मनोगत
माझ्या या ब्लॉग लेखनाला २०१४ साली सुरुवात झाली. याला कारण साधेसेच घडले. माझी वर्गमैत्रीण रेखा काळे हिला स्वत:चा ब्लॉग तयार करायचा होता. तो कसा करायचा याची कल्पना नसल्याने तिने माझी मदत मागितली. त्या वेळपर्यंत मीही गुगल ब्लॉग या विषयाकडे लक्ष दिले नव्हते. माझी स्वत:ची website होती. आणि मी त्यावर व्यक्त होत होतो. रेखामुळे मी गुगल ब्लॉगचा अभ्यास केला. आणि मग माझाही ब्लॉग सुरु करण्याचे ठरविले.
सुरुवातीला यावर काय टाकायचे याची निश्चिती नव्हती. Facebook वर काही चांगल्या संग्राह्य पोस्ट मिळाल्या तर त्या साठविण्याचा ब्लॉग हा उत्तम मार्ग दिसला. हळूहळू मी ही लिहिता झालो. आणि बघताबघता हा ब्लॉग खूप मोठा झाला. त्याचे विषयानुरूप भाग करावे लागले. या भागांतील लेखांची संख्याही एवढी वाढली की प्रत्येक भागासाठी 'अनुक्रमणिका' करावी लागली. काही विशेष विषयांसाठी गुगलचेच नवे ब्लॉग तयार करावे लागले.
वेगवेगळ्या विभागातील लेख पाहण्यासाठी वर 'मेनू' मध्ये पहा.
वेगवेगळ्या विभागातील लेख पाहण्यासाठी वर 'मेनू' मध्ये पहा.
या ब्लॉग व्यतिरिक्त माझे अन्य ब्लॉग
- मी एक सिंदबाद : माझे जागतिक प्रवासातील अनुभव
- Karkhanis Consultants : Management & SAP related articles.
संतोष कारखानीस
No comments:
Post a Comment