Friday, March 23, 2018

भारतीय दर्शनशास्त्रे

आपल्या प्राचीन ज्ञानसंपत्तीत अनेक दर्शने येतात. प्रत्येक दर्शन अध्यात्म/ देव यांचे आपल्या परीने अर्थ लावते. अशा अनेक (शेकडो) दर्शनांपैकी आठ दर्शने महत्वाची मानली जातात. सांख्य, वैशेषिक, न्याय, चार्वाक (लोकायत), पूर्वमीमांसा, उत्तर मीमांसा, बौद्ध आणि जैन ही ती आठ दर्शने होत.
Image result for ऋषिआजचे भारतीय मानस सांख्य दर्शनावर (ज्यावर भगवतगीता आधारलेली आहे) पोसलेले आहे. याशिवाय आद्य शंकराचार्यांचे उत्तमीमांसा (वेदांत दर्शन) हे ही भारतीयांवर प्रभाव टाकते. चार्वाक दर्शन हे तर परमेश्वराला न मानणारे दर्शन आहे.
हिंदू धर्म असा व्यापक पायावर उभा आहे.  परंतु बहुसंख्य भारतीयाना आपल्या या अमुल्य ठेव्याची कल्पना नाही. त्यामुळे अतिरेकी धर्मावाद्यान्च्या जाळ्यात ते गुरफटतात. तसेच भारतीय दर्शनांमधील विविध एकमेकांना छेद देणाऱ्या गोष्टी (उदा. पुरुष-शक्ती कल्पना आणि 'सर्वांभूती एकाच परमेश्वर')   'हिंदू धर्मातील' म्हणून पुढे आल्याने गोंधळून आपला धर्मच गोंधळ असलेला आहे अशी त्यांची समजूत होते. खरेतर आपल्या धर्मात प्रत्येक दर्शनात अत्यंत तार्किक पद्धतीने मांडणी केलेली आहे. यात कोठेही तार्किक गोंधळ नाही. परंतु आपल्या धर्मविषयीच्या अज्ञानाने अशी समजूत होते. आपला धर्म अन्य पाश्चत्य धर्मांसारखा नाही तर अनेक दर्शनांना सामावून घेणारा व्यापक धर्म आहे हे प्रथम लक्षात घेतले पाहिजे.

 भारतीय दर्शनशास्त्रावर  सोप्या शब्दात एक लेखमाला लिहिण्याचा विचार आहे.
मी दर्शनशास्त्रातील अधिकारी व्यक्ती नाही. महाविद्यालयात (IIT Mumbai) अभियंत्याची पदवी घेत असताना अभ्यासात भारतीय तत्वज्ञान हा विषय होता. त्यामुळे तेव्हा या विषयाच्या संपर्कात आलो. आमचे तेव्हाचे त्या विषयाचे 'प्राध्यापक भट' (initials आठवत नाहीत) यांनी तो विषय मन लावून शिकविला आणि आम्हाला गोडी लावली. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून ही लेखमाला सुरु करीत आहे. या लेखनाला संदर्भ म्हणून श्री. दिक्षित यांचे 'भारतीय तत्वज्ञान' हे पुस्तक प्रमाण मानत आहे. तसेच internet वरून माहिती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. माझ्या माहितीत काही त्रुटी आढळल्यास मला त्याची जाणीव करून द्यावी ही या विषयातील अधिकारी व्यक्तींना प्रार्थना.

