sharing. Unfortunately for me,I came across your blog far too late in life. I shall start reading and contemplating it. I had read about Cosmic Consciousness from my esteemed senior, Colonel Bakshi, but could not follow it up. I hope to do that through your current series.
    -Capt. Naren Phanse

    ReplyDelete
    Replies
    1. आयुष्यात काहीही 'उशिरा' नसते. या जन्मातील अध्यात्मिक ज्ञान पुढील जन्मात आपण घेऊन जातो. माझा अनुभव आहे. मी विसाव्या वर्षी ध्यान अंत:प्रेरणेने करू लागलो. चाळीसाव्या वर्षी ते 'विपश्यना ध्यान' होते हे कळले. त्यानंतर अध्यात्मिक पुस्तकांचे वाचन सुरु झाले.

      Delete