'दृक्-दृश्य विवेक' हा अद्वैत वेदांताचा प्रकरण ग्रंथ (Introductory Text). त्याच्या विवेचनाला मी आता सुरुवात करीत आहे. हा ग्रंथ समजण्यास कठीण आहे. मला तो संपूर्ण समजला आहे असे वाटत नाही. तरीही माझ्या फेसबुक/ब्लॉगर मित्रांना या ग्रंथसंबंधी माहिती व्हावी म्हणून हा माझा प्रयत्न. माझ्या या 'लहान तोंडी मोठा घास घेण्याच्या' औधात्याबद्दल या ग्रंथाचे रचयिता (विद्यारण्यस्वामी, भारतीतीर्थ अथवा आद्य शंकराचार्य ) यांची तसेच हा ग्रंथ ज्यांच्या Youtube Videos वरून मी समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे त्या स्वामी सर्वप्रियानंद यांची क्षमा मागून विवेचनाला सुरुवात करतो.
मी कोण आहे, देव अथवा परमेश्वर म्हणजे काय, शाश्वत आनंद शक्य आहे काय, तो कसा प्राप्त करायचा, मी दु:खातून बाहेर पडू शकेन काय, या विश्वाची निर्मिती कशी झाली, मृत्यूनंतर काय होते असे प्रश्न आपल्या मनात उद्भवत असतील. जगातील अत्यंत प्राचीन अशा आपल्या संस्कृतीने, त्यातील महान ऋषींनी या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. उपनिषदे हे अशा प्रयत्नाचे सार आहे. अद्वैत वेदांताचा आधार ही उपनिषदे आहेत. हा ग्रंथ अद्वैत वेदांताची तोंडओळख करून देणारा आहे.
'विवेक' या शब्दाचा अर्थ योग्य-अयोग्य, सत्य-असत्य एकत्र असलेल्या गोष्टींतून सत्य आणि असत्य , योग्य आणि अयोग्य अशा गोष्टी वेगळ्या करण्याची/समजण्याची क्षमता. 'दृक्' या शब्दाचा शब्दश: अर्थ 'डोळे' असा होतो. डोळे आणि दृश्य हे वेगळे समजण्याची क्षमता 'दृक्-दृश्य विवेक' याचा शब्दश:अर्थ होईल.
हा ग्रंथ वैज्ञानिक पद्धतीने लिहिलेला असल्याने सुरुवातीलाच गृहीतके मांडतो. गृहीतके याचा अर्थ कोणत्या गोष्टी आधीच गृहीत धरून या ग्रंथाची मांडणी केली आहे याची स्पष्टता. कोठलाही उत्तम शिक्षक आपल्याला माहित असलेल्या गोष्टींपासून सुरुवात करतो आणि हळूहळू आपल्याला अज्ञात प्रांतात घेऊन जातो. हा ग्रंथ हेच करतो. आपल्याला माहित असलेली गोष्ट म्हणजेच 'गृहीतक'.
'एखादी गोष्ट आपण बघत असू, अनुभवत असू तर ती गोष्ट (दृश्य) आणि बघणारा (द्रष्टा) हे भिन्न असतात' हे या ग्रंथातील पहिले गृहीतक आहे. डोळ्याने विविध वस्तू दिसतात, कारण डोळा आणि त्या वस्तू भिन्न आहेत. डोळ्याने त्याच डोळ्याकडे पाहता येत नाही. फारतर आपण आरशात डोळ्याने त्याच डोळ्याची प्रतिमा पाहू शकतो, पण तो डोळा नव्हे. ही अत्यंत सामान्य गोष्ट आहे असे आपल्याला वाटते. पण हे गृहीतक नीट समजून घेतले तर या ग्रंथाचा पुढील प्रवास सोपा आणि तर्कशुद्ध वाटतो.
दुसरे गृहीतक म्हणजे 'दृष्टा' एक असतो, परंतु दृश्यात विविधता असते. आपल्या डोळ्यांची जोडी एकाच असते, परंतु त्याने आपण विविध गोष्टी पाहू शकतो. कानांची जोडी एकाच असते, परंतु आपण विविध आवाज ऐकू शकतो.
तिसरे गृहीतक म्हणजे दृश्य बदलत असते, द्रष्टा त्या मानाने स्थिर असतो. डोळ्यासमोरील दृश्ये बदलतात, पण डोळे तेच असतात. कानाला ऐकू येणारे आवाज बदलतात, पण कान तेच असतात.
संतोष कारखानीस