गौतम बुद्धाच्या भारतातील प्रभावास रोखण्यासाठी एका बाजूला यज्ञ-याग कर्मकांड यांच्या विधीत समन्वय साधणारे पण वेदांच्या तत्वज्ञानाच्या भागाला गौण समजणारे पूर्वमीमांसा दर्शन विकसित झाले तर दुसऱ्या बाजूला वेदांमधील तत्वज्ञान अंगाला प्राधान्य देणारे उत्तरमीमांसा हे दर्शनही विकसित झाले. वेदांमध्ये तत्वज्ञान विषयक (उपनिषदे) हा भाग शेवटी येत असल्याने त्याला वेदांत अशीही संज्ञा मिळाली. काहींच्या मते 'सर्व वेदांचे जे सार' या अर्थाने वेदांत हा शब्द आला आहे.
उपनिषदे अनेक आहेत त्या सर्वांचा समन्वय घडवून त्याचे सार सांगण्यासाठी 'ब्रह्मसूत्रे' रचण्यात आली. द्वैपायन कृष्ण व्यास (वेदांचे रचयिता : पराशरऋषी-मत्स्यगंधा यांचा मुलगा) ब्रह्मसुत्रांची रचना केली असे मानण्यात येते. याशिवाय भागवतगीतेलाही वेदांत दर्शनात उपनिषदे आणि ब्रह्मसुत्राइतकीच मान्यता आहे. उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि भागवतगीता यांना वेदांतात 'प्रस्थानत्रयी' म्हणून मान्यता आहे. 'प्रस्थान' म्हणजे उगम. वेदविचारांची शुद्धता या तीन ठिकाणी तपासता येते असा त्याचा अर्थ आहे.
या प्रस्थानत्रयींवर वेदांतदर्शनातील आचार्यांनी भाष्ये लिहिली आहेत. त्यातील महत्वाचे आचार्य
१> शंकराचार्य (इ.स. ७८८-८२०) केवलाद्वैतवाद
२> रामानुजाचार्य (इ.स. १०५६-११३७) विशिष्टाद्वैतवाद
३> मध्वाचार्य (इ.स.११९९-१२७८) द्वैतवाद
४> वल्लभाचार्य (इ.स.१४८१-१५३३) शुद्धाद्वैतवाद
५> निंबकाचार्य (१३वे शतक) द्वैताद्वैतवाद
यात सर्वाधिक मान्यता पावलेला म्हणजे शंकराचार्यांचा केवलाद्वैतवाद हा आहे. शंकराचार्यांना एवढी मान्यता मिळाली की तत्वज्ञान म्हणजे वेदांत म्हणजेच शंकराचार्यांचा अद्वैतवाद अशीच समजूत बहुसंख्य भारतीयांची झाली.
पुढील लेखात आपण शंकराचार्यांचा अद्वैतवाद काय आहे ते पाहू.

No comments:
Post a Comment