नासदासीन्नो सदासीत्तदानीं नासीद्रजो
नो व्योमा परो यत् । किमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्भः किमासीद् गहनं गभीरम् ॥ १॥
• तेव्हा शून्यही नव्हते, अस्तित्वही नव्हते, तेव्हा हवा नव्हती, त्यापलीकडे
आकाशही नव्हते. ते कशाने झाकले गेले होते? ते
कुठे होते? तेव्हा वैश्विक पाणी कोणाच्या
आश्रयाने होते, ते किती अथांग, किती खोलवर होते?
न मृत्युरासीदमृतं न तर्हि न
रात्र्या अह्न आसीत् प्रकेतः । आनीदवातं स्वधया तदेकं तस्माद्धान्यन्न परः किं
चनास ॥२॥
•तेव्हा मृत्यू नव्हता, अमरत्व नव्हते किंवा रात्र-दिवसाचे चक्र नव्हते. त्याने हवाविरहित आणि स्वयंप्रेरणेने श्वास घेतला. तेव्हा तो एकमेव अस्तित्वात होता, आणि दुसरे कोणीही नव्हते (केवळ ब्रह्म होते ) .
तम आसीत् तमसा गूळ्हमग्रे प्रकेतं
सलिलं सर्वमा इदम् । तुच्छ्येनाभ्वपिहितं यदासीत् तपसस्तन् महिनाजायतैकम् ॥३॥
•आधी फक्त अंधारात लपेटलेला अंधार
होता. (अंधाराच्या अंत लपलेले पाणी होते (अथांग पाण्याचा महासागरही अस्तित्वात नव्हता). तो यातूनच अस्तित्वात आला, पण तो मुक्त होता. तो शेवटी अग्नीच्या सामर्थ्याने जन्माला आला
कामस्तदग्रे समवर्तताधि मनसो रेतः
प्रथमं यदासीत् । सतो बन्धुमसति निरविन्दन् हृदि प्रतीष्या कवयो मनीषा ॥४॥
•सुरुवातीला तो इच्छेतून जन्माला. ते मनापासून जन्मलेले आदिम बीज होते. ज्या ऋषींनी आपल्या अंतःकरणाचा शहाणपणाने शोध घेतला आहे ते जाणतात की त्यांचे खरे नाते कोणाशी आहे आणि कोणाशी नाही (ब्रह्म आणि माया यातील भेद ते ओळखतात) .
तिरश्चीनो विततो रश्मिरेषामधः स्वि
दासीदुपरि स्वि दासीत् । रेतोधा आसन् महिमान आसन् स्वधा अवस्तात् प्रयतिः परस्तात्
॥५॥
•त्यांनी (ऋषींनी ) आपले अस्तित्व शून्यात विलीन केले आहे, वर काय आहे आणि खाली काय आहे हे त्यांना माहीत आहे. मुख्य शक्तीने (ब्रह्माने) बलाढ्य शक्तींची निर्मिती केली. मुलत: एक शक्ती होती आणि तिच्यावर आवेग स्वार होता.
को अद्धा वेद क इह प्र वोचत् कुत
आजाता कुत इयं विसृष्टिः । अर्वाग् देवा अस्य विसर्जनेनाथा को वेद यत आबभूव ॥६॥
•पण, शेवटी, हे विश्व कोठून आले आणि निर्मिती कशी
झाली हे कोणाला माहीत आहे काय, कोण सांगू शकेल? देव स्वतः विश्वाच्या निर्मितीनंतरचे आहेत, मग तहे विश्व कोठून उद्भवले हे कोणाला माहित आहे?
इयं विसृष्टिर्यत आबभूव यदि वा दधे
यदि वा न । यो अस्याध्यक्षः परमे व्योमन् सो अङ्ग वेद यदि वा न वेद ॥७॥
सर्व सृष्टीची उत्पत्ती कोठून झाली, त्याने ती घडवली की नाही - तो, जो सर्व उंच स्वर्गातून सर्व पाहतो, त्याला माहित असेल - किंवा कदाचित त्यालाही माहित नसेल.
ओंकाराचा उच्चार योग्य प्रकारे केल्यास आपण तुर्यावस्थेचा अनुभव घेऊ शकतो असे मांडुक्य उपनिषद सांगते. ओंकारामध्ये साडेतीन मात्रा आहेत. 'अ ', 'उ ', 'म' आणि उच्चाररहित अर्धमात्रा. यातील 'अ ' हा जागृतावस्थेशी, 'उ' हा स्वप्नावस्थेशी तर ' म' हा सुषुप्तीशी संबंधित आहे. उच्चाररहित अर्धमात्रा आपल्याला तुर्यापर्यंत घेऊन जाते असे हे उपनिषद सांगते. ओमचा उच्चार करताना 'म' नंतर जी स्पंदने जाणवतात त्यावर ध्यान केले असता एका विलक्षण शांततेचा अनुभव येतो. हाच तो तुर्य.
आपल्या विश्वात पसरलेला चैतन्याचा सागर आपल्या शरीर-मनाला प्रकाशित करतो, चैतन्य देतो. शरीर-मनाचे क्लेश, दु:ख यातना याचा परिणाम या चैतन्य सागरावर अथवा तुर्यावस्थेवर होत नाही. या तुर्यावस्थेची जाणीव झाली की शरीर/मनाचे क्लेश-यातना यापासून आपण आपल्याला अलिप्त ठेऊ शकतो.
माणसाच्या तीन अवस्था आपल्याला सहज ओळखता येतात.