Wednesday, November 24, 2021

अद्वैत वेदांत : आत्मा, पुनर्जन्म

 भारतीय अध्यात्मात आत्मा, पुनर्जन्म यांना एक विशिष्ट स्थान आहे. त्यामुळे अद्वैत वेदांताचा अभ्यास करताना या दर्शनात आत्मा, पुनर्जन्म या संकल्पनांना काही स्थान आहे काय याचा विचार ओघानेच येतो. 

अद्वैत वेदांतात ब्रह्म हेच एकमेव आहे असे मानले जाते. त्यामुळे जन्म कोणाचा हा प्रश्न आहे. आपण जर सर्वांभूती असलेले ब्रह्म असू तर हे ब्रह्म जन्म कसे घेणार आणि मृत्यू तरी कसे पावणार? जन्मच नसेल तर पुनर्जन्माचा प्रश्नच येत नाही. तसेच आत्मा कोणाचा हाही प्रश्न येतो. म्हणजेच आत्मा, पुनर्जन्म या संकल्पनांना प्रथमदर्शनी तरी या दर्शनात स्थान नाही. 

जरी आत्मा, पुनर्जन्म या संकल्पनांना स्थान नसले तरी खोलात गेल्यावर भारतीय अध्यात्मात असलेल्या या संकल्पनांचा सांधा कोठेतरी जोडता येतो. प्रथम हे स्पष्ट व्हायला हवे की जन्म, आत्मा हे या दर्शनानुसार 'माये'च्या क्षेत्रात येते. विश्वाच्या  आकाशात सत्-चित्-आनंद रुपी सर्वसाक्षी ब्रह्म तळपत आहे. या ब्रह्माचे प्रतिबिंब आपल्या मनात उमटते. आपले मन ब्रह्माचे हे सत्-चित्-आनंद गुण सर्वसाक्षी ब्रह्माकडून उधार घेते (Acquired qualities).  मनाचा 'अहंकार' हा भाग या प्रतिबिंबाशी एकरूप होतो.  आपल्या चेतासंस्थेच्या साहाय्याने तो संपूर्ण शरीरात पसरतो. मग आपल्याला आपले शरीर चैतन्यमय भासते. हे ब्रह्माचे प्रतिबिंब आपल्या अहंकाराशी (मी-पणाच्या भावनेशी) एकरूप झालेले असल्याने आपल्याला हा चैतन्यमय अहंकार म्हणजे आपला 'आत्मा' आहे असे वाटते. अहंकाराची जोड मिळाल्याने तो 'माझा' आत्मा आहे असे आपण विधान करतो. चेतासंस्थेचे केंद्र मेंदू असल्याने आपल्याला आपला आत्मा आपल्या मेंदूत आहे असेही अनेक वेळा वाटते. अद्वैत वेदान्ताच्या मते 'आत्मा' म्हणजे केवळ सर्वसाक्षी ब्रह्माकडून  सत्-चित्-आनंद उधार घेतलेला आपला अहंकार असतो. 

एका माळ्याने काही बालाद्यांत पाणी भरून ते उघड्यावर उन्हात ठेवले आहे. प्रत्येक बालदीमध्ये सूर्याचे प्रतिबिंब पडले आहे. प्रत्येक बालदीला तो आपला स्वतंत्र आत्मा वाटतो. खरे तर ते एकाच सूर्याचे प्रतिबिंब आहे. कधीकधी या बालदीतील पाणी गढूळ होते. मग बालदीतील सूर्याचे प्रतिबिंबही झाकोळते. बालदीला वाटते की आपल्या आत्म्यावर-चैतन्यावर मळभ आले आहे. खरे तर साक्षी-चैतन्याचा सूर्य त्याच तेजाने तळपत असतो. बालदी उगचगच खंतावते. कधीकधी बालदीतील पाणी डुचमळते. सूर्याच्या प्रतिबिंबाचे तुकडे-तुकडे होतात. बालदी खोल निराशेत -डिप्रेशनमध्ये- फेकली जाते. पण खरेतर साक्षीचैतन्याच्या सूर्याला काहीही झालेले नसते. थोड्याच वेळात पाणी शांत होऊन प्रतिबिंब तेजाने झळकू लागते. कधीकधी बालदी जुनी होते. गळू लागते. मग माळी त्यातील पाणी दुसऱ्या बालदीत ओततो. नव्या बालदीत परत सूर्याचे प्रतिबिंब उमटते. हाच तो पुनर्जन्म. या नव्या बालदीत जुन्या बालदीतील प्रतिबिंब गेले आहे काय? मग नव्या जन्मात मागील जन्मातील आत्मा जातो का?

