आपण मागील लेखात मांडुक्य उपनिषदाने ओंकारासंबंधी काय सांगितले आहे ते पहिले. ते अधिक स्पष्ट होण्यासाठी आपण हा ओंकारविचार ज्ञानेश्वरांनी कसा मांडला आहे पाहू. ज्ञानेश्वर हे काळाच्या दृष्टीने अधिक जवळ असल्याने त्यांचे म्हणणे कदाचित आपल्याला लौकर समजू शकेल.
ज्ञानेश्वरीच्या प्रारंभी ज्ञानदेव प्रार्थना करतात. त्यात त्यांनी ओंकाराचे (शब्दब्रह्म) वर्णन केले आहे.
अकार चरण युगुल। उकार उदर विशाल।
मकर महामंडल। मस्तकाकारे।।
हे तिन्ही एकवटले। तेथ शब्दब्रम्ह कवळले।
ज्यावेळी आपण अकार उच्चारतो तेव्हा 'चरण युगूल' म्हणजे जेथे दोन पाय जुळतात तेथे आपले ध्यान हवे. हे स्थान मूलाधार चक्राचे आहे. मूलाधार चक्र हे पृथ्वीतत्वाशी, म्हणजेच सर्वात स्थूल गुणांशी जोडलेले आहे. जागृत अवस्था ही सर्वात स्थूल अवस्था आहे हे आपण पहिलेच. म्हणजेच 'अ' हा जागृत अवस्थेशी जोडलेला आहे. उच्चारण करताना दोन पाय जेथे जुळतात तेथे होत असलेल्या स्पंदनांवर आपले ध्यान हवे.
उकार हा उदराशी संबंधित आहे असे ज्ञानेश्वरमहाराज सांगतात. उदरापाशी, म्हणजेच बेंबीपाशी मणिपूर चक्र आहे. मणिपूर चक्र हे अग्नीतत्वाशी संबंधीत आहे. स्वप्नावस्था ही अग्नितत्वाशी संबंधीत असल्याचे मांडुक्य उपनिषद सांगते. स्वप्नावस्थेतील पुरुषास 'तेजस' असे नाव मांडुक्य उपनिषदाने दिले आहे तर स्वप्नावस्थेतील अभिमानी 'हिरण्यगर्भ ' या नावाने ओळखला जातो. स्वप्नावस्थेतील अनुभव येण्यास तेजाची आवश्यकता असते. म्हणूनच 'उ' हा स्वप्नावस्थेशी संबंधित आहे. 'उ' उच्चारताना बेंबीतील स्पंदनांकडे ध्यान हवे.
मकार हा महामंडलातुन यावा असे ज्ञानेश्वर म्हणतात. महामंडल म्हणजे 'गळा'. गळ्याच्या ठिकाणी विशुद्ध चक्र असते. हे चक्र आकाश तत्वाशी संबंधीत आहे. आकाशतत्व सर्वात तरल तत्व आहे. सुषुप्ती ही आपली सर्वात तरल अवस्था आहे. म्हणूनच मकार हा सुषुप्तीशी संबंधित आहे. मकार उच्चारताना गळ्याकडे ध्यान हवे.
सर्वात शेवटची जी अर्धमात्रा आहे ती 'मस्तकाकारे' असे ज्ञानेश्वरमाउली म्हणतात. हा गळ्याकडून डोक्याकडे जाणाऱ्या स्पंदनांचा उल्लेख आहे. या अर्धमात्रेच्या उच्चारणाच्यावेळी जी स्पंदने जाणवतात तिच्यावर ध्यान हवे असे ज्ञानेश्वर सुचवितात. हीच ती तुर्यावस्थेची जाणीव. ही जाणीव जेव्हा अधिकाधिक स्पष्ट होत जाते तेव्हा एक असीम शांतता अनुभवाला येते.
ओंकारसाधना करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. ओंकार हा अत्यंत शांतपणे केला पाहिजे. दोन ओंकारांच्यामध्ये थांबून शरीराचा वेध घेतला पाहिजे.
ओंकाराचा असा उच्चार केल्यास आपण तुर्यावस्थेचा अनुभव घेऊ शकतो.
आकाराने सर्वात लहान पण समजण्यास जटिल अशा मांडुक्य उपनिषदांची तोंडओळख आपण करून घेतली. मांडुक्य उपनिषदांची ओळख करून देणे ही माझ्यासाठी खूप कठीण गोष्ट होती. पण मी लिहिलेले आपण गोड मानून घेतल्याने मला उत्साह आला. धन्यवाद.
या लेखमालेतील मांडुक्य उपनिषदावरील हा शेवटचा लेख.
मांडुक्य उपनिषदाच्या ब्रह्मवाक्याचे स्मरण करून आपण मांडुक्य उपनिषदाच्या विवेचनाचा समारोप करू.
"अयम आत्मा ब्रह्म ।" : अर्थात "हा आत्मा ब्रह्म आहे."

फार सुरेख विवेचन
ReplyDeleteअण्णा
1/12/2019
संतोष जी !!!
ReplyDeleteमांडुक्य उपनिषदावरील आपले समग्र विवेचन मनन केले. {१ ते ८ भाग}
आपले भाष्य आवडले. परंतु समजून घ्यायला पुन्हा पुन्हा वाचावे लागेल.
विषय गहन आहे, त्यामुळे एक एक भाग निवांत वाचावा लागेल.
खूप खूप आभार !!!!