आम्ही या वादळात अडकलो असतानाची पहिलीच रात्र. दमून आम्ही रात्री लवकरच नऊ च्या सुमारास झोपी गेलो.
रात्री साडेदहाच्या सुमारास आमच्या तंबूजवळून घोड्यांच्या खिंकाळण्याचा आणि टापांचा आवाज आल्याने आम्हाला जाग आली. आमच्या जवळच काही गुराखी घोडे घेऊन राहिले होते. त्यांचे घोडे मोकळेच होते आणि हे गुराखी या हिमवृष्टीताही अंगावर त्यांचे अतिशय उबदार घोंगडे घेऊन उघड्यावर झोपत असत.मागील दोन भागांत वर्णन केल्याप्रमाणे आम्ही १९८७ साली राष्ट्र सेवादल ठाणे तर्फे हिमालयन ट्रेकला गेलो असता अचानक आलेल्या हिमवादळात अडकलो. चार दिवस हिमालयातील फारशी वर्दळ नसलेल्या ठिकाणी तंबूत आम्ही अडकलो होतो.आम्हाला जाग आल्यावर सहज बाहेर लक्ष गेले. तंबूचे कापड अर्धपारदर्शक होते. बाहेर पडलेल्या बर्फाने आणि आजूबाजूच्या हिमाच्छादित शिखरांमुळे आसमंत उजळून निघाला होता. त्यामुळे तंबूच्या बाहेरचे पुसटसे दिसत होते. आमच्या तंबूंपैकी मुलींच्या तंबूबाहेर एक अस्वलाची जोडी आली होती आणि ती अस्वले त्या तंबूला नाक लावून वास घेत होती. तंबूतील खाद्यपदार्थांचा त्यांना वास येत असावा. तंबूच्या आतून मुलींचा गप्पांचा आवाज येत होता.
![]()
आम्ही तेथे असेपर्यंत रोज रात्री ही अस्वलांची जोडी येत असे आणि आमचे तंबू हुंगून जात असे. काही अघटीत घडले नाही. चार दिवसांनी हिमवृष्टी थांबताच आम्ही तेथून निघण्याचा निर्णय घेतला.
![]() | |||||
बर्फावरून घसरगुंडी. अत्यंत उतरत्या बर्फावरून खाली उतरताना कधीकधी अशीही अवस्था
|
Friday, March 23, 2018
आम्ही हिमवादळात सापडतो...भाग ३
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment