Tuesday, March 27, 2018

भारतीय कालगणना

भारतीय प्रमुख कालगणना

                         सध्याचे वर्ष
कलाब्द             १,९७,२९,४९,११९
सृष्टीसंवत          १,९५,५८,८५,११९
वामन संवत       १,९६,०८,८९,११९
श्रीकृष्ण संवत     ५२४४
युधिष्ठर संवत      ५११९
विक्रम संवत       २०६५
शालिवाहन         १०४०
कलचुरी             १७७०
वल्लभी              १६९८
बंगला                १४२५
हर्षाब्द               १४०९
शिवशक            ३४४

         


Friday, March 23, 2018

भारतीय दर्शनशास्त्रे

आपल्या प्राचीन ज्ञानसंपत्तीत अनेक दर्शने येतात. प्रत्येक दर्शन अध्यात्म/ देव यांचे आपल्या परीने अर्थ लावते. अशा अनेक (शेकडो) दर्शनांपैकी आठ दर्शने महत्वाची मानली जातात. सांख्य, वैशेषिक, न्याय, चार्वाक (लोकायत), पूर्वमीमांसा, उत्तर मीमांसा, बौद्ध आणि जैन ही ती आठ दर्शने होत.
Image result for ऋषिआजचे भारतीय मानस सांख्य दर्शनावर (ज्यावर भगवतगीता आधारलेली आहे) पोसलेले आहे. याशिवाय आद्य शंकराचार्यांचे उत्तमीमांसा (वेदांत दर्शन) हे ही भारतीयांवर प्रभाव टाकते. चार्वाक दर्शन हे तर परमेश्वराला न मानणारे दर्शन आहे.
हिंदू धर्म असा व्यापक पायावर उभा आहे.  परंतु बहुसंख्य भारतीयाना आपल्या या अमुल्य ठेव्याची कल्पना नाही. त्यामुळे अतिरेकी धर्मावाद्यान्च्या जाळ्यात ते गुरफटतात. तसेच भारतीय दर्शनांमधील विविध एकमेकांना छेद देणाऱ्या गोष्टी (उदा. पुरुष-शक्ती कल्पना आणि 'सर्वांभूती एकाच परमेश्वर')   'हिंदू धर्मातील' म्हणून पुढे आल्याने गोंधळून आपला धर्मच गोंधळ असलेला आहे अशी त्यांची समजूत होते. खरेतर आपल्या धर्मात प्रत्येक दर्शनात अत्यंत तार्किक पद्धतीने मांडणी केलेली आहे. यात कोठेही तार्किक गोंधळ नाही. परंतु आपल्या धर्मविषयीच्या अज्ञानाने अशी समजूत होते. आपला धर्म अन्य पाश्चत्य धर्मांसारखा नाही तर अनेक दर्शनांना सामावून घेणारा व्यापक धर्म आहे हे प्रथम लक्षात घेतले पाहिजे.

 भारतीय दर्शनशास्त्रावर  सोप्या शब्दात एक लेखमाला लिहिण्याचा विचार आहे.
मी दर्शनशास्त्रातील अधिकारी व्यक्ती नाही. महाविद्यालयात (IIT Mumbai) अभियंत्याची पदवी घेत असताना अभ्यासात भारतीय तत्वज्ञान हा विषय होता. त्यामुळे तेव्हा या विषयाच्या संपर्कात आलो. आमचे तेव्हाचे त्या विषयाचे 'प्राध्यापक भट' (initials आठवत नाहीत) यांनी तो विषय मन लावून शिकविला आणि आम्हाला गोडी लावली. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून ही लेखमाला सुरु करीत आहे. या लेखनाला संदर्भ म्हणून श्री. दिक्षित यांचे 'भारतीय तत्वज्ञान' हे पुस्तक प्रमाण मानत आहे. तसेच internet वरून माहिती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. माझ्या माहितीत काही त्रुटी आढळल्यास मला त्याची जाणीव करून द्यावी ही या विषयातील अधिकारी व्यक्तींना प्रार्थना.

आम्ही हिमवादळात सापडतो...भाग ३

आम्ही या वादळात अडकलो असतानाची पहिलीच रात्र. दमून आम्ही रात्री लवकरच नऊ च्या सुमारास झोपी गेलो. 
रात्री साडेदहाच्या सुमारास आमच्या तंबूजवळून घोड्यांच्या खिंकाळण्याचा आणि टापांचा आवाज आल्याने आम्हाला जाग आली. आमच्या जवळच काही गुराखी घोडे घेऊन राहिले होते. त्यांचे घोडे मोकळेच होते आणि हे गुराखी या हिमवृष्टीताही अंगावर त्यांचे अतिशय उबदार घोंगडे घेऊन उघड्यावर झोपत असत.मागील दोन भागांत वर्णन केल्याप्रमाणे आम्ही १९८७ साली राष्ट्र सेवादल ठाणे तर्फे हिमालयन ट्रेकला गेलो असता अचानक आलेल्या हिमवादळात अडकलो. चार दिवस हिमालयातील फारशी वर्दळ नसलेल्या ठिकाणी तंबूत आम्ही अडकलो होतो.आम्हाला जाग आल्यावर सहज बाहेर लक्ष गेले. तंबूचे कापड अर्धपारदर्शक होते. बाहेर पडलेल्या बर्फाने आणि आजूबाजूच्या हिमाच्छादित शिखरांमुळे आसमंत उजळून निघाला होता. त्यामुळे तंबूच्या बाहेरचे पुसटसे दिसत होते. आमच्या तंबूंपैकी मुलींच्या तंबूबाहेर एक अस्वलाची जोडी आली होती आणि ती अस्वले त्या तंबूला नाक लावून वास घेत होती. तंबूतील खाद्यपदार्थांचा त्यांना वास येत असावा. तंबूच्या आतून मुलींचा गप्पांचा आवाज येत होता.
No automatic alt text available.अस्वल हे सर्वात धोकादायक प्राण्यांमधील समजले जाते. अस्वलाच्या तडाख्यात कोणी माणूस सापडलाच तर तो जिवंत रहाणे कठीण असते. जिवंत राहिलाच तर त्याचे डोळे सर्वसाधारणपणे जातात, तोंडही विद्रूप होते. अस्वलाचे हात (पुढील पाय) माणसाच्या तोंडाच्या पातळीवर येत असल्याने ते तोंड ओरबडतात. मुलींना या धोक्याची कल्पनाच नव्हती. आमच्या तंबूतील मुलांनी तंबूत ठेवलेल्या काठ्या हातात घेतल्या. गरज पडल्यास अस्वलाशी दोन हात करण्याची तयारी केली. पण त्या अस्वलांना बहुदा तंबूच्या आत कसे शिरायचे हे कळले नसावे. त्यांना सहज तंबू फाडता आला असता. पण त्यांना ती गोष्ट नवी असल्याने समजले नाही. थोड्या वेळाने ही अस्वले निघून गेली. आम्हाला रात्रभर नीट झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी मुलींना विचारता, त्यांना अस्वल जवळपास आले आहे हे अस्वलाच्या आवाजावरून कळले होते असे समजले. पण अस्वल हे किती धोकादायक प्राणी आहे याची त्यांना कल्पना नव्हती. मुलींपैकी एका मुलीच्या घराच्या बाजूला नेहमी दरवेशांचा तळ पडत असे. त्यामुळे ती अस्वलांना सरावली होती आणि तिची अस्वलांची भीती गेली होती. तिनेच अस्वलांचा आवाज ओळखला होता.

आम्ही तेथे असेपर्यंत रोज रात्री ही अस्वलांची जोडी येत असे आणि आमचे तंबू हुंगून जात असे. काही अघटीत घडले नाही. चार दिवसांनी हिमवृष्टी थांबताच आम्ही तेथून निघण्याचा निर्णय घेतला.

No automatic alt text available.
बर्फावरून घसरगुंडी. अत्यंत उतरत्या बर्फावरून खाली उतरताना कधीकधी अशीही अवस्था

Add caption
Image may contain: one or more people, mountain, sky, outdoor and nature
हिमालयावर चढाई

Image may contain: outdoor
हिमनदी (ग्लेशियर) पार करताना. हा अत्यंत धोकादायक प्रकार आहे. जर पायाखालचा बर्फ आपल्या वजनाने तुटला तर सरळ हिमनदीत बर्फाखाली वहात जाणार.



आम्ही हिमवादळात सापडतो...भाग २

Image may contain: 7 people, outdoor
बियास कुंड : मागे बियास नदीचा उगम दिसतो आहे.
मागील लेखात वर्णन केल्याप्रमाणे राष्ट्र सेवादल ठाणे तर्फे आम्ही काढलेल्या हिमालयन ट्रेकमध्ये आम्ही हिमवादळात सापडलो होतो. तंबूचा वरचा काही भाग फाटून त्यातून वाऱ्यास जाण्यास वाट मिळाल्याने आता तंबू उडून जाण्याची भीती राहिली नव्हती. पण सतत होत असलेल्या हिमवर्षावामुळे तंबूतून बाहेर जाण्याची सोय नव्हती. आमचे तीन तंबू होते, शिवाय स्वयंपाक्याचा वेगळा तंबू होता. त्यामुळे जेवणासाठी तंबूच्या बाहेर पडणे आवश्यक होते. तसेच प्रातार्विधींसाठी बाहेर पडणे गरजेचे होते.
त्यातच आणखी एक गोष्ट होती. हिमवर्षावामुळे उंचावरील प्राणी खालच्या बाजूस आले होते. त्यामुळे प्रातर्विधींसाठी जाताना हे प्राणी हल्ला करतील अशी भीती होती. बसलेल्या माणसावर हे प्राणी बसलेला माणूस छोटा प्राणीच आहे असे समजून हल्ला करतात. त्यामुळे निसर्गाच्या हाकेसाठी जाताना सोबत कोणीतरी घेऊन जाणे गरजेचे होते.
आमचा स्वयंपाकी तशाही परिस्थितीत रोज डोंगरावर जाऊन तेथील भाज्या खुडून आणीत असे आणि आमच्यासाठी शिजवीत असे. (या ट्रेकमध्ये हिमालयात मिळणाऱ्या भाज्याच रोज आणून शिजवीत असे. भाज्या बरोबर नेणे शक्य नव्हते).
Image may contain: one or more people and outdoor
खळखळती बियास लाकडाच्या ओंडक्याच्या सहाय्याने पार करताना. पाय घसरल्यास जलसमाधी.
अशा या हिमवर्षावात चार दिवस गेले. मात्र आम्ही कोणीच चिंताग्रस्त झालो नव्हतो अथवा घाबरलोही नव्हतो. त्या काळी मोबाईल नव्हते. त्यामुळे घराच्या कोणालाही आमच्या परिस्थितीचा पत्ता नव्हता. त्यामुळे तेही निवांत होते. आमच्याकडे असलेल्या एकमेव रेडीओवर बातम्या ऐकणे हाच उर्वरित जगाशी संपर्क. पत्ते खेळणे, गप्पा मारणे आणि सेवादलाची गाणी म्हणणे हाच या काळातील उद्योग होता. चार दिवसांनी हिमवर्षाव थांबला आणि आम्ही पुढील प्रवासास निघालो. या चार दिवसातील पहिल्याच रात्री आम्हाला एक चित्तथरारक अनुभव आला. पुढील लेखात त्याविषयी.
Image may contain: one or more people and outdoor
आमचे तंबू
Image may contain: outdoor and nature
हिमनदी