वरील उदाहरणात माळ्याने एका बालदीतील पाणी दुसऱ्या बालवाडीत ओतले. तद्वतच आपला मनोमय कोष दुसऱ्या शरीराला जाऊन चिकटतो आणि त्याच्यात परत साक्षीचैतन्याचे प्रतिबिंब पडते. यालाच कदाचित आपण आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो असे म्हणू शकू. पण हा सर्व खेळ मायेच्या परिक्षेत्रात चालला आहे हे ध्यानात ठेवायला हवे. 

आत्मा आणि पुनर्जन्म या संकल्पनांचा मी माझ्या समजुतीनुसार लावलेला हा अर्थ आहे. 

२६/११ नाही २४/११ म्हणा..

 २६/११ नाही २४/११ म्हणा..

26/11 कारस्थनाचे प्रत्यक्ष execution पाकिस्तानच्या आधी 24/11 रोजी भारतात सुरू झालं होतं! 24/11 ते 26/11 मध्ये काय घडलं होतं याचं गुपित या 6 महत्वाच्या प्रश्नांच्या उत्तरात आहे..
प्रश्न १ : २६/११ हल्ल्यादरम्यान महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आवश्यक असलेल्या भारताच्या सुरक्षा यंत्रणेतील (SECURITY APPARATUS) काही महत्त्वाचे सदस्य- यामध्ये केंद्रीय गृह सचिव, जॉइंट सेक्रेटरी अंतर्गत सुरक्षा, डायरेक्टर अंतर्गत सुरक्षा असे महत्वाच्या जबाबदारी असलेले अधिकारी कुठे होते?
उत्तर : तत्कालीन केंद्रीय गृहसचिव मधुकर गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील गृहमंत्रालयातील ९ सदस्यीय उच्चस्तरीय दल २४ नोव्हेंबर २००८ रोजी इस्लामाबाद येथेे गेले होते आणि २ दिवसांनी परत येणार होते, म्हणजे २६ नोव्हेंबरला दुपारी. पण, त्यांनी इस्लामाबादच्या ६० किमी उत्तरपूर्वकडे असलेल्या मुरी या थंड हवेच्या ठिकाणी अजुन एक रात्र रहायचे पाकिस्तानचे निमंत्रण स्वीकारले आणि तिकडे गेले. म्हणजे २६/११ च्या रात्री जेंव्हा मुंबईत कत्तल सुरू होती, हे सगळे तिकडे शराब आणि शबाब मध्ये रमले होते..
प्रश्न २ : पण, ते स्वतःच्या मनाप्रमाणे असा पूर्वनियोजित कार्यक्रम कसे बदलू शकतात?
उत्तर : ह्या टीम मध्ये शेवटच्या क्षणी, केंद्रीय गृह मंत्री यांच्या आदेशानुसार एक अधिकारी (मंत्रीजींचा खास) शामिल केला गेला होता. त्यांनी पाकिस्तानी निमंत्रण स्वीकारलं आणि इतर अधिकाऱ्यांनीही त्याची 'वट' लक्षात घेता मान्य केलं. फक्त एक अधिकारी - राजेन्द्र सिंग, यांना या सगळ्या प्रकारात काही तरी गडबड वाटली आणि ते पर्सनल कारण सांगून ठरलेल्या कार्यक्रमानुसार परत आले!(बाकी, यांना नंतर इशरत जहाँ केसमध्ये गुंतवून खुप त्रास दिला गेला..)
प्रश्न ३ : मग, रात्री हा हल्ला झाल्यानंतर या अधिकाऱ्यांना कोणी संपर्क करुन सांगितले का नाही?
उत्तर : मूरी त्यावेळी एक 'नो नेटवर्क झोन' होता. तिकडे मोबाइल नेटवर्क तर नव्हताच, लॅंडलाइन कनेक्टिविटी पण ९९% वेळा अल्लाहच्या आणि १% पाकिस्तान सरकार भरोसे होती. टेली-कम्युनिकेशन, केबल-टीवी नेटवर्क बंद करुन यांना बाई-बाटली मध्ये पाकिस्तानने नीट रमवून ठेवलं होतं.
प्रश्न ४ : मग, इकडे होते ते अधिकारी काय करत होते?
