'दृक्-दृश्य विवेक' या अद्वैत वेदान्ताच्या प्रकरण ग्रंथाचे (Introductory Text) आपण विवेचन करीत आहोत.
दृश्य आणि द्रष्टा यातील संबंधांबाबत आपण मागच्या भागात पहिले. दृश्य आणि द्रष्टा हे नेहमीच भिन्न असतात हे प्राथमिक गृहीतक समोर ठेऊन आपण या ग्रंथाचा अभ्यास करत आहोत.
'अहम् ब्रह्मास्मि ।' हे उपनिषदांतील एक ब्रह्मवाक्य आहे याची आपणास कल्पना आहेच. मी 'ब्रह्म' आहे हे वेदांत उच्चारवाने सांगते. पण आपला सामान्य अनुभव तसा नाही. आपली स्वत:बद्दलची कल्पना आपले शरीर अथवा आपले मन यापुरती सीमित केलेली असते. म्हणूनच आपण म्हणजे ब्रह्मच आहोत हे दाखवून देणे हे कोठल्याही वेदान्ताच्या शाखेपुढील पहिले आव्हान असते. आपण म्हणजे ब्रह्म आहोत हे दाखविण्याचा अनेक प्रकारे प्रयत्न केला गेला आहे. 'दृक्-दृश्य विवेक' या ग्रंथात त्यातील एक दिशा पकडलेली आहे.
दृश्य आणि ते बघणारा द्रष्टा, एखादा अनुभव आणि तो अनुभवणारा हे दोन वेगळे असतात हे आपण सर्वच जाणतो. या आपल्या ज्ञानाचा उपयोग करून आपण आपले शरीर आणि मन यापासून वेगळे असल्याचे हा ग्रंथ दाखवितो. आपले डोळे (अथवा ज्ञानेंद्रिये) एखादी गोष्ट बघतात. म्हणजे आपले डोळे त्या वस्तूपासून वेगळे आहेत. या डोळ्यांची जाणीव आपल्याला मनाद्वारे होते. म्हणजेच डोळे आणि मन हे वेगळे आहेत. मनाची जाणीव आपल्याला होते. म्हणजे आपण आणि मन वेगळे आहेत. हा मनाची जाणीव असणारा द्रष्टा अथवा साक्षी चैतन्य म्हणजेच आपण आहोत.
पण आपला नेहमीचा अनुभव काही वेगळे सांगतो. समोरील वस्तू म्हणजे आपण आहोत असे आपल्याला कधीच वाटत नाही, परंतु शरीराचा अवयव आपला वाटतो, आपले शरीर आपल्याशी घट्ट निगडित असते. मी उंच आहे, बुटका आहे, सुंदर आहे, गोरा आहे इत्यादी गोष्टी आपल्या शरीराशी निगडित आहेत. परंतु आपण त्या आपल्याशी निगडित केलेल्या आहेत. याचे एक कारण आहे. शरीराला इजा पोचल्यास तेथे वेदना जाणवते. आपल्या शरीरात आपल्याला चैतन्य जाणवते. इतकेच नाही तर माझी ज्ञानेंद्रिये ही चैतन्याच्या प्रवाहाने पुलकित झालेली असतात. माझया मनात येणारे विचार हे चैतन्याचाच अविष्कार असतात. त्यामुळे साहजिकच माझे शरीर/मन हा माझाच एक भाग असल्याचा अथवा मी म्हणजेच शरीर/मन असल्याचा माझा समज पक्का होतो. (अन्य माणसे, प्राणी यांच्यातही चैतन्य असल्याचा मी निष्कर्ष काढू शकत असलो तरी त्यांच्यातील चैतन्य मला प्रत्यक्ष जाणवत नाही). जर आपण म्हणजे साक्षी चैतन्य आहोत, शरीर/मनापेक्षा वेगळे आहोत, तर हे चैतन्य आपल्या शरीरात/मनात येते कुठून याचा शोध आपण पुढील भागात घेऊ.

No comments:
Post a Comment