Monday, March 19, 2018

आम्ही हिमवादळात सापडतो.....भाग १


ढग दरीतून वर येताना
१९८७ चा मे महिना होता. राष्ट्र सेवा दल ठाणेची नंदा पाटणकर (Shrikant Patankar) याच्या नेतृत्वाखाली हिमालयावर ट्रेक गेली होती. नंदा हा नेहमीच आमचा हायकिंगमधील उत्कृष्ट लीडर राहिला आहे.
आम्ही या ट्रेकसाठी एक गाईड घेतला होता. हा गाईड आमचा स्वयंपाकी म्हणूनही काम करीत असे. आम्ही मनालीपासून चढाईस सुरुवात केली. बियास कुंड येथपर्यंत यशस्वीपणे जाऊन आलो. आमच्या परतीच्या प्रवासात मुक्काम मानली-रोहतांग पासच्या वाटेवर एका ठिकाणी होता. हिमालयात सर्वसाधारणपणे पहाटे चढाईस सुरुवात करायची असते आणि मध्यान्हानंतर विश्रांती घ्यायची असते. दुपारी उन्हामुळे बर्फ वितळून कडे पडण्यास सुरुवात होते. म्हणून ही काळजी घ्यायची. आम्ही असेच दुपारी मुक्कामासाठी थांबलो. आकाश निरभ्र होते. आम्ही आमच्या गाईडच्या मदतीने तंबू ठोकले. आमचा गाईड स्वयंपाकाच्या तयारीस लागला आणि आम्ही सर्व एका तंबूत पत्ते खेळण्यास बसलो. Image may contain: 4 people, people sitting and childथोड्याच वेळात ढगांचा गडगडाट ऐकू आला. बाहेर पहिले तर आभाळ भरून आले होते. आम्ही लगबगीने तंबूच्या भोवती चर खणून पाणी तंबूत शिरणार नाही याची व्यवस्था केली. थोड्याच वेळात हिमवृष्टी सुरु झाली आणि मोठे वादळ सुटले. आमच्या तंबूच्या उघड्या दारातून वारा आत घुसला आणि आमचा तंबू वर ढकलला जाऊ लागला. तंबूला बांधलेले मोठे खिळे (Pegs) उपटले जाऊ लागले. आमचा तंबू आमच्या सकट (तंबूला खालूनही कापड असते) बाजूच्या दरीत जातो आहे काय अशी भीती वाटू लागली. पण तेवढ्यात तंबूच्या वरच्या बाजूचे कापड फाटले आणि तंबूत शिरलेल्या हवेला वाट मिळाली. आम्ही सुटकेचा निश्वास टाकला.
आम्ही चार दिवस या ठिकाणी अडकून पडलो होतो. त्यावेळी आणखी काय काय प्रसंग घडले याची माहिती पुढील लेखात

Image may contain: 10 people, including Satish Kasbe, people smiling, people standing and outdoor
जाताना दिल्लीत साथी मधु दंडवते यांच्या घरी मुक्काम. प्रमिलाताई आणि मधु दंडवते यांनी आमचे चागले आदरातिथ्य केले. काही दिवस त्यांच्या घरी आम्ही सर्वजण राहिलो होते.

घराणे...आडनाव...काही विचार

No automatic alt text available.
माझ्या आईकडून मला X गुणसूत्र आले तर वडिलांकडून (त्यांच्याकडे एकमेव असलेले) Y गुणसूत्र आले. वडिलांना त्यांच्या वडिलांकडून आले. म्हणजेच माझ्या काका आणि चुलत भावांकडेकडे हेच Y गुणसूत्र असणार. माझ्या चुलत चुलत भावांकडे या न्यायाने हेच Y गुणसूत्र असायला हवे. म्हणजेच आमच्या 'कारखानीस' घराण्यात हेच Y गुणसूत्र असणार.

स्त्रियांच्या बाबतीत असे निश्चित सांगता येत नाही. तिच्याकडे तिच्या आईकडून आलेले (आईकडे असलेल्या दोनपैकी) एक X आणि वडिलांकडून आलेले (एकाच असलेले) एक X गुणसूत्र असेल. म्हणजेच तिच्यात आणि तिच्या बहिणींमध्ये वडिलांकडून आलेले X गुणसूत्र सारखेच असेल. तिच्या वडिलांना हे गुणसूत्र त्यांच्या आईकडूनच आलेले असेल. पण त्यांच्या सख्ख्या भावाला त्यांच्या आईकडून हेच गुणसूत्र मिळाले असेल याची शाश्वती देता येत नाही. (वडिलांच्या आईकडे X गुणसुत्रांची जोडी आहे)
याच कारणाने 'घराणे' या कल्पनेचा उगम झाला असेल काय? म्हणूनच मुलाने वडिलांचे आडनाव लावणे ही शास्त्रशुद्ध पद्धत मानावी काय?