उत्तर : अशा इमरजन्सीमध्ये एस.ओ.पी प्रमाणे कामं केली जातात. जर, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वॉर-रुम मध्ये बसायला, नेतृत्व करायला आणि आदेश द्यायलाच कोणी नव्हतंच, तर काय करायचं हे नेमकं सांगणार आणि ठरवणार तरी कोण? नुसता गोंधळ चालू होता तिकडे दिल्लीत त्यावेळी.. एनएसजी कमांडो उशिरा पोचले, त्यांना दिल्ली ते मुंबई वेळेत विमान उपलब्ध नव्हते, मुंबईत उतरल्यावर त्यांना घेऊन जाण्यासाठी BEST च्या विशेष बस साठी तब्बल ९० मिनिट वाट पहावी लागली आणि तो पर्यंत एकही (ताज हॉटेल चे फ्लोर प्लान सकट) लोकेशनचे मॅप त्या NSG कमांडोजसाठी तयार ठेवण्यात आले नव्हते. मीडिया ला कोणी Do's & Dont's सांगायला नव्हतं ज्यामुळे रावळपिंडीत ISI वाले एनएसजीच्या हालचाली लाईव्ह बघत होते! ब्यूरोक्रेटिक लिडरशीप तिकडे बाई-बाटली च्या नशेत तरर्र होती..
प्रश्न ५ : पाकिस्तानने असं का केलं?
उत्तर : युद्धात 'स्ट्रेटेजिक डिसेप्शन' हे एक मोठे हत्यार असते. पाकिस्तान ला याबद्दल तिळमात्र शंका नव्हती की ते भारताविरुद्ध युद्ध करत आहेत. भारतात मात्र अगदी आज पण २६/११ ला 'आतंकवादी हमला' म्हणत आहेत आपली लोकं, युद्ध नाही. भारतात नेमकं हेच होणार याची पाकिस्तानला खत्री होती. २६/११ सारखे कांड करायचे धाडस पाकिस्तान ला भारतात नसलेल्या Clarity of thoughts मुळे सहज-शक्य झालं.
प्रश्न ६: मग, हे सगळे २६/११ नंतर लोकांना का सांगितलं नाही?
उत्तर : "बडे-बडे शहरों में छोटी-छोटी बातें होती रहती है!"- आर आर पाटील उर्फ आबा, गृह मंत्री, महाराष्ट्र शाशन बोलले. मुख्यमंत्री विलासराव देशमुख रितेश आणि रामगोपाल वर्माला घेऊन ताज हॉटेलला गेले. केरळ चा मुख्यमंत्री (अ)चुतियानंदन बोलला की संदीप उन्नीकृष्णन च्या घरी कुत्रा पण जाणार नाही. शिवराज पाटील चाकुरकर ७२ तासात ८ वेळा कपडे/कोट बदलत राहिले.. कसाब ला पकडणाऱ्या ओंबाळे यांच्या शौर्याची थट्टा करत ही लोकं 'भगवा आतंकवाद' बोंबलत राहिले, आणि राज्यात आणि केंद्रात दोन्हीकडे सत्ताधारी असलेल्या काँग्रेसने पाकिस्तानला एक प्रकारे क्लीन-चिटच दिली होती! करकरे कामठे साळसकर यांच्या या हल्ल्यात झालेल्या मृत्यूवरून जाणूनबुजून निर्माण केलेला वाद आणि ज्यांनी बोलायला हवं होतं त्या मनमोहन सिंग यांचे लज्जास्पद मौन.. असे अनेक फॅक्टर्स होते. पब्लिकला नको त्या विषयांत व चर्चांत बिजी ठेवण्यात राजकारणी आणि मीडिया ला यश मिळालं! मग, 24/11 ते 26/11 मधील या कारस्थानावर कोण बोलणार?
मग आता?
४ दिवस देशाच्या इज्जतीची लखतरं गेटवे ऑफ इंडिया वर टांगणाऱ्या २६/११ च्या 'युद्धात', हलकट सरकार व गद्दार अधिकाऱ्यांमुळे जीव गमावलेल्या भारतसहित १७ देशांच्या १८४ निष्पाप लोकांना, महाराष्ट्र पोलिसांच्या १४ जवान/अधिकाऱ्यांना आणि २ एनएसजी कमांडोंना भावपूर्ण श्रद्धांजली वाहायची आणि गप्प बसायचं!
- वेद कुमार

