अनेकांतवाद हा जैन दर्शनाचा पाया आहे हे आपण मागील लेखात पहिले. अनेकांतवाद हा नयवाद आणि स्यादवाद यांनी बनलेला आहे. नयवादाचा आता विचार करू.
नय म्हणजे अंश किंवा बघणाऱ्याचा विशिष्ट अभिप्राय. नयो ज्ञातुरभिप्राय: | एकाच गोष्टीकडे आपण निरनिराळ्या संदर्भात पाहू शकतो. त्यामुळे त्या वस्तूच्या वेगवेगळ्या अंगांचे ज्ञान होते.अशाप्रकारे एका संदर्भात झालेल्या ज्ञानाला 'तेच खरे' म्हणून चिकटून राहून अन्य संदर्भात झालेल्या ज्ञानाला नाकारणे हे जैन दर्शनाला मान्य नाही. अशा चुकीस जैन परिभाषेत 'नयाभास' म्हणतात.
नयाची अनेक वर्गीकरणे केलेली आहेत. त्यातील एक म्हणजे 'द्रव्यनय' आणि 'पर्यायनय'.
प्रत्येक वस्तू एका मुलभूत गोष्टीपासून बनलेली असते. तिच्यात अवस्थांतर झाले तरी मूलभूत गोष्ट तशीच रहाते. या मूलभूत गोष्टीने ती वस्तू ओळखणे हा द्रव्यनय झाला. उदाहरणार्थ माझा सुती सदरा हा कापसाचा बनलेला आहे. कापसाचे नंतर धागे बनले, कापड बनले आणि त्याचा सदरा बनला. तरी त्यातील कापूस हे द्रव्य तसेच राहते. त्यामुळे सदऱ्याला कापूस म्हणून ओळखणे हा द्रव्यनय झाला. सध्या महाराष्ट्र शासन प्लास्टिकवर बंदी आणीत आहे. प्लास्टिकच्या पिशव्या, कापड, चमचे इत्यादी 'प्लास्टिक' म्हणूनच ओळखले जाईल. हा द्रव्यनय आहे.
जैन परिभाषेत वस्तूच्या निरनिराळ्या अवस्थांना 'पर्याय' म्हणतात. जेव्हा वस्तूचे ज्ञान होताना या अवस्थांचे प्रामुख्याने ज्ञान होते तेव्हा तेथे पर्यायनय होतो असे मानतात. या पर्यायनयाचेही अनेक उपविभाग जैन दर्शनामध्ये होतात. परंतु आपण तेवढ्या खोलात सध्यातरी जाणार नाही.
मी पुस्तक वाचतो असे म्हणताना आपण पुस्तकाची एक ओळच वाचत असतो. त्यामुळे कोणी म्हणेल मी ही ओळ वाचतो, तर कोणी म्हणेल मी हा धडा वाचतो. ही विविध नयाची उदाहरणे झाली. जैन दर्शनाच्या मते सांख्यदर्शन, अद्वैतदर्शन (उत्तरमीमांसा) इत्यादी दर्शने कोणत्यातरी एकाच नयावर भर देतात. यामुळे ती स्वत:ला इतरांपासून वेगळी समजतात. पण हा केवळ नयाभास आहे. त्यामुळे या कोणत्याही दर्शनाला (अथवा नयाला) ताज्य ठरविता येत नाही. सत्याचे ते विविध अंगांनी झालेले दर्शन आहे.
पुढील लेखात आपण 'स्यादवादा'चा विचार करू.

No comments:
Post a Comment