संस्कृत नव्हे, मराठीच अभिजात भाषा! लेखक : संजय सोनावणी

रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखालील अभिजात मराठी समितीने बनवलेल्या २०१३ च्या अहवालात काही त्रुटी आहेतच आणि समितीमधील काही संस्कृतनिष्ठ विद्वानांमुळे त्या निर्माण झाल्या असाव्यात, अशी शंका यायला बरीच जागा आहे. उदाहरणार्थ वि. वा. मिराशींनीच स्पष्ट केलेले असूनही नाणेघाट शिलालेखातील ‘महारठी’ हा शब्द भाषावाचक नसून पदवाचक आहे हे समितीने लक्षात घेतलेले नाही.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून गेली पाच-सहा वर्षे मराठी भाषाप्रेमी व भाषा अभ्यासक मागणी करीत आहेत. संस्कृत हीच आर्यभाषांची जननी आहे असे मानणारे काही भाषिक वर्चस्ववादी अर्थातच या मागणीला मोठी खीळ घालत आहेत. मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी एक कोटीच्या वर मराठी भाषकांनी समर्थन दिले आहे. तरी अभिजाततेचा दर्जा अद्याप दृष्टिपथात नाही. कोणतीही भाषा अभिजात आहे याचा अर्थ ती प्राचीन, स्वतंत्र आणि साहित्यसंपन्न असते. अभिजाततेचा दर्जा मिळणे म्हणजे भाषिक व सांस्कृतिक न्यूनगंडापासून व दुय्यमपणापासून सुटका होणे. मराठीला संस्कृतच्याच वर्चस्वतावादी मानसिकतेत ठेवण्याचे प्रयत्न नवीन नाहीत. संत एकनाथांनीही संस्कृत भाषा देवांपासून झाली, मग प्राकृत चोरांपासून झाली का, हा रोकडा प्रश्न विचारला होता. भाषिक व म्हणूनच सांस्कृतिक न्यूनगंडास दूर हटवण्यासाठी नेमका हाच प्रश्न महत्त्वाचा होता व आहे.
खरे तर मराठी अथवा महाराष्ट्री प्राकृताच्या उगमाबद्दल अनेक विद्वानांनी चर्चा केलेली आहे. जे. ब्लॉख यांनी १९१४ साली लिहिलेल्या “फॉर्मेशन ऑफ मराठी लँग्वेज’ या पुस्तकात फार महत्त्वाची निरीक्षणे नोंदवलेली आहेत. थोडक्यात ती अशी : ऋग्वेदाच्या प्राचीन संपादकांनी अन्य बोलीभाषांना आत्मसात करत अथवा त्यापासून उधारी करत ऋग्वेदाची वैशिष्ट्यपूर्ण भाषा घडवली आहे. (पृ.२) मराठी ही सरळ महाराष्ट्री प्राकृताशी नाते सांगते. अन्य प्राकृत भाषांचा प्रभाव नगण्य आहे. मराठीचे ध्वनिशास्त्र गुंतागुंतीचे व अन्य आर्यभाषांपेक्षा स्वतंत्र आहे. (पृ ४५), अनेक प्राकृत घाट संस्कृतात घुसले आहेत. संस्कृत ही स्वतंत्र भाषा नसून मिश्र भाषा आहे. (पृ. ४८) हेमचंद्र ज्यांना अपभ्रंश भाषा म्हणतो त्या भाषांचा मराठीशी काहीही संबंध नाही तर मराठीचा संबंध थेट प्राचीन प्राकृताशीच आहे. (पृ. ३०-३१) प्राकृत म्हणजेच महाराष्ट्री प्राकृत. शौरसेनी, मागधी, अर्धमागधी वगैरे अन्य प्राकृत भाषा दुय्यम आहेत. मराठीचा पाया स्थानिक वैशिष्ट्यपूर्ण प्राचीन बोलींचा आहे जो अन्य भाषांत समांतरपणे आढळत नाही. (पृ.३२) सातवाहन काळात स्थानिक प्राकृत राजभाषा व साहित्यभाषा बनली व तिला वैभव आले. भारतातील कोणतीही भाषा कोणावर लादली गेल्याचे भाषाशास्त्रीय उदाहरण मिळत नाही. (पृ. ४४). मी येथे ब्लॉख यांनी दिलेली अत्यंत थोडकी उदाहरणे घेतली आहेत, पण ती मराठी भाषेच्या स्वतंत्र वास्तवावर प्रकाश टाकण्यास पुरेशी आहेत.
खुद्द ऋग्वेदात अनेक प्राकृत प्रयोग आलेले आहेत. किंबहुना प्राकृत आणि अवेस्तन शब्दांचेच सुलभ ध्वनीबदल करीत वैदिक संस्कृत व नंतरचे संस्कृत बनले आहे. अहुरऐवजी असुर, मिथ्रऐवजी मित्र अशी अवेस्तन शब्दांचे ध्वनीबदल केल्याची असंख्य उदाहरणे देता येतील. इंद्रऐवजी इंद, वृंद ऐवजी वुंद असे मूळचे प्राकृत प्रयोग ऋग्वेदात जसेच्या तसेच राहिलेले आहेत. व्याकरणाचा पायाही प्राकृतच असल्याचे अनेक उदाहरणांवरून आढळून येते. उदा. देवास:, सत्यास: ऐवजी देवा:, सत्या: इ. खरे तर ऋग्वेदाची भाषा अवेस्तन (प्राचीन पर्शियन) आणि भारतातील स्थानिक प्राकृत यांचे मिश्रण आहे. एवढेच नव्हे तर ऋग्वेदातील ६% शब्द द्रविड व मुंड भाषेतून वैदिक संस्कृतात उधार घेतलेले आहेत. “भाषेचं मूळ’ या माझ्या पुस्तकात मी संस्कृत भाषा इसपू पहिले शतक ते इसवी सनाचे दुसरे शतक या काळात कशी क्रमश: विकसित होत गेली हे ग्रांथिक, शिलालेखीय व नाणकशास्त्रीय पुराव्यांवरून साधार दाखवले आहे. त्या दृष्टीने संस्कृत हीच आधुनिक भाषा ठरत असून प्राचीन प्राकृत भाषांवर संस्कार करत ही नवी भाषा बनवलेली आहे. परंतु ती आधुनिक असूनही तिला अभिजात दर्जा आणि ज्यापासून ती बनली त्या महाराष्ट्री प्राकृताला व त्या भाषेची थेट वंशज असलेल्या मराठीला मात्र अभिजात दर्जा नाकारणे हे कर्मदरिद्रीपणाचेच नव्हे तर भाषाशास्त्रीय दृष्टिकोनही नसल्याचे निदर्शक आहे.
त्यामुळे संस्कृत भाषा अपभ्रंश स्वरूपात येऊन प्राकृत (पाअड) भाषा बनल्या हे इंडो-युरोपीय भाषा सिद्धांत मांडणाऱ्या या पाश्चात्त्य व एतद्देशीय संस्कृतनिष्ठ विद्वानांचे मत टिकत नाही. उलट मूळ प्राकृत शब्दांचेच उच्चारसुलभीकरण करीत संस्कृत विकसित होत गेली हे बुद्धिस्ट हायब्रीड संस्कृत ग्रंथ, शिलालेखीय ते नाण्यांवरील भाषेतून सिद्ध होते. महाराष्ट्री प्राकृतात हालाचा ‘गाथा सतसई’ हा अनमोल काव्यसंग्रह जसा उपलब्ध आहे तसेच ‘अंगविज्जा’ हा तत्कालीन समाजजीवनावर प्रकाश टाकणारा इसवी सनाच्या पहिल्या शतकातील गद्य ग्रंथही उपलब्ध आहे. या भाषेतील शब्द व व्याकरण पूर्णतया स्वतंत्र असून ते संस्कृताचे रूपांतरण नव्हे. समजा तसे असते तर या प्राकृत शब्दांआधीचा त्यांच्या मूळ संस्कृत स्वरूपाचा लिखित अथवा शिलालेखीय पुरावा अस्तित्वात असला असता. पण अगदी वैदिक धर्माचे आश्रयदाते असलेल्या शुंग कालातील शिलालेखही स्वच्छ प्राकृतात आहेत. ‘गाथा सप्तशती’चे संपादक स. आ. जोगळेकरांनाही सातवाहनांनी केलेल्या यज्ञांचे वर्णन प्राकृतात कसे, हा प्रश्न पडला होता व त्यांनी या ग्रंथाच्या प्रस्तावनेत तो नमूदही केला. शुंगांच्याही अश्वमेध यज्ञाचे वर्णन प्राकृतात आहे. मुळात जी भाषाच अस्तित्वात नव्हती त्या संस्कृत भाषेत त्यांचे वर्णन कसे करणार? आणि मग संस्कृत शब्दांचे अपभ्रंश म्हणजे प्राकृत असा अर्थ पुराव्यांच्या अभावात कसा काढता येईल? संस्कृत भाषा व तिचे पाणिनीकृत व्याकरण गुप्तकाळात सिद्ध झाले. तिसऱ्या शतकानंतर मात्र आधी द्वैभाषिक (प्राकृत लेख व त्याचा संस्कृतमधील अनुवाद) व नंतर संस्कृत शिलालेख/ताम्रपटांचा विस्फोट झालेला दिसतो हे येथे लक्षात घ्यायला पाहिजे. असंख्य प्राकृत ग्रंथांची भाषांतरे अथवा छाया याच काळात झाल्या. गुणाढ्याच्या ‘बृहत्कथे’चेच काय पण “प्राकृतप्रकाश” या वररुचिकृत प्राकृत व्याकरणाचेही संस्कृत अनुवाद झाले. याचे कारण संस्कृत ही ग्रंथव्यवहाराची मुख्य भाषा बनली. असे असले तरी प्राकृतातही समांतरपणे ग्रंथनिर्मिती होतच राहिली, त्यामुळे प्राकृत व्याकरणाचाही अभ्यास गरजेचा बनला.



रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखालील अभिजात मराठी समितीने बनवलेल्या २०१३ च्या अहवालात काही त्रुटी आहेतच आणि समितीमधील काही संस्कृतनिष्ठ विद्वानांमुळे त्या निर्माण झाल्या असाव्यात, अशी शंका यायला बरीच जागा आहे. उदाहरणार्थ वि. वा. मिराशींनीच स्पष्ट केलेले असूनही नाणेघाट शिलालेखातील ‘महारठी’ हा शब्द भाषावाचक नसून पदवाचक आहे हे समितीने लक्षात घेतलेले नाही. या अहवालात आधी संस्कृत शब्द व नंतर त्यांची प्राकृत रूपे दिल्याने मराठी ही संस्कृतोद्भवच आहे की काय, अशी शंका निर्माण होते. मुळात जुन्या काळातील संस्कृत हीच आद्य भाषा या समजाखाली असलेल्या विद्वानांचेच लेखन संदर्भ म्हणून वापरल्याने व अन्य उपलब्ध पुराव्यांकडे पठारे समितीतील संस्कृतनिष्ठांनी दुर्लक्ष केल्याने अशा अनेक त्रुटी निर्माण झाल्याचे दिसते. संस्कृत ही अतिप्राचीन भाषा हा समज बाळगणे काहींसाठी सोयीचे असले तरी तसे प्रत्यक्ष पुरावेच उपलब्ध नाहीत आणि स्वसंतुष्टीकरण करणारे (गैर)समज म्हणजे पुरावे नव्हेत, याचे भान ठेवले गेलेले नाही.
पाअ पडिस्स (पाया पडतो), दिअर (दीर, हिंदीत देवर), खखरात वंस निर्वंस करस (क्षहरात वंश निर्वंश केला) असे असंख्य प्राचीन प्राकृत भाषाप्रयोग व शब्द आजतागायत नैसर्गिक ध्वनीबदल स्वीकारत पण अर्थ तोच ठेवत चालत आले आहेत. यातील एकही शब्द मूळ संस्कृतमधील नाही तर असे अनेक शब्द संस्कृतनेच ध्वनीबदल करत उधार घेतल्याचे दिसते. महाराष्ट्री प्राकृताचा प्रभाव आजच्याही भाषेवर प्रामुख्याने असून याच (व अन्य प्राकृत/द्रविड) भाषेतून संस्कृतची निर्मिती झाली असल्याने प्राकृत भाषाच संयुक्तरीत्या संस्कृतच्या जनक ठरतात. संस्कृतची निर्मिती ग्रांथिक कारणासाठी झाल्याने संस्कृत भाषेत कालौघातील अपरिहार्य असलेले कसलेही बदल दिसत नाहीत. महाराष्ट्री प्राकृत ते आजचे प्राकृत हा प्रवाहीपणा ठेवला असल्याने मराठी भाषाच तामिळप्रमाणे भारतातील खऱ्या अर्थाने अभिजात भाषा आहे, संस्कृत नव्हे, याचे भान ठेवले गेले पाहिजे. मराठी भाषकांना भाषिक व सांस्कृतिक गुलामीच्या भावनेतून बाहेर पडण्यासाठी कंबर कसावी लागेल.

पायची किंमत(π)

संदर्भ : एक whatsapp पोस्ट

पायची किंमत(π): प्राचीन काळी मुद्रणकला विकसित झालेली नव्हती.भूर्जपत्रावरही लेखन करण्याची कला फारशी परिचित नव्हती.सर्व वैज्ञानिक आणि गणिती संकल्पना शब्दबध्द आणि श्लोकबध्द करण्यात येत होत्या. अध्ययन अनुभूतींचे संक्रमण मौखिकपणे एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे होत होते. त्यासाठी श्लोकाना गेयता असणे गरजेचे असते.श्लोकाना गेयता प्राप्त व्हावी यासाठी पूर्वी छंदांचा आणि अक्षरगण व्रुत्ताचा उपयोग केला जात असे.त्यासाठी प्रत्येक ओळीतील मात्रांचे गणन निर्धारित असे.म्हणून अंकासाठी किंवा संख्यासाठी वेगवेगळ्या शब्दांचा उपयोग केला जात असे.
अशा अंक किंवा संख्या दर्शक शब्दांना 'शब्दांक' असे म्हटले जाते. इ.स. 1340 ते 1425 या काळात होउन गेलेल्या आचार्य माधव या गणितीने π (पाय) म्हणजे वर्तुळाच्या परिघाचे त्याच वर्तुळाच्या व्यासाशी असलेल्या गुणोत्तराची जास्तीत जास्त अचूक किंमत काढली आहे. त्यांचा श्लोक पुढील प्रमाणे आहे.
विबुध नेत्र गज अहि हुताशन: ।
त्रि गुण वेद भ वारण बाहवा:।।
नव निखर्व मिते व्रुत्तविस्तरे।
परिघि मानस इदं जगदु: बुधा।।
वरिल श्लोकातील शब्दांकांचे संख्या खालील प्रमाणे आहेत.
विबुध- 33(देव) , नेत्र- 2(डोळे) ,गज- 8(हत्ती) ,अहि- 8 (सर्प), हुताशन:-3(अग्नी),
त्रि गुण- 3(तीन गुण), वेद-4(वेद), भ-27(नक्षत्र), वारण- 8(हत्ती), बाहवा- 2(हात), नव निखर्व- 900,000,000,000.
अंकानां वामनो गति:। या उक्ती नुसार वरील किंमती उजवीकडून डावीकडे लिहाव्या लागतील.
परिघ= 2872433388233
व्यास= 900,000,000,000
π = परिघ÷ व्यास
= 3.1415926535922.

