Sunday, April 22, 2018

उतार

आता उतार सुरू
किती छान
चढणे ही भानगड नाही
कुठलं शिखर जिंकायचं नाही
आता नुस्ता उतार
समोरचं,झाडीनं गच्च भरलेलं द्रुश्य
दरीतून अंगावर येणारा
आल्हाददायक वारा
कधी धुकं, तर कधी ढगही
टेकावं वाटलं तर टेकावं
एखाद्या दगडावर
बसलेल्या छोट्या पक्ष्याशी
गप्पा माराव्यात,
सुरात सूर मिसळून...
अरे, हे सगळं इथंच होतं?
मग हे चढताना का नाही दिसलं?
पण असू दे
आता तर दिसतंय ना
मजेत बघत
उतरू हळूहळू
मस्त मस्त उतार

अनिल अवचट

No comments:

Post a Comment