Sunday, November 21, 2021

चितोड

 खरे तर हे पवित्र ठिकाण राष्ट्रीय स्मारक व्हावे.
-------------------------------------------------------------------




#जोहर
, हा शब्द ऐकला, वाचला की आपल्याला आठवतात त्या महाराणी पद्मावती.! ज्यांनी धगधगत्या अग्निकुंडात उडी घेऊन स्वतःची आहुती देणं स्वीकारलं, त्या खिलजी नामक सैतानाच्या हातात जाण्यापेक्षा.!
खाली जो फोटो आहे, ती हीच जागा आहे, हेच ते कुंड आहे ज्यात महाराणी पद्मावती ह्यांनी त्या अग्निकुंडात उडी घेतली होती.!
चितोडच्या किल्ल्यात असलेल्या ह्या जागेपर्यंत जायचा रस्ता आजपण इतका अंधारलेला आहे, की आजपण कोणी त्या रस्त्यावर जायची हिंमत करत नाही.!
त्या रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या भिंती आणि तिथून बऱ्यापैकी दूर असलेल्या दालनांच्या भिंती आजपण त्या धगधगत्या अग्नीचा अनुभव आपल्याला करून देतात.! त्या विशाल अग्निकुंडाच्या भिंतींना लावलेला चुना आजपण त्या विक्राळ अग्नीच्या उष्णतेची साक्ष देतोय.!
फोटोमध्ये त्या कुंडातला एक दरवाजा दिसतोय.!.तेथील स्थानिक लोक विश्वासाने सांगतात, की महाराणी पद्मावती ह्यांनी तिथूनच आपल्या सगळ्या सख्या आणि किल्ल्यावरच्या जवळपास सगळ्या महिलांसोबत त्या विशाल अग्निकुंडात उडी घेतली होती.!
स्थानिक लोक विश्वासाने असही सांगतात, की आजही तिथे कधी कधी किंकाळ्या ऐकायला येतात.!
पण ह्या किंकाळ्या नाहीयेत, तर त्या सगळ्या वीरांगनांनी त्यांच्या हिंदू भावा बहिणींना मारलेल्या हाका आहेत.! त्या सांगतायत की एका सैतानाच्या तावडीत जाऊन आपला धर्म लांछित करण्यापेक्षा आम्ही मरण पत्करल.!
आम्हाला कधीच विसरू नका.!
महाराणी पद्मावती आणि त्यांच्यासोबतच्या सगळ्या वीरांगना ह्यांचे नाव आम्ही हिंदू हजार जन्म घेतले तरी विसरु शकतच नाही.!
महाराणी पद्मावती आणि त्यांच्यासोबत आहुती दिलेल्या सर्व वीरांगनांना कोटी कोटी प्रणाम.!
🙏🙏🙏🙏🙏🌷🚩