मराठ्यांच्या सागरी पराक्रमाची एक अज्ञात गाथा





लेखक -निखिल बेल्लारीकर
लोकमत मधून साभार 
पोर्तुगीज सत्तेचा शिरकाव झाल्यापासून, म्हणजेच साधारणपणे इ.स. १५०० नंतर भारतात सागरी सत्तेची तात्त्विक, आर्थिक आणि सामरिकदृष्ट्या फेरमांडणी होऊ लागली. अर्थात पोर्तुगीजांअगोदरही भारतात लढाऊ नौदले होतीच. परंतु समुद्रावर फक्त आमची एकट्याचीच मालकी असून ती सर्वांनी मान्य केली पाहिजे आणि तसे न केल्यास आम्ही ती इतरांना जबरदस्तीने मान्य करायला लावू, हे भूमध्य समुद्रात प्रचलित असलेले दादागिरीचे तत्त्व पोर्तुगीजांनी भारतात प्रथम आणले आणि लगोलग त्याची मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणीही सुरू केली. पोर्तुगीजांना काहीएक "फी" देऊन समुद्रात विशिष्ट मार्गावर फिरायचा परवाना अर्थात पोर्तुगीज भाषेत "कार्ताझ" घेतल्याशिवाय जहाजांना प्रवासास निघण्याची मुभा नसे. आणि पोर्तुगीज गलबतांचे कप्तान कधीही कोणत्याही जहाजांना अडवून कार्ताझ दाखवण्याची मागणी करत. कार्ताझ नसला तर त्या जहाजावरील सर्व मालमत्तेवर पोर्तुगीजांचा हक्क असे. तत्कालीन भारतातील प्रबळ सत्ता म्हणजे मुघल, आदिलशाही, कुतुबशाही, विजयनगर, इ. या भूमीकेंद्रित होत्या. त्यांची लढाऊ नौदले नव्हती. त्यामुळे जंजिऱ्याचा सिद्दी किंवा पोर्तुगीज यांच्याशी करार करून मगच त्यांची व्यापारी गलबते समुद्री प्रवासाला निघत.
ही व्यवस्था अर्थातच पोर्तुगीज सागरी सत्ता प्रबळ असेपर्यंतच त्यांच्या फायद्याची असणार हे उघड होते. हळूहळू इंग्रज, डच, इ. युरोपातील इतर सत्तांनीही भारतात प्रवेश केला तसे त्यांनीही आपापल्या वतीने तशीच व्यवस्था राबवायला सुरुवात केली. त्यामुळे जेव्हा जावळी ताब्यात घेतल्यानंतर लगेचच काही काळानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकण किनारपट्टीकडील काही भाग प्रथम स्वराज्याला जोडला तेव्हा त्यांना ही कायदेशीर लुटालुटीची व्यवस्था चटकन लक्षात आली. त्याला तोंड देण्यासाठी व जंजिऱ्याच्या सिद्दीचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी इ.स. १६५७ साली मराठी आरमाराची मुहूर्तमेढ रोवली. अष्टप्रधानांपैकी अमात्य रामचंद्रपंत कृत आज्ञापत्र या ग्रंथात एका छोट्या परंतु अर्थगर्भ वाक्यात अखिल मराठी आरमारामागील प्रेरणेचे सार सामावले आहे - "ज्याजवळ आरमार त्याचा समुद्र". शिवछत्रपतींनी लावलेल्या या आरमाररूपी बीजाचा पुढे पेशवेकाळात आंग्रे घराण्याच्या आधिपत्याखाली मोठा वटवृक्ष झाला. जे मराठे अगोदर पोर्तुगीज वगैरे युरोपियन सत्तांचे कार्ताझ घेत ते आता स्वत: इतरांना आपला दस्तक देऊ लागले. दस्तक नसेल तर बिनदिक्कत जहाजे ताब्यात घेऊ लागले. कैक लढायांत टोपीकरांच्या तोडीस तोड शौर्य गाजवून त्यांना हरवू लागले. इतकी वर्षे समुद्रावर जवळजवळ एकछत्री अंमल गाजवणाऱ्या युरोपियनांना ही नवीन व्यवस्था पचनी पडली नसली तरच नवल. त्यामुळेच मराठी आरमाराचे सरखेलपद निभावणाऱ्या आंग्रे घराण्याचा उल्लेख हा जुन्या पोर्तुगीज, इंग्लिश, डच व फ्रेंच साधनांत लुटारू म्हणून येतो. त्यांच्या तशा उल्लेखामागे सत्य नसून युरोपीय सत्तांची मराठी आरमारापुढची हतबलता आणि आंग्र्यांप्रतीचा द्वेष आहे. भारताच्या आरमारी व सागरी इतिहासावरची नवीन पुस्तके मात्र आंग्र्यांची योग्य ती दखल घेतात हा बदल नक्कीच स्वागतार्ह आहे.
इ.स. १७२९ मध्ये कान्होजी आंग्र्यांचा मृत्यू झाल्यानंतर काही वर्षांनी आंग्रे घराण्यात दोन तट पडले. एकाची राजधानी होती कुलाबा तर दुसऱ्याची राजधानी होती विजयदुर्ग. साधारणपणे पाहता कुलाबा शाखेपेक्षा विजयदुर्ग शाखा जास्त पराक्रमी होती. इ.स. १७४२ नंतर विजयदुर्ग शाखेचे प्रमुख तुळाजी आंग्रे यांना आरमाराचे सरखेलपद देण्यात आले. तुळाजी यांनी साधारण पंधराएक वर्षांच्या कारकीर्दीत मराठी आरमाराचा दबदबा अनेक पटीने वाढवला. इंग्रज, पोर्तुगीज, डच, इत्यादी अनेक शत्रूंना अक्षरश: चारीमुंड्या चीत केले. त्यांच्या कारकीर्दीत इ.स. १७५४ साली झालेल्या एका अज्ञात लढाईचा इथे मागोवा घ्यायचा आहे. ही लढाई डच ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजांसोबत झाली.
(डच बार्कशिप)
इसवी सनाच्या सतराव्या व अठराव्या शतकातील भारतातील एक अतिशय प्रभावी परंतु तितकीच दुर्लक्षित सत्ता म्हणजे डच. मराठेकालीन कागदपत्रांत यांचा उल्लेख वलंदेज असा येतो. Hollanders या शब्दाचा अपभ्रंश म्हणून वलंदेज हा शब्द तयार झाला. इ.स. सतराव्या शतकातील भारतात सर्वांत मोठी युरोपीय व्यापारी सत्ता ही इंग्रज किंवा पोर्तुगीजांची नसून डचांची होती. कोकणात वेंगुर्ला व बसरूर इथे डचांच्या वखारी होत्या. पुढे इ.स. अठराव्या शतकात त्या सोडून डचांनी गुजरातेत सुरत, भरुच व केरळात कोचीन वगैरे ठिकाणी लक्ष केंद्रित केले. मसाल्यासारख्या अतिशय फायदेशीर वस्तूंची पूर्ण मक्तेदारी घेऊन व्यापार करणाऱ्या डच कंपनीचा व्यापार हा इंग्लिश व फ्रेंच कंपन्या आणि पोर्तुगीज व्यापाऱ्यांच्या एकत्रित व्यापारापेक्षा पेक्षा अनेक पटीने मोठा होता. इ.स. १७२० नंतर अनेक कारणांमुळे हळूहळू ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही डच कंपनीपेक्षा वरचढ झाली. असे असले तरीही इ.स. अठराव्या शतकात डचांचे सामर्थ्य आजिबात कमी नव्हते. भारतातील पश्चिम किनाऱ्यावर सुरत, कोचीनसारखी मोठी केंद्रे, तर पूर्व किनाऱ्यावर आंध्र प्रदेश व तमिळनाडूचा पूर्ण किनारा भरून त्यांच्या वखारी होत्या. पण त्यांचा भर भारतापुरता तरी इंग्रजांच्या तुलनेत राजकारणापेक्षा व्यापारावर जास्त असल्यामुळे क्रमिक इतिहासाच्या पुस्तकांमध्ये त्यांची घ्यावी तशी दखल घेतली जात नाही.
अशा या बलशाली डच सागरी सत्तेचे आंग्र्यांशी वाजले नसते तरच नवल! कान्होजी आंग्र्यांपासून तुळाजी आंग्र्यांपर्यंत डच आणि मराठ्यांनी पाचसहा वेळेस तरी एकमेकांशी युद्ध केले. हॉलंडमधील लेडन विद्यापीठातील इतिहाससंशोधक स्टेफान बाउस्ट (Stefan Buist) यांनी या विषयावर अलीकडेच एक प्रबंधही लिहिलेला आहे. त्यावरून हे दिसून येते की यापैकी प्रत्येक वेळेस डच कंपनीला काही जहाजे तरी गमवावी लागली किंवा बाकी नुकसानही भरपूर झाले. तेव्हा सागरी युद्धात युरोपियनांच्या तुलनेत भारतीय सरसकट मागासलेले होते ही समजूत अतिशय चुकीची आहे.
ही लढाई डचांची तीन जहाजे व आंग्र्यांची छत्तीस जहाजे यांमध्ये झाली व आंग्र्यांचा विजय झाला. या आकड्यांवरून कदाचित वाटेल की इतकी जास्त जहाजे असताना आंग्रे जिंकले यात नवल काय? पण बाकी तपशील पाहिल्याशिवाय उभय पक्षांच्या ताकदीचा अंदाज येणे अशक्य आहे. डचांची तीन जहाजे विमेनम (Wimmenum), फ्रीड (Vrede) आणि याकात्रा (Jaccatra) ही होती. त्यांचे तपशील खालीलप्रमाणे.
विमेनम: जहाजप्रकार: Spiegelretourschip, भारवहनक्षमता ११५० टन, लांबी १५० फूट. एकूण खलाशी वगैरेंची संख्या ३५६ व तोफांची संख्या ३६. कॅप्टन: जॉन लुई फिलिप.
फ्रीड: जहाजप्रकार: (बहुधा) Spiegelretourschip, भारवहनक्षमता ८५० टन, लांबी १३६ फूट. एकूण खलाशी वगैरेंची संख्या ६० व तोफांची संख्या ३६. कॅप्टन: सायमन रोट.
याकात्रा: जहाजप्रकार: Bark, भारवहनक्षमता ११५० टन, लांबी ८० फूट अदमासे. एकूण खलाशी वगैरेंची संख्या अज्ञात. व तोफांची संख्या २०. कॅप्टन: अज्ञात.
आंग्र्यांच्या आरमारात काही पाल व गुराबे होती. याशिवाय काही वर्षांपूर्वी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडून हस्तगत केलेले द रेस्टोरेशन नामक जहाजही होते. बहुसंख्य जहाजे ही डचांच्या तुलनेत बरीच छोट्या आकाराची होती. ही आंग्र्यांची खासियतच होती. ३००-४०० टनांपेक्षा जास्त भारवहनक्षमता असलेली जहाजे शक्यतोवर मराठी आरमारात नसत. किनाऱ्यापासून फार आत जात नसल्यामुळे शक्यतोवर लहान ते मध्यम आकाराची, उथळ पाण्यात जलदगत्या अंतर कापणारी जहाजे हे मराठ्यांचे बलस्थान होते. युरोपियनांचा तोफखाना आपल्यापेक्षा सरस आहे याची जाणीव असल्यामुळे मराठे समोरासमोर लढाई न करता शक्यतोवर मागून पाठलाग करून शिडांना जोडणाऱ्या दोरखंडांवर नेम धरून ते निकामी करीत. परिणामी शिडे तुटल्यामुळे जहाज पंगू होत असे. अशा स्तब्ध जहाजाला मग चहूबाजूंनी लहान जहाजांनी घेरून मग हातघाईची लढाई करून जहाज ताब्यात घेतले जाई. ही युद्धपद्धत अपरिचित असल्याने अनेक युरोपीय असे झाल्यावर भांबावत आणि आंग्र्यांचा विजय होई. अर्थात यालाही अनेक मर्यादा आणि अपवाद आहेत परंतु तो एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे.
(गुराब आणि पाल जहाज)
