मागील लेखात सांगितल्याप्रमाणे कुंडलिनी विद्या आत्मसात करण्याचा हा तिसरा टप्पा खूप सोपा आहे. फक्त पहिले दोन टप्पे नीट आत्मसात केले पाहिजेत. त्यासाठी पुरेसा वेळ आणि संयम ठेवता आला पाहिजे.
या सात चक्रांच्यामधील सर्वात खालचे चक्र म्हणजे मूलाधार चक्रापासून या ध्यानाला सुरुवात करा. पायाच्या बोटांपासून कमरेपर्यंत सर्व अवयवांची संवेदना बघा. गुदद्वाराची संवेदना बघा. गुदद्वाराच्या आत जेवढे शक्य आहे तेथपर्यंत मोठ्या आतड्याच्या संवेदना पहा. त्यानंतर पाठीच्या शेवटच्या मणक्याची संवेदना बघा. काही दिवस अशा प्रकारे ध्यान केल्यावर आपण या चक्राचा मंत्र (लं )ऐकत अथवा म्हणत ध्यान करू शकता. या चक्राचा रंग डोळ्यापुढे आणू शकता. या चक्राचे ज्ञानेंद्रिय नाक असल्याने वासावर ध्यान करू शकता. आपल्याला या चक्रावर ध्यान करण्यासाठी अनेक प्रकार उपलब्ध आहेत. आपल्या व्यक्तिमत्वाला योगय वाटेल अशा प्रकाराने हे ध्यान करता येईल. प्रत्येक चक्राचा मंत्र आणि अन्य माहिती इंटरनेटवर अनेक ठिकाणी उपलब्ध आहे. मला श्री. कमल नारायण सीठा (https://www.youtube.com/watch?v=qxonnL0UMeU) यांचे youtube वरील लेक्चर ऐकत ध्यान करणे छान वाटले. आपल्या व्यतिमत्वाला साजेसे youtube lecture आपल्याला शोधावे लागेल.
या चक्राच्या ठिकाणाहून आपणास पुरेशा संवेदना मिळू लागल्या की पुढील चक्राकडे जावे. एक चक्र भेदण्यास काही महिने लागतात. घाई करू नये.
त्यानंतरचे चक्र स्वाधिष्ठान चक्र आहे. आपली लैंगिक इंद्रिये ते साधारण बेंबीच्या थोडे खालपर्यंत या चक्राची व्याप्ती आहे. या भागातील संवेदना घेऊन लैंगिक इंद्रियांच्या किंचित वरच्या पातळीत पाठीच्या कण्यात संवेदना घ्याव्यात. मूलाधारचक्राप्रमाणेच या चक्राचे ध्यान करावे.
या नंतर मणिपूर चक्र आहे. साधारण बेंबीच्या पातळीवर पाठीच्या मणक्यात हे चक्र आहे. बेंबीपासून छाती सुरु होईपर्यंतचा भाग या चक्राच्या कक्षेत येतो. बेंबीच्या आसपासचा भाग आपल्या शरीराचा महत्वाचा भाग आहे. संवेदना नीटपणे मिळविणे अत्यंत आवश्यक आहे. पोटातील आतडी, जठर आणि अन्य इंद्रिये या चक्राच्या कक्षेत येतात.
या नंतरची चक्रे पुढील लेखात.
No comments:
Post a Comment