Edit
Bhushan Kanade, Swati Kulkarni Bapat and 12 others
4 Shares
Like
Comment
Share

Comments

Thursday, November 11, 2021

अद्वैत वेदांत : जाणिवेचे स्तर

'ब्रह्मं सत्यम्, जगत् मिथ्या' असे सगळी उपनिषदे उच्चारवाने सांगत असतात. मात्र आपल्याला आपल्याला आसपासची सृष्टी दिसत असते, पंचेंद्रियांना जाणवत असते. म्हणूनच उपनिषदामधील हे ज्ञान बरेच वेळा हास्यास्पद वाटते. परंतु उपनिषदांनी जाणिवेचे अनेक स्तर आहेत असे सप्रमाण मांडले आहे. 'जगत् मिथ्या' हे तत्त्वज्ञानही जाणिवेच्या अत्यंत वेगळ्या स्तरावरील आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. जाणिवेच्या व्यावहारिक स्तरावर हे जग खोटे आहे, आभासात्मक आहे असे उपनिषदे अजिबात सांगत नाहीत. हे जाणिवेचे विविध स्तर कोणते आहेत हे आपण समजून घेऊ. मांडुक्य उपनिषदात याचा विस्तृत उहापोह केलेला आहे. 

जाणिवेच्या स्तरांचा विचार करताना जनक राजाची एक गोष्ट सांगितली जाते. ही गोष्ट http://shorturl.at/lBSXZ या लिंकवर माझ्या ब्लॉगवर वाचायला मिळेल. जनक राजा झोपलेला असताना त्याला एक वाईट स्वप्न पडते. झोपेतून उठल्यावर त्याला प्रश्न पडतो की 'स्वप्नात जे पाहिले ते खरे की आता जे पाहतो आहे ते खरे'. या गोष्टीतून जागृतावस्थेतील जाणिवेचा स्तर आणि स्वप्नावस्थेतील जाणिवेचा स्तर भिन्न असतात हे सूचित केले आहे. विस्तारभयामुळे ती संपूर्ण गोष्ट या लेखात देता येत नाही. पण जिज्ञासू तेथे जाऊन वाचू शकतात. 

जाणिवेच्या तीन अवस्था आपल्या नित्य परिचयाच्या आहेत. जागृतावस्था, स्वप्नावस्था आणि गाढ निद्रा या त्या तीन अवस्था. मात्र मांडुक्य उपनिषद चौथ्या अवस्थेचेही विवेचन करते. त्याला हे उपनिषद काहीही नाव न देता चौथी अवस्था असेच म्हणते. आद्य शंकराचार्यांचे आजेगुरु (गुरूंचे गुरु) गौडपादाचार्य यांनी या अवस्थेला 'तुर्यावस्था' असे नाव दिले आहे. 'तुर्य' याचा शब्दश: अर्थ चतुर्थ असाच आहे.  

जागृतावस्था ही सर्वात स्थूल अवस्था आहे. जागृतावस्थेत आपल्या पंचेंद्रियांद्वारे आणि मनाच्या साहाय्याने आपण आजूबाजूस घडणाऱ्या घटनांचा अनुभव घेत असतो. स्वप्नावस्था ही अधिक तरल अवस्था आहे. यात आपले मन आपल्यासमोर घटना उभे करत असते आणि आपण त्या घटनांचा स्वप्नातील पंचेंद्रियांद्वारे अनुभव घेत असतो. स्वप्न पडत असताना हा अनुभव प्रत्यक्ष घेत आहोत असेच वाटते. गाढ निद्रेत स्वप्ने नसतात. मनाची कवाडे घट्ट मिटलेली असतात. कोणतेही दृश्य जगातले अनुभव येत नाहीत. मात्र झोपून उठल्यावर आपण गाढ निद्रेचा अनुभव घेतला हे सांगू शकतो. म्हणजेच आपण गाढ निद्रा "अनुभवत" असतो. या 'अनुभवण्यात' भौतिक गोष्टींचा समावेश नसल्याने पंचेंद्रियांची आवश्यकता नसते.

