मांडुक्य उपनिषद हे केवळ १२ श्लोकांचे आहे आणि ते सांगायचे आहे ते थेट सांगण्याचा त्याचा प्रयत्न आहे. म्हणूनच हे उपनिषद अत्यंत महत्वाचे पण समजण्यास जाटील आहे हे आपण मागील लेखात पहिले.
हे उपनिषद समजण्यास सोपे व्हावे म्हणून एका गोष्टीने प्रारंभ करू.
जनक राजा एकदा आपल्या महालात निद्रा घेत होता. एक पहारेकरी आत आला आणि त्याने जनक राजाला त्याच्या शत्रूने अचानक हल्ला केल्याचे सांगितले. राजा लढाईची तयारी करू लागला. परंतु युद्धात त्याची हार झाली. शत्रूने त्याचे राज्य घेतले आणि त्याला परराज्यात हाकलून दिले. सर्वस्व हरलेला जखमी अवस्थेतील जनकराजा गलितगात्र होऊन चालू लागला. शत्रुराजाच्या भीतीने त्याला कोणीही मदत केली नाही. अशावेळी तो एका अन्नछत्रात पोचला. तेथे अन्नासाठी गरीब, दरिद्री लोकांची रांग लागलेली होती. अत्यंत भुकेलेल्या अवस्थेत तो रांगेत उभा राहिला. त्याचा अन्न घेण्यासाठी नंबर येताच अन्नछत्रातील अन्न संपले. तेथील सेवकाने त्याला दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले. पण खूप आर्जवे केल्यावर त्या खिचडीच्या भांड्यातील खाली राहिलेली थोडी पेज सेवकाने राजाला दिली. जनकराजा ते पेजेचे भांडे मुखाला लावणार तोच एक घार येऊन त्याच्या भांड्याला धडकली आणि ती सर्व पेज मातीत मिसळली. जनक राजा दु:खाने आक्रोश करू लागला.
तोच एका सेवकाने राजाला झोपेतून उठविले आणि आक्रोशाचे कारण विचारले. राजा जागा झाला . पण त्याला प्रश्न पडला की 'आता पाहत आहोत ते सत्य का मगाशी पाहिलेले सत्य". त्याने त्या सेवकाला प्रश्न विचारला 'हे सत्य का ते सत्य?'. त्या बिचाऱ्याला याचे उत्तर देता आले नाही. राजाने राणीलाही हा प्रश्न विचारला 'हे सत्य का ते सत्य?' तिला राजा काय विचारतो आहे तेच कळले नाही. राजा आता वेडापिसा झाला. प्रत्येकाला तो हाच प्रश्न विचारू लागला. राजसभा भरली. तेथेही तो सर्वांना हाच प्रश्न विचारू लागला. सभेचे कामकाज ठप्प झाले.
जनक राजाला वेड लागल्याची बातमी राजधानीत पसरली. अष्टावक्र ऋषींच्या कानावर हे गेले. ते दरबारात आले. जनक राजाने त्यांना तोच प्रश्न विचारला ' हे सत्य का ते सत्य?' अष्टावक्र ऋषींनी उत्तर दिले, 'राजा, हेही असत्य आणि तेही असत्य.' राजा गोंधळात पडला. त्याने विचारले 'मग सत्य काय?' 'राजा, केवळ "तू" सत्य. तेव्हा पाहिलेले शत्रूराष्ट्राचे सैन्य, तुझी दारूण अवस्था आता आहे काय? म्हणूनच ते असत्य. आताचा दरबार तेव्हा होता काय? मग हे ही असत्य. पण राजा दोन्हीवेळी बघणारा तू मात्र होतास. म्हणून केवळ तूच सत्य'
पुढील लेखात या गोष्टीच्या अंतरंगात शिरून मांडुक्य उपनिषद समजून घेण्याचा प्रयत्न करू.

No comments:
Post a Comment