Forwarded article from WhatsApp
*ओव्हरअर्निंगचं व्यसन..?*
“आपण सगळेच गरजेपेक्षा खूपच जास्त काम करतो आहोत” असा मुद्दा गुगलचा सीईओ लॅरी पेज यानं एका भाषणात मांडला होता. पेजचं हे विधान अर्थातच हातावर पोट असलेल्या, घराचं भाडं भरण्यासाठी किंवा रोजचं दोन वेळचं जेवण मिळवण्यासाठी काम करणार्या प कामगारांना उद्देशून नव्हतं. पेजला अभिप्रेत होतं ते “ओव्हरअर्निंग..!” पुरेशा गोष्टी मिळवल्यानंतरही मौजमजेसाठी वेळ न काढता अक्षरश: अहोरात्र काम करुन पैसे मिळवणं या प्रवृत्तीला शिकागो विद्यापीठाच्या ख्रिस्तोफर हीस या प्राध्यापकानं “ओव्हरअर्निंग” म्हणलं होतं.
“ओव्हरअर्निंग” म्हणजे काय ते समजावून सांगताना हीसनं एक मजेदार प्रयोग केला होता. या प्रयोगात विद्यार्थ्यांनी “समोरचं बटण दाबून सुरेल संगीत ऐकायचं किंवा गोंगाट ऐकायचा” यापैकी एक पर्याय निवडायचा होता.
पाच मिनिटांच्या पहिल्या टप्प्यात एखादा विद्यार्थी जितक्या वेळा गोंगाट ऐकणं पसंत करेल (उदा. २० वेळा) तितकी चॉकोलेटस् त्याला मिळणार होती. पण या टप्प्यात ती चॉकोलेटस खायला मात्र त्याला परवानगी नव्हती.
याच प्रयोगाच्या दुसऱ्या पाच मिनिटांच्या टप्प्यात गोंगाट ऐकून मिळालेली चॉकोलेटस खाणं सक्तीचं होतं. दुसऱ्या टप्प्यात काही विद्यार्थ्यांनी शांतपणे संगीत ऐकायचा आनंद सोडून देऊन गोंगाट ऐकणं पसंत केलं.
आपण साधारण ३ ते ४ चॉकोलेटस खाऊ शकू असं कबूल केलेलं असतानाही त्यांनी १० पेक्षा जास्त चॉकोलेटस मिळवली. ती खाण त्यांना शक्य झालं नाही. ते सगळे “ओव्हरअर्नर्स” आहेत असं हीसनं जाहीर केलं.
ओव्हरअर्नर्समध्ये आपण खर्च करु शकणार नाही त्यापेक्षा खूप जास्त मिळवण्याची एक खोलवर दडलेली आकांक्षा असते. कामाच्या अतिरेकानं त्यांना ताण आला किंवा जगण्यातला आनंद संपला तरी त्यांना त्याची तमा नसते.
“सॉयकॉलॉजिकल सायन्स”च्या एका अंकात याबद्दल लेख प्रकाशित झाला होता. काम करताना आनंद वाटतो, भविष्याबद्दल अनिश्चितता वाटते आणि इतरांपेक्षा जास्त संपत्ती मिळवावीशी वाटते ही कारणं सांगून भरपूर पैसे साठल्यावरही खूप काम करणारी माणसं हा लेख वाचून प्रत्येकाला आठवणार आहेतच. पण....
त्या यादीत आपलंच नाव पहिलं आहे का? हे तपासायला हवं..!
No comments:
Post a Comment