६ जानेवारी १७५४ रोजी तीन डच जहाजे कोकण किनारपट्टीलगत असताना त्यांना आंग्र्यांचे आरमार दिसले. त्यात ९ जहाजे ही पाल या प्रकारातली तर काही गुराब व गलबत या प्रकारातली होती. दोन्ही बाजूंनी एकमेकांना पाहताक्षणी गोळागोळी सुरू झाली ती दुसऱ्या दिवशीपर्यंत. आंग्र्यांचे आरमार त्यानंतर माघारी गेले आणि थोड्या वेळात लढाई पुन्हा सुरू झाली. तुळाजी आंग्रे जातीने तिथे हजर होते. विमेनम जहाजानजीक दोन पाले आली आणि जहाजाला घेरले, तरी मराठे जहाजावर प्रवेश करू शकले नाहीत. तोफाबंदुकांच्या माऱ्यामुळे पालांनी पेट घेतला. ती पाले विमेनम जहाजाच्या इतक्या जवळ आली होती की त्यांच्या पेटलेल्या दोरखंड व शिडांमुळे विमेनमलाही आग लागली. ही आग त्या जहाजाच्या दारूगोळ्यापर्यंत पोचताक्षणी अतिशय जबर स्फोट झाला. जहाजावरचे शेकडो लोक मरण पावले. आंग्र्यांचेही अनेक लोक मेले. तरी काही काळ मराठे विमेनमजवळ गेले नाहीत, कारण त्या जहाजावरील तोफा दारुगोळ्याच्या स्फोटामुळे अजूनही आपोआप आग ओकत होत्या. काही काळाने ते थांबले. अनेक लोकांनी त्या तरंगत्या लाकडाचा आधार घेतला. त्यांपैकी अनेक लोक आंग्र्यांनी टिपून मारले आणि काही लोकांना युद्धकैदी म्हणून घेतले. जहाजाचे अनेक तुकडे झाले आणि पाण्यावर तरंगू लागले.
त्यानंतर दोन मराठी गलबतांनी याकात्रा जहाजाला घेरले, त्याच्या मुख्य डोलकाठीवर नेम धरून ती तोडली आणि जहाजावर गेले. जहाजाच्या कॅप्टनला डोक्यात गोळी घालून ठार केले. डोलकाठी व पर्यायाने जहाजाला लागलेल्या धक्क्याने याकात्रा हे जहाज फ्रीड या जहाजाला धडकले आणि त्याच्या दोरखंडांमध्ये गुंतले. याकात्रा जहाजाचा काही भाग आता बाँब इ. मुळे पाण्याखाली बुडलेला होता. एका गुराबाच्या सहाय्याने याकात्रा जहाज किनाऱ्यापर्यंत आणण्यात आले. त्यावरील खलाशांना एका छोट्या होडीतून विजयदुर्ग किल्ल्यातील तुरुंगात ठेवण्यात आले.
(डच जहाज)
फ्रीड जहाजावरील सैनिकांनी मराठ्यांचा सर्वांत तिखट प्रतिकार केला. गोळागोळीसोबतच हातबाँबही फेकले. त्यांचा जोर इतका होता की मराठ्यांना परत फिरावे लागले. फ्रीड व याकात्रा ही जहाजे एकमेकांत गुंतलेली होती. याकात्रावरती मराठे आहेत हे पाहताच डचांनी तिकडे बाँब वगैरे फेकण्याचा सपाटा लावला. त्यामुळे याकात्रासोबतच फ्रीड जहाजाचाही स्फोट होऊन काही भाग पाण्याखाली गेला. अनेक मराठे सैनिक मरण पावले. फ्रीड जहाजाचा कॅप्टन सायमन रोट पाण्यावर तरंगत असलेला दिसला, त्याला डचांनी वर घेतले. एकुणात फ्रीड जहाजावर आता फक्त १२ लोक जिवंत उरले होते. त्या सर्वांना नंतर कैद करण्यात आले.
लढाईत जहाजांना जी इजा झाली त्यासाठी त्यांची डागडुजी करण्यात आली. याकात्रा जहाजाची मुख्य डोलकाठी पुन्हा बसवण्यात आली. याकामी विमेनम जहाजातलेच लाकूड पुन्हा वापरण्यात आले. याकात्रासारखे लहान आणि चपळ जहाज मराठ्यांच्या कामाचे होते. विमेनम वगैरेसारखी मोठी जहाजे त्यांच्या पसाऱ्यामुळे मराठे वापरत नसत. याशिवाय कैद्यांपैकी आठ सर्वोत्तम खलाशांना मराठ्यांच्या आरमारात जागाही देण्यात आली. अशी डागडुजी वगैरे करून १२ मार्च १७५४ रोजी मराठी आरमार विजयदुर्गहून नव्या मोहिमेकरिता सज्ज होऊन निघाले.
एकूण १८ युरोपियन्स आणि २४ मुसलमान खलाशी व सैनिकांना मराठ्यांनी कैद केले आणि त्यांना दारुगोळ्यासाठी गंधक इ. ची पूड करण्याच्या कामी लावले गेले. कडक पहाऱ्यात त्यांना विजयदुर्गच्या गोदीजवळच रहायला जागा दिलेली होती. त्यातला एक सैनिक कॉर्पोरल योहान आंद्रिसझोन याने तिथून निसटायची बरीच खटपट केली. विजयदुर्गाजवळ एका कोळ्यांच्या वस्तीपर्यंत तो लपत छपत एके दिवशी पोचला आणि तिथली एक होडी घेऊन पळून जाऊ लागला, परंतु ती होडी गळकी असल्याने त्याला तो बेत तिथेच सोडावा लागला. पुढे काही दिवसांनी २३ मार्च १७५४ रोजी त्याने लाकडाचे तीन ओंडके एकमेकांना बांधले आणि तसाच समुद्रात गेला. परंतु भरतीमुळे त्याला समुद्रात पुढे जाता आले नाही. तेव्हा त्याने संध्याकाळपर्यंत वाट पाहिली आणि मग निघाला. थोडे अंतर गेल्यावर तो तराफा सोडून लपत छपत पाच दिवस भीतीमुळे फक्त रात्रीच प्रवास करत आंग्र्यांच्या प्रदेशाला लागून असलेल्या कोल्हापूर छत्रपतींच्या राज्यात पोचला. तिथे त्याला जेवण इ. मिळाल्यावर मग तो थोडा सावरला आणि दीडेक महिन्याभरात एकदम दक्षिणेला तंजावरजवळ तिरुचिरापल्ली इथे पोचला. तिथे फ्रेंच लष्करातल्या पाच मराठ्यांनी त्याला अडवले आणि फ्रेंच लष्करात काम करण्याची खूप गळ घातली, जबरदस्तीही केली. परंतु तो ऐकत नाही हे पाहताच त्याला दोन दिवसांत सोडले. पुढे तो दहाएक दिवसांत तमिळनाडू येथील नागपट्टणम बंदरात पोचला. तिथे डचांची एक वखार होती. तिथे त्याने हा सगळा वृत्तांत सांगितला.
कॉर्पोरल योहान आंद्रिसझोन सोडून बाकी लोकांना नंतर मराठ्यांनी सोडून दिले. त्यांपैकी फ्रीड जहाजाचा कॅप्टन सायमन रोट आणि अन्य १८ खलाशी यांना एकूण १०,००० रुपये देण्यात आले. आंग्र्यांसोबत इतक्या जिवाच्या कराराने लढून जिवंत राहिल्याबद्दलचे हे बक्षीस होते. तत्कालीन डच कंपनीमध्ये एका कॅप्टनचा वार्षिक पगार साधारणपणे ६६६ रुपये तर एका खलाशाचा वार्षिक पगार हा साधारणपणे ४३ रुपये इतका होता. वार्षिक पगाराशी तुलना केली तर प्रत्येकाला वार्षिक पगाराच्या अनेक पट "बोनस" मिळाला हे उघड आहे! तेव्हा या वीसेक लोकांचे या लढाईमुळे अच्छे दिन आले असे म्हणायला हरकत नसावी.
या लढाईमुळे सर्वांत हाहा:कार उडाला तो बटाव्हिया व हॉलंडमध्ये. तेव्हाचे बटाव्हिया म्हणजे आत्ताच्या इंडोनेशियाची राजधानी योग्यकार्ता ऊर्फ जाकार्ता. बटाव्हिया हे डचांच्या आशिया खंडातील साम्राज्याचे केंद्र होते. या लढाईचा अहवाल बटाव्हियामध्ये पोचल्यावर तिथल्या अधिकाऱ्यांनी अतिशय आश्चर्य व्यक्त केले आणि चक्क डच कंपनीच्या जहाजांचा मार्गच बदलून टाकला! बटाव्हियाहून हॉलंडमधील कंपनीच्या संचालक मंडळाला पाठवलेल्या पत्रात या बदललेल्या मार्गांचा उल्लेख सापडतो. अगोदर किनाऱ्याजवळून असलेले मार्ग आता एकदम खुल्या समुद्रातून जातील असे त्यांनी स्पष्टपणे जाहीर केले. खालील नकाशातून ते स्पष्ट होईल. बटाव्हियाहून सुरतेला ऑगस्टमध्ये जावयास निघणाऱ्या जहाजांनी मालदीवला वळसा घालावा, तर सप्टेंबर इ. मध्ये जाणाऱ्यांनी श्रीलंका आणि तिथून खुल्या समुद्रातून सुरतेला जावे असे त्यांनी फर्मान काढले. सुरतेहून श्रीलंकेला जावयास निघणारी जहाजेच फक्त मलबार किनाऱ्यापाशी राहतील आणि तिथेही आंग्र्यांचा धोका टाळण्यासाठी किनाऱ्यापासून दूर राहतील व लंकेला न जाणारी जहाजे सरळ मालदीवमार्गे बटाव्हियाला जातील असे ते नवीन व्यापारी मार्ग होते.
हॉलंडमध्येही या लढाईची बातमी किमान १६ वेळेस तरी समकालीन वृत्तपत्रांमध्ये छापून आली. इंग्लंड व फ्रान्समधील वृत्तपत्रे आणि पुस्तकांमधूनही या लढाईचे वर्णन आलेले आहे. एकूणच आंग्रे ऊर्फ "आंग्रिया" या नावाशी युरोपचा परिचय तसा जुनाच आहे. आंग्र्यांना जुन्या साधनांमध्ये लुटारू म्हणत त्याचा परिणाम इतका झाला की पायरेट्स ऑफ करिबिअन या प्रसिद्ध चित्रपटाच्या पार्ट ३ मध्ये "सुंभाजी आंग्रिया" नामक एक "इंडियन पायरेट" दाखवलेला आहे. पण सुदैवाने नवीन संशोधनात आंग्र्यांचे खरे हुद्दे ( मराठी आरमाराचे सरखेल इ.) व कार्य अधोरेखित केले जाते त्यामुळे त्यांच्यावरचा लुटारूपणाचा शिक्का कालांतराने पूर्णपणे पुसला जाईल अशी अपेक्षा आहे.
विमेनम जहाजावरील एक खलाशी मायकेल एव्हरहार्ट याने पुढे काही वर्षांनंतर केरळातील वरकला (त्रिवेंद्रमपासून ५० किमी) येथील जनार्दनस्वामी मंदिराला एक घंटा भेट दिली. २ डिसेंबर २०१६ मध्ये तिथे जाण्याचा मला योगही आला. त्या घंटेवर त्याचे नाव इ. तपशील आहेत. दुर्दैवाने देवळात फोटो काढण्याला परवानगी नसल्यामुळे घंटेचा फोटो घेता आला नाही. अशा तऱ्हेने मराठ्यांशी संबंधित हा अवशेष केरळातील एका देवळात शिल्लक आहे.
ही लढाई हा मराठ्यांचा सर्वार्थाने विजय होता. तरी डचांनीही कडवा प्रतिकार केला. दुर्दैवाने यानंतर दोनच वर्षांत १७५६ साली तुळाजी आंग्र्यांवर अंतर्गत वैमनस्यामुळे पेशवे आणि इंग्रज या दोघांनी मिळून हल्ला केला आणि आंग्र्यांचे सागरी वर्चस्व कायमचे संपले. त्याची कारणे व परिणाम हा एक स्वतंत्र विषय आहे. इथे हे लक्षात घेणे गरजेचे आहे की मराठे खोल समुद्रात कधीही न जाता, तुलनेने मागासलेल्या युद्धपद्धती वापरूनही युरोपियन सत्तांना अनेकवेळेस भारी पडले. या लढाईच्या निमित्ताने मराठी आरमाराचे गुण आणि दोष हे सारखेच अधोरेखित होतात.
मराठे इ.स. १८ व्या शतकात भारतभर पसरले होते. जसे अगोदरच्या काळात मुघल होते तसेच. दोन्ही सत्तांची तुलना नेहमीच होत असते. पण मराठ्यांकडे एक अशी गोष्ट होती जी मुघलांकडे कधीच नव्हती - समुद्रात जाणारे लढाऊ आरमार. मुघलांचे आरमार बंगालमध्ये ब्रह्मपुत्रा इ. नद्यांमध्ये असे. समुद्रात जाण्याइतपत त्याची झेप नव्हती. युरोपियन सत्तांना हरवणे तर दूर की बात. मराठ्यांनी मात्र शिवकाळापासून अगदी १७८० पर्यंत युरोपीयांना वेळोवेळी समुद्रावर हरवलेले आहे. असे अनेकवेळेस करणारी भारतातील एकमेव सत्ता म्हणजे फक्त मराठेच होत. त्यामुळे मराठ्यांचे वेगळेपण सांगणाऱ्या ज्या ठळक बाबी आहेत त्यात आरमाराचा उल्लेख आवर्जून केलाच पाहिजे.
(लेखक मराठे- डच संबंधांवरील विषयाचे अभ्यासक आहेत.)

