आपण गेला एक महिन्याहून अधिक काळ 'दृक्-दृश्य विवेक' या ग्रंथाचे परिशीलन करीत आहोत. 'अद्वैत वेदांत' दर्शनाचा हा एक प्रकरण ग्रंथ (Introductory Text) म्हणून मानला जातो. याचे कर्ते कोण आहेत ते स्पष्ट नाही. परंतु आद्य शंकराचार्य अथवा विद्यारण्यस्वामी असावेत.
दोन सारख्या दिसणाऱ्या गोष्टी एकत्र केल्या असता त्या वेगळ्या ओळखण्याची क्षमता म्हणजे विवेक. आपल्याला दिसणारे दृश्य आणि ते पाहणारा द्रष्टा हा वेगळा ओळखणे या 'विवेकापासून' ग्रंथाची सुरुवात होते. हा ग्रंथ आपणाला आपले खरे स्वरूप म्हणजे ब्रह्म अथवा साक्षी चैतन्य आहे हे स्पष्टपणे दाखवून देतो.
त्यानंतर हा ग्रंथ 'माया' म्हणजे काय हे सांगतो. 'विक्षेप' आणि 'आवरण' शक्ती या मायेच्या शक्ती आहेत. माया स्वत: ब्रह्माची शक्ती आहे. 'सत्-चित-आनन्द' स्वरूपात असलेल्या विश्वरूपी ब्रह्मावर माया 'नाम-रूपाचे' आवरण घालते. तरीही 'सत्-चित-आनन्द' हे ब्रह्माचे स्वरूप त्यातून डोकावत असते. या ' 'सत्-चित-आनन्द' स्वरूपाला 'नाम-रुपापासून' वेगळे ओळखणे हा विवेक.
आपली विवेकशक्ती जागरूक करून ब्रह्माला कसे ओळखायचे हे हा ग्रंथ शेवटी सांगतो.
या लेखमालेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. अजून निवडणुकांचा धुराळा खाली बसलेला नाही हे ही एक कारण असेल. तरीही दहा-बारा मित्रांचा प्रतिसाद मिळत होता. या क्लिष्ट विषयासाठी दहा-बारा जणांचा प्रतिसादही महत्वाचा आहे.
आपल्यापैकी प्रत्येकजण पूर्वजन्मातील साधनेमुळेअध्यात्माच्या एका टप्प्यावर आलेला आहे. आपल्याला त्याची जाणीव नसते इतकेच. आपल्याला या मालिकेमुळे कदाचित त्याची जाणीव झाली आणि आपण अध्यात्माच्या मार्गात प्रगती करू लागलात तर या लेखमालेचा खरा उपयोग होईल. न जाणो, कोणी याच जन्मात ब्रह्मज्ञानी होईल.
आपले प्राचीन तत्वज्ञान काय आहे हे कळले तर जगात वावरताना आपली कुचंबणा होत नाही. मी परदेशात वावरताना अनेक परदेशी लोकांना आपल्या तत्वज्ञानाबद्दल कुतुहूल असल्याचे जाणवले. आपल्यालाच या संबंधी काही माहित नाही असे जाणवल्यास त्यांना आश्चर्य वाटते. म्हणून आपल्याला यासंबंधी किमान माहिती असावी या हेतूने ही मालिका लिहिली. वाचकांना अधिक माहिती हवी असल्यास स्वामी सर्वप्रियानंद यांची युट्यूबवर असलेली अमेरिकेत दिलेली प्रवचने ऐकावीत.
आता मी 'अपरोक्षानुभूती' या आद्य शंकराचार्य यांनी लिहिलेल्या अद्वैत वेदान्तावरील प्रकरणग्रंथाचा अभ्यास सुरु केला आहे. हा ग्रंथ मोठा असून अधिक खोलात जाणारा आहे. त्याचा अभ्यास झाला की मी त्यावर लिहिता होईन.
धन्यवाद !

दृक्-दृश्य विवेक चे सर्व लेख वाचले. थोडक्यात पण खुप सुंदर विवेचन केले आहे. सध्याच्या काळात वावरताना एवढं जरी समजलं तरी मन ताळ्यावर ठेवायला त्याचा खुपच उपयोग होतो. धन्यवाद.
ReplyDelete