|
ढग दरीतून वर येताना |
१९८७ चा मे महिना होता. राष्ट्र सेवा दल ठाणेची नंदा पाटणकर (Shrikant Patankar) याच्या नेतृत्वाखाली हिमालयावर ट्रेक गेली होती. नंदा हा नेहमीच आमचा हायकिंगमधील उत्कृष्ट लीडर राहिला आहे.
आम्ही या ट्रेकसाठी एक गाईड घेतला होता. हा गाईड आमचा स्वयंपाकी म्हणूनही काम करीत असे. आम्ही मनालीपासून चढाईस सुरुवात केली. बियास कुंड येथपर्यंत यशस्वीपणे जाऊन आलो. आमच्या परतीच्या प्रवासात मुक्काम मानली-रोहतांग पासच्या वाटेवर एका ठिकाणी होता. हिमालयात सर्वसाधारणपणे पहाटे चढाईस सुरुवात करायची असते आणि मध्यान्हानंतर विश्रांती घ्यायची असते. दुपारी उन्हामुळे बर्फ वितळून कडे पडण्यास सुरुवात होते. म्हणून ही काळजी घ्यायची.
आम्ही असेच दुपारी मुक्कामासाठी थांबलो. आकाश निरभ्र होते. आम्ही आमच्या गाईडच्या मदतीने तंबू ठोकले. आमचा गाईड स्वयंपाकाच्या तयारीस लागला आणि आम्ही सर्व एका तंबूत पत्ते खेळण्यास बसलो.
थोड्याच वेळात ढगांचा गडगडाट ऐकू आला. बाहेर पहिले तर आभाळ भरून आले होते. आम्ही लगबगीने तंबूच्या भोवती चर खणून पाणी तंबूत शिरणार नाही याची व्यवस्था केली. थोड्याच वेळात हिमवृष्टी सुरु झाली आणि मोठे वादळ सुटले. आमच्या तंबूच्या उघड्या दारातून वारा आत घुसला आणि आमचा तंबू वर ढकलला जाऊ लागला. तंबूला बांधलेले मोठे खिळे (Pegs) उपटले जाऊ लागले. आमचा तंबू आमच्या सकट (तंबूला खालूनही कापड असते) बाजूच्या दरीत जातो आहे काय अशी भीती वाटू लागली. पण तेवढ्यात तंबूच्या वरच्या बाजूचे कापड फाटले आणि तंबूत शिरलेल्या हवेला वाट मिळाली. आम्ही सुटकेचा निश्वास टाकला.
आम्ही चार दिवस या ठिकाणी अडकून पडलो होतो. त्यावेळी आणखी काय काय प्रसंग घडले याची माहिती पुढील लेखात
|
जाताना दिल्लीत साथी मधु दंडवते यांच्या घरी मुक्काम. प्रमिलाताई आणि मधु दंडवते यांनी आमचे चागले आदरातिथ्य केले. काही दिवस त्यांच्या घरी आम्ही सर्वजण राहिलो होते.
|
No comments:
Post a Comment