Saturday, March 17, 2018

गुढीपाडवा

गुढीपाडवा....स्वातंत्र्योत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा!

संजय सोनावणी यांच्या Facebook Post वरून साभार

प्रदिर्घ काळ महाराष्ट्र व आसपासच्या राज्यांवर राज्य करणारे महाराष्ट्रातील एकमेव घराणे म्हणजे सातवाहन. आजच्या महाराष्ट्राच्या भाषा-संस्कृतीचा पाया घालणारा, तिचे वर्धन करत महाराष्ट्राची ओळख निर्माण करणारा हा राजवंश. महाराष्ट्रातील रायगड (मुळ नांव रायरी), राजमाची अशा शेकडो किल्ल्यांची मुळ उभारणी सातवाहन काळात झाली. "तिनही समुद्रांचे पाणी चाखणारे अश्व असलेले सातवाहन" अशी सार्थ बिरुदावली त्यांनी मिरवली. साडेचारशे वर्षांच्या कालावधीत शेकडो महाराष्ट्री प्राकृतातील शिलालेख, हालाच्या "गाथा सप्तशती" सारखे नितांत सुंदर काव्यसंग्रह, वररुचीच्या "प्राकृतप्रकाश" या व्याकरण ग्रंथाने माहाराष्ट्रीला समृद्धी दिली. पुर्वी रट्ठांचा समूह तो महाराष्ट्र अशी ओळख पुसून या रट्ठसमुहाला एकाच एक राजकीय पटलाखाली आणले. देशी-विदेशी व्यापारातून आर्थिक समृद्धी आणली व प्रजेला ख-या अर्थाने सुखाचे दिवस दाखवले. हालाच्या गाथांतील काव्यावरून एका आनंदी खेळकर समाजाचे दर्शन जे घडते ते त्यामुळेच.
त्यामुळे महाराष्ट्राचे संस्थापक, वर्धनकर्ते हे सातवाहन होत असे म्हणायला काहीही प्रत्यवाय नाही. संपुर्ण महाराष्ट्र आणि सातवाहनांची सत्ता असलेल्या अन्य प्रदेशांत (राज्यांत) गुढीपाडवा हा नववर्ष दिन म्हणून साजरा होतो. गौतमीपूत्र सातकर्णी या महावीराने नहपान या शक क्षत्रपावर विजय मिळवून महाराष्ट्र व आसपासचा परिसर स्वतंत्र केला तो हा स्वातंत्र्यदिन...नवीन संवत्सर सुरु करुन यादगार बनवले. आजही आपण गुढ्या उभारून हा विजयोत्सव साजरा करत असतो.
आताच्या महाराष्ट्रात उदयाला आलेले परंतु उत्तरेत गुजरात, मध्यप्रदेश ते खाली दक्षीणेत महाराष्ट्रासहित कर्नाटक, गोवा आणि आंध्रापर्यंत साडेचारशे वर्ष एवढा प्रदिर्घ काळ सत्ता गाजवणारे एकमेव घराणे झाले, ते म्हणजे सातवाहन घराणे. इसवीपुर्व २३० मद्धे हे घराणे उदयाला आले. जुन्नर ही त्यांची पहिली राजधानी होती. नंतर ती पैठण येथे नेली गेली. छिमुक सातवाहन हा या घराण्याचा संस्थापक मानला जातो. तत्कालीन काण्व राजांचा पराभव करून त्यांनी महाराष्ट्र व मध्य भारतावर आपली सत्ता कायम केली. त्याहीपुर्वी सातवाहन घराण्यातील लोक अशोकाचे मांडलिक म्हणून महाराष्ट्रावर सत्ता गाजवत असावेत असा विद्वानांचा कयास आहे. पुढे काण्व आले आणि नंतर स्वतंत्र राज्य स्थापन केली जी पुढे साडेचारशे वर्ष टिकली. भारतात एवढा प्रदिर्घ काळ सत्ता चालवणारे दुसरे घराणे झाले नाही. मध्य आणि दक्षीण भारताच्या संस्कृतीवर कधीही न पुसणारा परिणाम या घराण्याने केला.
कोण होते हे सातवाहन? पुराणांत त्यांना आंध्र असे म्हटले आहे. ते शूद्र (अवैदिक) वर्णाचे होते असाही उल्लेख पुराणे करतात. आंध्र म्हणजे ऐतरेय ब्राह्मण व महाभारतात ज्यांचा उल्लेख औंड्र असा आला आहे त्या वंशाचे. हा भारतातील पुंड्र, मुतीब, शबर ई. जमातींप्रमाणे एक अवैदिक वंश होता. हा मुळचा पशुपालक समाज. महाराष्ट्र प्राचीन काळापासुन अपवाद वगळता निमपावसाळी प्रदेश असल्याने येथे मेंढपाळी हाच मुख्य व्यवसाय होता. त्यामुळे त्याच समाजातुन राजे निर्माण होणे स्वाभाविक होते. महाभारतात औंड्रांना असूर राजा महाबळीचा पुत्र असे निर्देशिलेले आहे. औंड्र समाज हा पुंड्रांसोबत दक्षीणेत पुरातन काळापासून वावरत होता. आजचे ऒडिशा, आंध्र ही प्रदेशनामेही औंड्रांवरुनच पडलेली आहेत, यावरुन या समाजाचा व्यापक विस्तार ल्क्षात यावा. मावळालाही "आंदर मावळ" असे म्हटले जाते. "आंदर मावळ" हे नांव आंध्र अथवा औंड्र मावळवरुन बनला असावा. सातवाहनांची पहिली राजधानीही याच प्रदेशात असल्याने हा शब्दही आंध्र-औंड्र याचाच अपभ्रंश असावा असे म्हटले तर वावगे होणार नाही. सातवाहन हे सहिष्णू होते. पांचरात्र या अवैदिक संप्रदायाशी निष्ठा ठेवत त्यांनी बौद्ध लेण्यांना उदार राजाश्रय दिला तसेच अनेक यज्ञही करवून घेत वैदिकांनाही दानदक्षीणा दिल्या.
सातवाहन काळात त्यांचा व्यापार सुदूर इजिप्त, रोम, अरबस्तान ईत्यादि देशांत फैलावलेला होता. भडोच, कल्याण, चेऊल ई. पश्चिम किनारपट्टीतील बंदरांतून मोठ्या प्रमाणात आयात-निर्याती होत. यांच्याच काळात महाराष्ट्रात गिरीदुर्ग आणि लेण्यांची निर्मितीही मोठ्या प्रमाणात झाली. व्यापारासाठीचा आजही प्रसिद्ध असलेला नाणेघाट आणि त्याच घाटात असलेल्या गुंफांतील प्रदिर्घ शिलालेख आणि सातवाहनांचे प्रतिमागृह त्यांच्या वैभवाची साक्ष आहेत. केवळ हेच घराणे दक्षीणेत बळकट राहिल्याने उत्तरेत सर्वस्वी सत्ता गाजवणारे कुशाण घराणे दक्खनेत कधीच पाय रोवू शकले नाही. त्यांच्या राजकाळात साहित्य संस्कृतीने वैभवाचे टोक गाठले होते. हालाची "गाथा सप्तशती", गुणाढ्याचे "कथा सरित्सागर", वररुचीचे माहाराष्ट्री प्राकृताचे व्याकरण अशा अजरामर कृती त्यांच्याच काळात लिहिल्या गेल्या. हाल सातवाहनाच्या गाथा सप्तशतीत तत्कालीन मोकळ्या ढाकळ्या समाजाचे प्रतिबिंब पडले आहे. अनेक स्त्रीयांच्या काव्य रचना या काव्यग्रंथात सामाविष्ट केलेल्या आहेत. सातवाहन घराण्यात महिलांचे स्थान किती उच्च दर्जाचे होते हे नागणिका, बलश्री सारख्या किर्तीवंत राजनिपूण महिलांवरुनही दिसून येते.
एवढा प्रदिर्घ काळ सत्ता चालवतांना चढ-उताराचेही प्रसंगही येणे स्वाभाविक होते. गौतमीपुत्र सातकर्णी सत्तेवर आला तेंव्हा अशीच बिकट परिस्थिती होती.साडेचारशे वर्षांच्या प्रदीर्घ राजवटीत स्वाभाविकपणे चढ-उताराचेही प्रसंगही आले. नहपान हा क्षहरात घराण्यातील पश्चिमेवर राज्य करणारा एक क्षत्रप होता. मुळचे हे क्षत्रप कुशाणांचे अधिकारी, पण कुशाणांची सत्ता खिळखिळी झाल्यावर ते स्वतंत्र बनले. इ.स. ३२ मद्धे नहपान सत्तेवर आला. तो अत्यंत महत्वाकांक्षी होता. या काळातील सुंदर, चकोर वगैरे सातवाहन राजे दुर्बळ निघाले. याचा फायदा घेत त्याने सातत्याने स्वा-या करत सातवाहनांचा बहुतेक प्रदेश जिंकुन घेतला. गौतमीपुत्र सातवाहन सत्तेवर आला तेंव्हा सातारा-क-हाड एवढाच भाग त्याच्या स्वामित्वाखाली होता.
कोकण प्रदेशही नहपानाने हिरावून घेतला असल्याने तेथून चालणारा व्यापारही नहपानाच्या हाती गेला. महाराष्ट्रातील प्रजा गुलाम झाली. पराकोटीचे शोषण सुरु झाले.
