जैन, बुद्ध आणि चार्वाक या 'नास्तिक' दर्शनानंतर आपण आता 'आस्तिक' दर्शनांकडे वळू. नास्तिक म्हणजे 'वेदप्रामाण्य' नाकारणारी दर्शने. वैशेषिक दर्शन वेदप्रामाण्य नाकारीत नसले तरी ठामपणे त्याचा पुरस्कारही करीत नाही.
दर्शनशास्त्रासंबंधी चर्चा करताना न्यायवैशेषिक अशा जोडगोळीचा उल्लेख करण्याची प्रथा आहे. कारण ही दोन दर्शने स्वतंत्र असली तरी कालौघात ती एकरूप झालेली आहेत. विश्वाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन जवळपास सारखाच झाला आहे. तरी त्यात थोडे फरकही आहेत. आपण या दोन्ही दर्शनान्चा वेगळा विचार करू. कालदृष्ट्या वैशेषिक दर्शन हे न्याय दर्शनाच्या आधीचे आहे. म्हणून त्याचा प्रथम विचार करू.
वैशेषिक दर्शनाचा पहिला व्यवस्थित ग्रंथ म्हणजे कणाद ऋषींची 'वैशेषिक सूत्रे'. यामुळे कणाद ऋषींना वैशेषिक दर्शनाचे प्रथम प्रवक्ते मानण्यात येते.
सामान्य माणसांच्या व्यावहारिक दृष्टीचे समर्थन ही न्यायवैशेषिकांची मूलभूत प्रेरणा आहे. सर्वसाधारण तत्वज्ञान सामान्य माणसाच्या व्यावहारिक ज्ञानाला चीकीचे ठरविते. परंतु न्याय-वैशेषिक हिरीरीने सामान्य माणसाच्या व्यवहाराचे समर्थन करतात. याचा अर्थ असा नाही की ही दर्शने समजण्यास सोपी आहेत. त्यांचा व्यावहारिक पक्ष समजण्यास सोपा असला तरी त्या व्यावहारिक पक्षाला समर्थन देण्यासाठी असलेला तात्त्विक पक्ष अत्यंत जटील आहे. म्हणूनच आपण या लेखमालेत या तात्त्विक पक्षात फार खोलात जाणार नाही.
'वस्तूचे ज्ञान करून देण्यास आम्ही शेवटी अनुभवलाच शरण जातो' (संविदेव हि भगवती वास्तुपगमे न:शरणम् | ) असे वैशेषिक दर्शन सांगते. वस्तुमधील द्रव्य आणि तिचे गुण वेगळे आहेत असे आपण सामान्यपणे समजतो. तसेच करणापासून उद्भवलेले कार्य स्वतंत्रपणे सुरु होते असे आपण व्यवहारात समजतो. वैशेषिक दर्शन यालाच तात्त्विक समर्थन देते.
वैशेषिकांचा परमाणु सिद्धांत अत्यंत महत्वाचा आहे. कोणत्याही द्रव्याचे (वस्तूचे) विभाजन केले असता शेवटी अत्यंत सूक्ष्म अविभाज्य परमाणु मिळतो. परमाणूचे गुण मूळ वस्तूपेक्षा वेगळे असू शकतात. परमाणु हा 'नित्य द्रव्य' आहे. अन्य अनित्य द्रव्यांप्रमाणे त्यात बदल होत नाही. दोन परमाणुंच्या संयोगाने एक 'द्वणूक' बनते. तीनच्या संयोगाने एक त्रीणूक बनते. अशीच चतूरणूक वगैरे बनतात. परमाणुंच्या संयोगानेच हा दृश्य विश्वाचा पसारा बनलेला आहे असे वैशेषिक सांगतात. हा सिद्धांत सध्याच्या Atomic सिद्धांताच्या अत्यंत जवळ जाणारा आहे.
प्राचीन काळी ग्रीक तत्ववेत्त्यांनीही परमाणु सिद्धांत मांडला होता. परंतु त्यांच्यामते कोणत्याही द्रव्याच्या परमाणु स्थितीत असलेले परमाणु एकाच प्रकारचे गुण असलेले असतात. वैशेषिकांनी मात्र वेगवेगळे गुण असलेले परमाणु मानले.
वैशेषिकांची प्रमुख प्रेरणा नितीमुल्ये समजावून सांगणे नव्हती तर सर्व ज्ञात गोष्टींचा खोलात जाऊन अभ्यास करण्याची होती. त्यामुळे त्यांच्या दर्शनात रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र यांचा काही भाग डोकावतो. प्राचीन काळी विज्ञान हे तत्वज्ञानातच गणले जात होते. त्यामुळे वैशेषिक ग्रंथात 'उखळात टाकलेले मुसळ परत उसळून वर का येते', 'पक्षी आकाशात कसा उडू शकतो' अशासारख्या गोष्टीवरही विवेचन आढळते.
थोडक्यात सांगायचे तर जगातील सर्व ज्ञेय गोष्टींचा विचार वैशेषिक दर्शन करते. हे प्रामुख्याने प्रमेय शास्त्रआहे. यातील बहुसंख्य प्रमेये न्यायशास्त्राला मान्य आहेत. या प्रमेयशास्त्राला प्रमाणांची जोड देण्याचे महत्वाचे कार्य न्यायदर्शनाने केले आहे. त्याचा विचार पुढील लेखात करू.

परमाणूचे गुण मूळ वस्तूपेक्षा वेगळे असू शकतात.
ReplyDeleteबरोबर नाही.
श्री ह दिक्षितांच्या पुस्तकात पहावे.
मन या द्रव्य पदार्था खालील परिच्छेद