यथार्थ (सत्य) ज्ञान होण्यास उपयुक्त अशा गोष्टीला प्राचीन भारतीय तत्वज्ञानात 'प्रमाण' म्हटले आहे. न्यायदर्शनाचा 'प्रमाण' हा प्रमुख विषय आहे. न्यायदर्शनाचा उद्गाता गौतम ऋषींनी चार प्रमाणे सांगितली आहेत.
तीन प्रमुख प्रमाणांमध्ये 'प्रत्यक्ष प्रमाण' हे पहिले प्रमाण होय. 'प्रत्यक्ष' या शब्दाची फोड प्रती+अक्ष अशी करता येईल. प्रत्यक्ष म्हणजे जे डोळ्यासमोर घडले आहे ते किंवा जे डोळे अथवा पंचेंद्रियांना प्रतीत होते ते.
यात इंद्रियांचा पदार्थाशी प्रत्यक्ष संबंध असला पाहिजे. 'वस्तू जळत आहे' (डोळ्यांना दिसत आहे), 'मला त्याची धग जाणवते आहे' हे प्रत्यक्ष प्रमाण झाले. परंतु 'हा ग्रंथ प्राचीन आहे' हे प्रत्यक्ष प्रमाण नाही. कारण यात ज्ञान हे फक्त शब्दांद्वारे झाले आहे. पण तो ग्रंथ जुनाट दिसतो आहे, पाने जीर्ण-शीर्ण होऊन फाटली आहेत असे दिसत असेल तर ते प्रत्यक्ष प्रमाण होईल.
प्रत्यक्ष प्रमाण ६ प्रकारचे असते
- प्रत्यक्ष प्रमाण
- अनुमान प्रमाण
- उपमान प्रमाण
- शब्द प्रमाण
इंद्रियांशी प्रत्यक्ष संबंध आल्याने जे ज्ञान होते ते प्रत्यक्ष प्रमाण होय.
इंद्रियांना जाणवलेल्या लक्षणांवरून जे ज्ञान होते ते अनुमान प्रमाण होय.
इंद्रियांना जाणवलेल्या लक्षणांवरून जे ज्ञान होते ते अनुमान प्रमाण होय.
इंद्रियांना जाणवलेल्या वस्तूवरून संबंधित तशाच गोष्टीचे ज्ञान होते ते उपमान प्रमाण होय. उदा. गायीवरून नीलगायीचे ज्ञान.
आप्त अथवा विश्वासपात्र व्यक्तीकडून/ ग्रंथातून जे ज्ञान होते त्याला शब्द प्रमाण म्हटले जाते.
काही दर्शने या चार प्रमाणाव्यतिरिक्त अन्य चार प्रमाणेही मानतात.
- ऐतिह्य,
- अर्थापत्ति,
- संभव,
- अभाव
जी गोष्ट केवळ परंपरेने मान्यता पावली आहे तिला ऐतिह्य प्रमाण म्हणतात.
जी गोष्ट पाहून अथवा ऐकून तिच्यात काही विरोधाभास जाणवल्याने तो विरोधाभास नष्ट करण्यासाठी जे ज्ञान होते ते 'अर्थापत्ति प्रमाण' होय. उदा. एखादा माणूस जादा आहे, परंतु तो दिवसा खात नसेल तर रात्री भरपूर खातो हे अर्थापत्ती प्रमाण होय.
एखाद्या वस्तूच्या आत दुसरी वस्तू असणारच हे संभाव प्रमाण आहे.
तर एखाद्या गोष्टीमुळे कोणत्या तरी गोष्टीचा अभाव काळात असेल तर ते अभाव प्रमाण आहे. उदा. उंदीर फिरत असतील तेथे मांजरे नाहीत हे अभाव प्रमाण आहे.
तीन प्रमुख प्रमाणांमध्ये 'प्रत्यक्ष प्रमाण' हे पहिले प्रमाण होय. 'प्रत्यक्ष' या शब्दाची फोड प्रती+अक्ष अशी करता येईल. प्रत्यक्ष म्हणजे जे डोळ्यासमोर घडले आहे ते किंवा जे डोळे अथवा पंचेंद्रियांना प्रतीत होते ते.
यात इंद्रियांचा पदार्थाशी प्रत्यक्ष संबंध असला पाहिजे. 'वस्तू जळत आहे' (डोळ्यांना दिसत आहे), 'मला त्याची धग जाणवते आहे' हे प्रत्यक्ष प्रमाण झाले. परंतु 'हा ग्रंथ प्राचीन आहे' हे प्रत्यक्ष प्रमाण नाही. कारण यात ज्ञान हे फक्त शब्दांद्वारे झाले आहे. पण तो ग्रंथ जुनाट दिसतो आहे, पाने जीर्ण-शीर्ण होऊन फाटली आहेत असे दिसत असेल तर ते प्रत्यक्ष प्रमाण होईल.
प्रत्यक्ष प्रमाण ६ प्रकारचे असते
- चाक्षुष प्रत्यक्ष प्रमाण : एखादा पदार्थ डोळ्यासमोर आल्यावर होते ते. उदा. 'हे पुस्तक नवे आहे'.
- श्रावण प्रत्यक्ष प्रमाण : ध्वनीच्या सहाय्याने होते ते. उदा. घंटेचा आवाज ऐकल्यावर कळते की 'घंटेचा आवाज आला'.
- स्पर्श प्रत्यक्ष प्रमाण : स्पर्शाच्या सहाय्याने होते ते. उदा. बर्फ हातात घेतल्यावर ज्ञान होते की 'बर्फ थंड आहे'.
- रसायन प्रत्यक्ष प्रमाण : जिव्हेच्या सहाय्याने होणारे ज्ञान. उदा: मीठ खाल्ल्यावर ज्ञान होते की 'मीठ खारट आहे'
- घ्राणज प्रत्यक्ष प्रमाण : नाकाच्या सहाय्याने होणारे ज्ञान . उदा. फूल हुंगाल्यावर ज्ञान होते की 'हे फूल सुवासिक आहे'
- मानस प्रत्यक्ष प्रमाण : उदा. सुख, दु:ख, दया इत्यादींचे अनुभव.
No comments:
Post a Comment