परंतु गौतमीपुत्र हा अत्यंत पराक्रमी पुरुष होता. त्याने नहपानावर सलग आक्रमणे सुरू केली. जवळपास वीस वर्ष त्याने नहपानाशी संघर्ष केला. त्याला पूर्वजांनी उभारलेल्या गिरिदुर्गांचाही त्याला उपयोग झाला. त्याने शक्तीबरोबरच युक्तीचाही वापर केला. डॉ. अजय मित्र शास्त्री जैन परंपरेचा हवाला देऊन लिहितात, 'गौतमीपुत्राने शेवटी आपल्या हेरांचा वापर करुन नहपानाला विपुल दानधर्म करायला प्रोत्साहित केले व त्यामुळेच नहपानाचा विनाश करण्यात गौतमीपुत्र यशस्वी झाला ही केवळ दंतकथा मानता येत नाही.' शेवटी नाशिक जवळ अतिशय निकराचे युद्ध करुन गौतमीपुत्राने नहपानाचा समूळ पराभव केला. त्याला ठार मारले. नाशिक येथील लेण्यातील एका शिलालेखात गौतमीपुत्राबद्दक्ल अभिमानाने नोंदवले गेले... "खखरात (क्षहरात) वंस निर्वंस करस"
एका अर्थाने हा महाविजय होता. परकीय शकांच्या जवळपास तावडीत गेलेले आपले विशाल साम्राज्य गौतमीपुत्राने आपल्या नितांत पराक्रमाने परत जिंकून घेतले. पुढे दिडशे वर्ष या साम्राज्याकडे वाकड्या नजरेने पाहायचे सामर्थ्य कोणात आले नाही.
नहपानावरील हा अद्वितीय असा विजय मिळाला तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा होय. इसवी सनाच्या ७८ मध्ये ही क्रांती घडली. हा विजयोत्सव प्रजा गुढ्या उभारून साजरा करणे स्वाभाविक होते. तोच दिवस बनला गुढीपाडवा. अखिल दक्खनेच्या स्वातंत्र्याचा दिवस. या दिवसापासून गौतमीपुत्राने संवत्सर सुरु केले ते म्हनजे सालाहन (शालिवाहन नव्हे) शक. या विजयानंतर गौतमीपुत्राने आपले साम्राज्य एवढे बलाढ्य केले की त्याला भारतीय इतिहासात तोड नाही. 'तीन समुद्रांचे पाणी प्यायलेले घोडे ज्याच्याकडे आहेत असे ते सातवाहन' अशी सार्थ उपाधी त्यांना मिळाली.
आपल्या अनेक सणांमागे एक अद्भुत असा इतिहास दडलेला असतो. परंतू पुराणकारांनी मात्र प्रत्येक सणाचे वैदीकीकरण करण्याच्या प्रयत्नात इतिहास बाजूला ठेवून धार्मिक स्तोम तेवढे वाढवल्याचे दिसते. उदाहरणार्थ गुढीपाडव्याच्या (चैत्र शुद्ध प्रतिपदा) दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती करून कालगणनाही सुरू केली अशी कथा ब्रह्मपुराणात व व्रतराजात येते. कधी रामाचाही संबंध गुढीपाडव्याशी जोडला जातो. पण इसवी सन ७८ पासूनच शालीवाहन शकाचे पहिले वर्ष का गणले जाते यावर कोणी विचार केलेला दिसत नाही. नहपानाचा मृत्यू सन ७८ मद्धेच झाला याबाबत विद्वान इतिहासकारांनाही शंका नाही. या सणामागील मुळ उद्देश्य गौतमीपुत्र सातकर्णीने नहपान या शक (क्षत्रप) राजावर मिळवलेल्या अद्भुत विजयाचा आनंदोत्सव साजरा करणे हा आहे हे सहसा आपल्याला माहीत नसते. प्राचीन काळी अगदी एखाद्या घरातील आनंदवार्ताही घोषित करण्यासाठी गुढ्या उभारल्या जात. हा तर एक जनतेच्व्हा स्वातंत्र्योत्सव होता त्यामुळे सर्वांनीच गुढ्या उभारणे स्वाभाविक होते आणि तीच पुढे परंपरा कायम झाली.
हा धार्मिक उत्सव नसून महाराष्ट्राला स्वातंत्र्याचा मंगलदिवस आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. दुसरे महत्वाचे असे कि "शालिवाहन शक" असा मुळात शब्दच नाही. या नांवाचा कोणताही राजा होऊन गेलेला नाही. शालिवाहन हा शब्द मूळ प्राकृतातील 'सालाहन' असा आहे. प्राकृत भाषेचे संस्कृतीकरण करण्याचा अवाढव्य प्रयत्न इसवी सनाच्या दुस-या शतकात सुरू झाला. तेव्हा मूळ प्राकृत नावे, शब्द बदलण्यात आले. सातवाहनांच्या तत्कालीन शिलालेखांमध्येही "सालाहन" अशीच नोंद आहे, शालिवाहन नव्हे. परंतू संस्कृतीकरणाच्या नादात सालाहनचे "शालिवाहन" केले गेले व शालिवाहन नांवाचा कोणताही राजा झाला नसल्याने शालिवाहन शकाभोवती खोट्या कथा निर्माण करून मुळ इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला गेला ही दुर्दैवी बाब आहे.
खरे तर सातवाहनांमुळे उत्तरेकडून सतत होणा-या आक्रमणांपासून साडेचारशे वर्ष दक्षीण सुरक्षित राहिली. आपली संस्कृती भेसळीपासून सुरक्षित राहिली. शक-हुण-कुशाण अशा आक्रमकांना नर्मदेपलीकडेच ठेवण्यात यश मिळाले. गौतमीपूत्र सातकर्णीने आपल्या पराक्रमाच्या जोरावर शकांचे संकट हरण केले. नहपानासारख्या बलाढ्य शकाचा नुसता पराजयच केला नाही तर त्याला रणांगनात ठार मारून निर्वंश केले. हा आपल्या इतिहासातील पहिला स्वातंत्र्यलढा. ज्या दिवशी हा अलौकिक विजय मिळाला तो आपण गुढीपाडवा म्हनून साजरा करतो. जेथे जेथे सातवाहनांचे साम्राज्य होते बव्हंशी त्याच प्रदेशांत गुढीपाडवा साजरा केला जातो हेसुद्धा लक्षात ठेवले पाहिजे.
म्हणजे लोकांची स्मृती आपल्या एका महान सम्राटालाच दरवर्षी मानवंदना देत आलीच आहे...
पण मूळ इतिहास पुसटला गेला असतांना. त्या इतिहासाला आता जीवंत करून महाराष्ट्राच्या संस्थापकांना गुढीपाडव्याच्या निमित्ताने मानवंदना देणे आपले कर्तव्य ठरते.
दुर्दैवी भाग असा की या सणाला भलत्यांशेच जोडण्याचे काम जसे वैदिकांनी केले तसेच अलीकडे काही अतिउत्साही विद्रोही अनभ्यासी लोक या सणाचा संबंध शंभुराजांच्या हत्येशी जोडतात. ते समूळ चुकीचे आहे. अनेक संशोधक शालिवाहन शकाचे श्रेय कनिष्क वा चष्टन या कार्दमकवंशीय लहान सत्ताधाऱ्याला देण्याचा प्रयत्न करतात पण ते समूळ चुकीचे आहे. कनिष्क हा मुळात शक वंशीय नव्हता त्यामुळे तो शक संवत सुरू करण्याची शक्यता नव्हती. चष्टन हा एक सामान्य शक अधिपती होता, त्यामुळे त्याने संवत सुरू करण्याची वा उत्तर ते दक्षिणेतील लोकांनी स्वीकारण्याचीही शक्यता नव्हती. तेवढे मुळात त्याचे राज्यही नव्हते. शालिवाहन नामक कोणताही राजा भारतात कधीही झाला नसल्याने शक संवताला शालिवाहन हे काल्पनिक नांव दहाव्या-बाराव्या शतकात कधीतरी जोडले गेले हा काही विद्वानांचा दावाही निरर्थक असाच आहे. सालाहन या प्राकृत शब्दाचे कृत्रीम संस्कृतीकरण करण्याच्या नादात शालीवाहन हे रुप देऊन आणि इतिहासही भ्रष्ट करण्याच्या नादात पुराणकारांनी गौतमीपुत्राला पार अदृष्य करुन टाकले आणि या अत्यंत मंगलदायक स्वातंत्र्याच्या दिवसाला काही संबंध नसतांना ब्रह्मादेवाशी, तर कधी रामाशी भिडवून सोडले. प्राचीन इतिहासाचे हे वैदिक विकृतीकरण जेवढे निषेधार्ह आहे तेवढेच विकृतीकडे झुकलेल्या विद्रोह्यांचे वर्तनही निषेधार्ह आहे.
गुढीपाडव्याच्या, आपल्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धातील जयाच्या अनंत शुभेच्छा!