या तीनही अवस्थांना आधार देत तुर्यावस्था उभी आहे. तुर्यावस्था समजण्यासाठी चित्रपटगृहातील पडद्याचे उदाहरण देता येईल.  हा पडदा नसेल तर चित्रपट दाखविताच येणार नाही. पण चित्रपटातील दृश्यांपासून हा पडदा पूर्णपणे अलिप्त असतो. चित्रपटात पुराचे दृश्य असेल तरी हा पडदा ओला होत नाही, आगीचे दृश्य असले तरी हा पडदा जळत नाही. चित्रपटातील दृश्यांना आधार देत अलिप्तपणे उभे राहणे एवढेच या पडद्याचे काम आहे. तुर्यावस्था अशीच आहे. 

तुर्यावस्था ही आपल्याला आपण ब्रह्मस्वरूप असल्याची जाणीव असणे आहे. ही जाणीव असतानाही आपले दैनंदिन व्यवहार सुरूच असतात. आपण स्वप्नावस्थेतूनही जातो, गाढ झोपही अनुभवतो. म्हणूनच या तीन अवस्थांना आधार देत तुर्यावस्था उभी आहे असे म्हटले जाते. सोन्याच्या पाटल्या म्हणजे केवळ विशिष्ट नाम-रूप असलेले सोने आहे याची स्पष्ट जाणीव असतानाही माणूस त्या पाटल्यांचा उपयोग दैनंदिन जीवनात करू शकतो तसेच हे आहे. 

'ब्रह्मं सत्यम्, जगत् मिथ्या' हे तुर्यावस्थेच्या जाणिवेच्या स्तरावर संपूर्णतः खरे आहे. 

आपण सर्वांना तुर्यावस्था या जन्मात प्राप्त होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना. 

Tuesday, November 9, 2021

अद्वैत वेदांत आणि मुक्ती

अद्वैत वेदान्ताच्या तत्वज्ञानानुसार हे विश्व म्हणजे दुसरे काही नसून ब्रह्म आहे.आपण ब्रह्म आहोत. त्यामुळे मुक्तच आहोत. त्यामुळे मुक्तीची संकल्पना या तत्वज्ञानात नाही. जर आपण मुक्तच आहोत तर ही मुक्तता आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात का जाणवत नाही? आपण मुक्त असूनही, ब्रह्म असूनही सुख-दु:खाच्या फेऱ्यात का अडकलेले आहोत?

