आपण मागच्या भागात माणसाच्या चार अवस्था असतात हे पहिले.
१> जागृतावस्था
२> स्वप्नावस्था
३>सुषुप्ती
४> तुर्यावस्था
खरेतर तीनच अवस्था म्हणता येईल. पाटल्या, हार, अंगठी आणि सोने असे चार पदार्थ नाहीत. पाटल्या, हार आणि अंगठी यातच सोने अंतर्भूत आहे हे आपल्याला सहज समजते. परंतु सोयीसाठी आपण या चार अवस्था मानू.
या उपनिषदाच्या १२ श्लोकांपैकी पहिल्या सात श्लोकात या चार अवस्थांचे विवेचन (आत्मविचार) आहे. मात्र तुर्यावस्थेचे केवळ पुस्तकी ज्ञान असून भागणार नाही, तर त्या अवस्थेच्या अनुभवातून ज्ञान झाले पाहिजे असे मांडुक्य उपनिषद आग्रहाने सांगते. आठव्या श्लोकापासून हे उपनिषद तुर्यावस्थेचे ज्ञान होण्यासाठी एक मार्ग सुचविते. हा मार्ग (ओंकारविचार) म्हणून ओळखला जातो.
ओंकाराचा उच्चार योग्य प्रकारे केल्यास आपण तुर्यावस्थेचा अनुभव घेऊ शकतो असे मांडुक्य उपनिषद सांगते. ओंकारामध्ये साडेतीन मात्रा आहेत. 'अ ', 'उ ', 'म' आणि उच्चाररहित अर्धमात्रा. यातील 'अ ' हा जागृतावस्थेशी, 'उ' हा स्वप्नावस्थेशी तर ' म' हा सुषुप्तीशी संबंधित आहे. उच्चाररहित अर्धमात्रा आपल्याला तुर्यापर्यंत घेऊन जाते असे हे उपनिषद सांगते. ओमचा उच्चार करताना 'म' नंतर जी स्पंदने जाणवतात त्यावर ध्यान केले असता एका विलक्षण शांततेचा अनुभव येतो. हाच तो तुर्य.
ओंकारासंबंधी मांडुक्य उपनिषदाने काय सांगितले आहे हे स्पष्ट होण्यासाठी आपण ज्ञानेश्वरमाउलींनी ओंकारासंबंधी काय सांगितले आहे ते पुढील लेखात पाहू.