Friday, March 16, 2018

आदिरहस्य

स्टीफन हॉकिन्ग याना माझी कवितेतून श्रद्धांजली. कवी आहेत वसंत बापट.

कविता थोडी मोठी आहे, पण आशयपूर्ण आहे. शेवट तर सुंदरच आहे.

------------------------------------------------------

आदिरहस्य

आज विश्वरचनेची पाहून घेतली रंगीत तालीम
आदिरहस्याने दिले मला एकवार दर्शन
निराकारा आकार देते तेजाबाचे तेज जालीम
पोलादाचे पंख छाटीत चालू होते वज्र घर्षण
लाल जीभा, लाल जटा, अग्निदेव अप्रमेय
आकाश भरून वारा फुंकील एवढा मोठा वीजविंझण
कितीतरी योनींमधून परिभ्रष्ट कार्तिकेय
अगदी तसे ज्योतीर्मुख सहस्त्राश्व लोहइंजिन

विश्वाकार मेघ जसा ‘बहु स्याम’ गर्जत उठला
स्फोटायमान पोलादाचा थेट जसा निळा लोळ
सूर्यस्फटिक पेरण्यासाठी आदिमहासूर्य फुटला
तसा इथे द्रवीभूत अग्निप्राय लोहगोळ
अहा अहा ! पहा तरी निळे निळे शुक्र शंभर
तेज:पुच्छ धूमकेतू ! एवढ्या उल्का कोण मोजील ?
स्वयंचलित विश्वमाला, नवनिर्मित अमित अंबर...
कोण यांच्या ऋचा रचील ? कोण नवे यज्ञ योजील ?

अणुप्राणित अणुरेणू जेव्हा नानाकार झाले
थेट अशीच घडामोड तेव्हादेखील घडली होती
अमिबा ते दिनासुर एका क्षणात जुळून गेले
यदृच्छेने चैतन्याची गाठभेट पडली होती...
कुणास ठाऊक पुढे काय ? एक दिवस असा येईल,
तथाकथित जडाकार करू लागतील चलनवलन
आम्ही धक्का दिला ज्याला तेच चाक कुठे नेईल?
कुणास ठाऊक! उत्क्रांतीचे हेच असेल नवे स्फुरण !

पहा इथे, भूमिमधून ताठ मान वर करून
विद्युन्मंत्र देत घेत एक मिनार उंच उभा
नसानसांत इथरवाणे पेट्रोलियम भरभरून
सूर्यचुंबी पतंगाची धडक बसते नव्या नभा
स्वाहाकार किती होवो, एक तिथी अशी येईल
यज्ञकुंड भूकभूक तेव्हा देखील करीत असेल
उरले सुरले जुने जग...त्याची शेषाहुती होईल
कृतार्थ खापरपणतू समाधानाने हसेल

का नाही हसू त्याने? त्याच्यासाठी कोण बांधील
अदृश्य किरणांचा सूर्यापर्यंत गगनझुला
त्याच्यावरून जाईल त्याची मनोवेग अॅटममोबिल
प्रियेसाठी घेऊन येईल मंगळावरील लाल फुलां
त्याची मुले करीत बसतील गणित एक पार नवे....
...प्लुटोपासून पृथ्वीपर्यंत सूर्य दिसला हजार वेळा
तर सेकंदाला वेगमान काय हवे?
...त्यातले एक पोर म्हणेल, हे गणित की पोरखेळ?

त्याच विराट विश्वाचा हा इथे आहे मूळ वाफा
पहा तरी पोलादाची निळी निळी बागशाही...
जागोजाग आगफुले, रातंदीस उभा ताफा
गुलछडीहून वेल्डिंगवेली कमी शोभिवंत नाही
भुईवरती बकुळफुले इवले त्यांचे दंतुर दात
नटमोगरे ढाळत आहेत पोलादाचे नाजूक पराग
चिमण्या-देठावरती उले केशरी कमळ आभाळात
लोखंडाच्या चाफ्यावाराती मिणमिणणारे सोनचिराग

जशी जॅकची वालीवेली उंचउंच वाढत गेली
तशी इथली परसबाग वाढणार आहे दाटदाट.
तुमच्या भ्रष्ट मंदिरांची फार दिवस गय केली
याच्यापुढे ईश्वराला जरा मिळणार नाही वाट
दुसरी खूप कामे आहेत : शीतगृहे सूर्यावर,
चंद्रावरती अणुभट्टी, शुक्रावरच्या प्रयोगशाळा..
चवथ्या सूर्यमालेकडचा रस्ता तयार झाल्यावर
पाठवायचे आहे तान्ह्या बाळां !

‘धन्य धन्य आहे यांची’, म्हणा जरा मोकळ्या स्वरात
वेगळे असले तरी तुमच्याच वंशवेलींवरचे तुरे
जाणारच आहे वाहून तुमचे सारे नव्या पुरात,
तरी देशील शाप बंद! षंढ पुटपुट आता पुरे
तुम्हीच त्यांचे बुस्टर बरे! रॉकेट गेले, आता जळा!
दिशा ठरली वेग ठरला नवे विश्व त्यांच्यासाठी
सूर्यचंद्र त्यांची कुळे, त्याना नको तुमचा मळा!
बाण काय रॉकेट काय पुन्हा येत नसते पाठी !

त्यांना नको आशीर्वाद, तरी म्हणा ‘सुखी असा’
आणि मौन धरण्यापूर्वी त्यांना आपले एवढे पुसा
...सारे चंद्र तुमचे असोत, चांदण्यात फिरणार ना?
कधी काळी दु:ख झाले, कुशीमध्ये शिरणार ना?
पहिल्या सूर्ययात्रेपूर्वी कडकडून भेटाल बापा?
यात्रिक परत येताक्षणी आई घेईलच ना पापा?
मन येईन उचंबळून पाहून बाळ गोजिरवाणे?
गणित पुढले करीत असता कधी गुणगुणाल ना गाणे?

त्यांनी नकार दिला तरी होऊ नका बापुडवाणे!
त्यांना त्यांची गती प्रिय तुम्हा जसे तुमचे गाणे
विश्वास ठेवा, एक दिवस लोहमिनारपूजा होईल
नवा सूर्य दिसताक्षणी कोणी उषासूक्त गाईल
सप्तग्रही फिरताफिरता प्रेमिकांना ओढ लागेल
नेपच्यूनकडला चंद्र पहात गुरुवरचा कवी जागेल
एकटे कोणी रहाणार नाही परार्धाव्या सूर्यावरती
‘बहु स्याम’ म्हणत म्हणत गजबजेल पुन्हा धरती.

वसंत बापट

‘सकीना’ काव्यसंग्रहातून