हे समजून घेण्यासाठी आपल्याला अंगभूत गुण उधार गुण यातील फरक समजून घ्यावा लागेल. चुलीवर एक भांडे ठेवले आहे. पाण्याची उष्णता हा त्या पाण्याचा अंगभूत गुणधर्म नाही. हा गुणधर्म पाण्याने भांड्याकडून घेतला आहे. जर ते पाणी भांड्यातून दुसऱ्या भांड्यात ओतले तर ती उष्णता टिकून राहिलच असे नाही. तद्वातच त्या पाण्याचा आकार हाही त्या पाण्याने भांड्याकडून घेतलेला आहे. तो पाण्याचा उधार गुणधर्म आहे. मात्र पाण्याचे वस्तुमान हा गुणधर्म पाण्याचा अंगभूत गुणधर्म आहे.
त्या चुलीवरील भांड्याचाही उष्णता हा अंगभूत गुणधर्म नाही. तो त्याने खालच्या अग्नीकडून उधार घेतलेला आहे. मात्र आकार आणि वस्तुमान हे त्या भांड्याचे अंगभूत गुणधर्म आहेत. अग्नीचा मात्र उष्णता हा अंगभूत गुणधर्म आहे. जोपर्यंत अग्नी आहे तोपर्यंत उष्णता राहाणार आहे. म्हणजेच उष्णता हा गुणधर्म अग्नीकडून भांड्याकडे आणि तेथून पाण्याकडे संक्रमित झाला आहे.
ब्रह्माचा (साक्षी चैतन्याचा) सूर्य तळपत आहे. आपल्या मनात या ब्रह्माचे प्रतिबिंब पडले आहे. आपल्या मनाच्या 'अहंकार' या भागाशी हे प्रतिबिंब एकरूप होते. अहंकाराच्या साहाय्याने चेतासंस्थेमार्फत हे प्रतिबिंब संपूर्ण शरीरात पसरते. त्यामुळे आपल्याला आपले शरीर चैतन्यमय भासते. साक्षी चैतन्याच्या या अहंकाराशी एकरूप झालेल्या प्रतिमेलाच आपण आपला आत्मा समजतो. या साक्षी चैतन्याच्या प्रतिमेने साक्षी चैतन्याकडून सत् (अस्तित्व), चित् (चैतन्य) आणि आनंद हे गुण उधार घेतले आहेत. आपण आपल्या ज्ञानेंद्रियांच्या साहाय्याने आपल्या चैतन्याचे प्रक्षेपण बाह्य जगतावर करतो (उदा. डोळ्यांनी बघतो). त्यावेळी आपण साक्षी चैतन्याचा सत् (अस्तित्व) हा गुण त्या वस्तूला देतो. ती वस्तू (आपल्या दृष्टीने) अस्तित्वात येते. म्हणजेच सत् (अस्तित्व) हा गुण ती वस्तू आपल्या ज्ञानेंद्रियाकडून उधार घेते. हा गुण ज्ञानेंद्रियांनी साक्षीचैतन्याच्या (ब्रह्माच्या) प्रतिमेकडून, चैतन्याच्या प्रतिमेने साक्षीचैतन्याकडून (ब्रह्माकडून) उधार घेतलेला आहे.
अद्वैत वेदान्ताच्या मते 'मुक्ती' याचा अर्थ आपल्या अहंकाराशी साक्षी चैतन्याचे झालेले तादात्म्य ओळखणे आहे. हे तादात्म्य आपण तोडू शकत नाही. परंतु त्याची जाणीव झाली की आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख होते. 'अष्टावक्रगीता' या ग्रंथात हे चांगल्या प्रकारे स्पष्ट केले आहे.
संतोष कारखानीस ठाणे

Sunday, November 7, 2021

लक्ष्मीस आवाहन

 !! श्री !!

हे लक्ष्मी ये तुझे स्वागत आहे.
मीच तुझे आवाहन केले होते.
तुला आसन कोठे देऊ ?
स्वयंपाकघरात जातेस तर जा पण जपूनच तिथे माता अन्नपूर्णा आहे तिला सहाय्य कर पण तिच्या कामात दखल देऊ नकोस.
देवघरात ,माजघरात जपूनच जा कारण तिथे देवी सरस्वती निवास करून आहे . घेशील पटवून तिच्याशी ?
आता एकच जागा ! आमच्या घराच्या दारात स्थिर हो . अतिथि याचक यांना विन्मुख करू नको.
काय, तुला माझ्यातच स्थान हवे ! देतो.
माझ्या डोक्यात शिरू नको. डोक्यात भिनु तर नकोच नको
हृदयात तर प्रेम व करूणा वास करते.
मग आता एकच जागा माझ्या हातामध्ये वास कर .
दुसऱ्यांना मदत करण्यासाठी त्यांना ताकत दे एवढीच विनंती
हस्तस्य भूषणम् दानम् !!
देणाराने देत जावे
घेणाराने घेत जावे
घेणार्याने घेता घेता
देणाराचे हात घ्यावे
लक्ष्मीमुळे केवळ सुख नको तर लक्ष्मीकृपेने मिळणारी समृध्दी शांतता समाधान तृप्ती याचा आनंद महत्वपूर्ण आहे.
लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा !
नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त होवो !
लक्ष्मीपूजनाचे भाग्य आपल्याला नेहमीच लाभो !
घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न !