बौद्ध दर्शनाची मुख्य प्रेरणा दु:खमुक्ती हेच आहे. त्यामुळे तात्विक काथ्याकूट करण्यात बुद्धाला रस नव्हता. मृत्युनंतर निर्वाणाप्रत पोचलेल्या व्यक्तीचे काय होते, हा लोक शाश्वत आहे की अशाश्वत अशा प्रश्नांची उत्तरे देणे बुद्ध टाळत असे. ही उत्तरे कळून काही फायदा नाही. दु:ख कसे निवारण होईल याकडेच लक्ष दिले पाहिजे अशी त्याची अत्यंत व्यवहारी भूमिका होती. अशा प्रश्नांना 'अव्याकृते' म्हणून संबोधण्यात येते. अव्याकृते म्हणजे बुद्धाने कधीही ज्या सम्बंधात काही वक्तव्य केले नाही. अशी दहा अव्याकृते आहेत.
- जग शाश्वत आहे
- जग अशाश्वत आहे
- जगाला अंत आहे
- जग अनंत आहे
- जीव आणि शरीर एकाच आहेत
- जीव आणि शरीर वेगळे आहेत
- तथागत मरणानंतर असतो
- तथागत मरणानंतर नसतो
- तथागत मरणानंतर असतोही आणि नसतोही
- तथागत मरणानंतर असतोही आणि नसतोही असे नाही
पुढील लेखात आपण चार्वाक दर्शनासंबंधी (लोकायत) माहिती घेऊ.
No comments:
Post a Comment