तुर्यावस्था म्हणजे काय हे समजण्यासाठी एक गोष्ट पाहू.
एका लहान मुलाने कधीही चित्रपट पहिला नव्हता. चित्रपट काय आहे याबद्दल त्याला उत्सुकता होती. त्याच्या वडिलांनी त्याला त्याबद्दल माहिती दिली. "तेथे एक पडदा असतो. त्यावर चित्रे येतात. ती हालचाल करताना दिसतात. पण ती खरी नसतात."
मुलाला नीटसे काही कळले नाही. शेवटी त्याच्या वडिलांनी त्याला चित्रपटाच्या थेटरमध्ये नेले. ते तेथे पोचले तेव्हा चित्रपट सुरु झाला होता. अंधारात कसेबसे वाट काढत ते त्यांच्या खुर्चीपर्यंत पोचले.
समोरच्या चित्रपटातील प्रसंग मुलाला खरे वाटत होते. ती केवळ पडद्यावर हलणारी चित्रे आहेत हे त्याचे वडील त्याला समजावून सांगत होते. तेव्हा मुलाचा समज झाला की ती चित्रे पडद्यावर कोणीतरी काढलेली आहेत. पडद्यावर काढलेली चित्रे हलतात कशी, बोलतात कशी हेच त्याला कळत नव्हते. वडिलांच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला तो तयार नव्हता. मागील पडदा कोरा आहे, त्यावर चित्रे काढलेली नाहीत हे त्याचे वडील त्याला परत परत समजावून देत होते.
मध्येच त्या चित्रपटात आगीचा प्रसंग आला. त्या मुलाला वाटले, आता तो पडदा जळणार. त्याच्या हे सर्व आकलनाबाहेर होते. शेवटी त्या चित्रपटाचे मध्यंतर झाले. दिवे लागले. वडिलांनी मुलाला तो पांढरा पडदा दाखविला. प्रोजेक्टर दाखवला. त्याच्या साहाय्याने पडद्यावर चित्रे कशी पडतात हे दाखविले. पडदा नसेल तर चित्रेच दिसणार नाहीत हेही त्या मुलाच्या लक्षात आले.
आपली तुर्यावस्था ही अशीच त्या चित्रपटाच्या पडद्यासारखी आहे. चित्रपटाच्या पडद्यावर दाखविल्या जाणाऱ्या चित्रपटात कदाचित आगीचे प्रसंग असतील, पाणी असेल. पण त्यामुळे तो पडदा जळणार नाही की ओला होणार नाही. चित्रपटातील प्रसंग कोणताही असो, तो पडदा आहे तसाच राहील. पण जर तो पडदा नसेल तर चित्रपट दिसणार नाही. पडद्याच्या आधारानेच चित्रपट दिसेल. तुर्यावस्थेच्या आधारानेच जागृतावस्था, स्वप्नावस्था आणि सुषुप्ती यांचा अनुभव आपण घेऊ शकतो. पण ते अनुभवताना होणाऱ्या सुखाचा, दु:खाचा, यातनेचा कोठलाही परिणाम तुर्यावस्थेवर होत नाही.
जसे त्या मुलाला लाईट लागल्यावर तो पडदा दिसला आणि नंतर त्या चित्रांच्या खोटेपणाची जाणीव झाली तसेच आपल्याला आत्मज्ञान झाल्यावर तुर्यावस्थेची जाणीव होते. मध्यंतरात कोरा पडदा दिसल्यावर चित्रपटाच्या खऱ्या स्वरूपाची जाणीव झाल्यावरही तो मुलगा पुढील चित्रपटाचा आस्वाद घेऊ शकला , तसेच आत्मज्ञान झाल्यावरही आत्मज्ञानी पुरुष आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा आस्वाद घेऊ शकतो. किंबहुना तणावरहित अवस्थेत तो हा आस्वाद अधिक आनंदाने घेऊ शकतो.
पुढील लेखात आपण मांडुक्य उपनिषदाने प्रतिपादलेला ओंकारविचार काय आहे हे पाहू.

No comments:
Post a Comment