Friday, March 22, 2019

प्रत्याभिज्ञ पंथ (एक काश्मिरी शैव पंथ)

प्रत्याभिज्ञ हा एक काश्मिरी शैव पंथ आहे. हा पंथ अडवत वेदांताला अत्यंत जवळचा आहे. स्वामी सोमानंद (इ.स.८७५-९२५) हे या पंथाचे मुख्य प्रवर्तक समजले जातात. त्यांनी 'शिवदृष्टी' हा ग्रंथ लिहिला. त्यांचे शिष्य स्वामी उत्पलदेव (इ.स.९००-९५०) यांनी या पंथाच्या तत्वज्ञानाचा आदिक विस्तार केला. त्यांचा 'ईश्वर प्रत्याभिज्ञ कारिका' हा ग्रंथ प्रसिद्ध आहे.
या पंथाच्या मते सर्व विश्व हे 'शिव' आहे. शिवाला वाटले म्हणून शिवाने या विश्वाची जडण-घडण केली. शिवाला वाटले म्हणून त्याने आपला देह-मन घडविले. जेव्हा हा आपल्यातील शिव आपल्या मन-देहाशी एकरूप झालेला असतो तेव्हा त्याला जीव म्हणतात. कोठल्याही क्षणी हा आपल्यातील शिव आपली देह-मनाची एकरूपता सोडून शिव  स्वरूपात प्रकट होऊ शकतो. ते आपल्या इच्छेवर अवलंबून आहे. कारण आपण शिव आहोत आणि या शिवाच्याच इच्छेने आपण जीव झालो आहोत. जीवाकडून शिवाकडे जाण्याचा प्रवास हा इतका सोपा आहे.

No comments:

Post a Comment