आम्ही हिमवादळात सापडतो...भाग ३

आम्ही या वादळात अडकलो असतानाची पहिलीच रात्र. दमून आम्ही रात्री लवकरच नऊ च्या सुमारास झोपी गेलो. 
रात्री साडेदहाच्या सुमारास आमच्या तंबूजवळून घोड्यांच्या खिंकाळण्याचा आणि टापांचा आवाज आल्याने आम्हाला जाग आली. आमच्या जवळच काही गुराखी घोडे घेऊन राहिले होते. त्यांचे घोडे मोकळेच होते आणि हे गुराखी या हिमवृष्टीताही अंगावर त्यांचे अतिशय उबदार घोंगडे घेऊन उघड्यावर झोपत असत.मागील दोन भागांत वर्णन केल्याप्रमाणे आम्ही १९८७ साली राष्ट्र सेवादल ठाणे तर्फे हिमालयन ट्रेकला गेलो असता अचानक आलेल्या हिमवादळात अडकलो. चार दिवस हिमालयातील फारशी वर्दळ नसलेल्या ठिकाणी तंबूत आम्ही अडकलो होतो.आम्हाला जाग आल्यावर सहज बाहेर लक्ष गेले. तंबूचे कापड अर्धपारदर्शक होते. बाहेर पडलेल्या बर्फाने आणि आजूबाजूच्या हिमाच्छादित शिखरांमुळे आसमंत उजळून निघाला होता. त्यामुळे तंबूच्या बाहेरचे पुसटसे दिसत होते. आमच्या तंबूंपैकी मुलींच्या तंबूबाहेर एक अस्वलाची जोडी आली होती आणि ती अस्वले त्या तंबूला नाक लावून वास घेत होती. तंबूतील खाद्यपदार्थांचा त्यांना वास येत असावा. तंबूच्या आतून मुलींचा गप्पांचा आवाज येत होता.
No automatic alt text available.अस्वल हे सर्वात धोकादायक प्राण्यांमधील समजले जाते. अस्वलाच्या तडाख्यात कोणी माणूस सापडलाच तर तो जिवंत रहाणे कठीण असते. जिवंत राहिलाच तर त्याचे डोळे सर्वसाधारणपणे जातात, तोंडही विद्रूप होते. अस्वलाचे हात (पुढील पाय) माणसाच्या तोंडाच्या पातळीवर येत असल्याने ते तोंड ओरबडतात. मुलींना या धोक्याची कल्पनाच नव्हती. आमच्या तंबूतील मुलांनी तंबूत ठेवलेल्या काठ्या हातात घेतल्या. गरज पडल्यास अस्वलाशी दोन हात करण्याची तयारी केली. पण त्या अस्वलांना बहुदा तंबूच्या आत कसे शिरायचे हे कळले नसावे. त्यांना सहज तंबू फाडता आला असता. पण त्यांना ती गोष्ट नवी असल्याने समजले नाही. थोड्या वेळाने ही अस्वले निघून गेली. आम्हाला रात्रभर नीट झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी मुलींना विचारता, त्यांना अस्वल जवळपास आले आहे हे अस्वलाच्या आवाजावरून कळले होते असे समजले. पण अस्वल हे किती धोकादायक प्राणी आहे याची त्यांना कल्पना नव्हती. मुलींपैकी एका मुलीच्या घराच्या बाजूला नेहमी दरवेशांचा तळ पडत असे. त्यामुळे ती अस्वलांना सरावली होती आणि तिची अस्वलांची भीती गेली होती. तिनेच अस्वलांचा आवाज ओळखला होता.

आम्ही तेथे असेपर्यंत रोज रात्री ही अस्वलांची जोडी येत असे आणि आमचे तंबू हुंगून जात असे. काही अघटीत घडले नाही. चार दिवसांनी हिमवृष्टी थांबताच आम्ही तेथून निघण्याचा निर्णय घेतला.

No automatic alt text available.
बर्फावरून घसरगुंडी. अत्यंत उतरत्या बर्फावरून खाली उतरताना कधीकधी अशीही अवस्था

Add caption
Image may contain: one or more people, mountain, sky, outdoor and nature
हिमालयावर चढाई

Image may contain: outdoor
हिमनदी (ग्लेशियर) पार करताना. हा अत्यंत धोकादायक प्रकार आहे. जर पायाखालचा बर्फ आपल्या वजनाने तुटला तर सरळ हिमनदीत बर्फाखाली वहात जाणार.



आम्ही हिमवादळात सापडतो...भाग २

Image may contain: 7 people, outdoor
बियास कुंड : मागे बियास नदीचा उगम दिसतो आहे.
मागील लेखात वर्णन केल्याप्रमाणे राष्ट्र सेवादल ठाणे तर्फे आम्ही काढलेल्या हिमालयन ट्रेकमध्ये आम्ही हिमवादळात सापडलो होतो. तंबूचा वरचा काही भाग फाटून त्यातून वाऱ्यास जाण्यास वाट मिळाल्याने आता तंबू उडून जाण्याची भीती राहिली नव्हती. पण सतत होत असलेल्या हिमवर्षावामुळे तंबूतून बाहेर जाण्याची सोय नव्हती. आमचे तीन तंबू होते, शिवाय स्वयंपाक्याचा वेगळा तंबू होता. त्यामुळे जेवणासाठी तंबूच्या बाहेर पडणे आवश्यक होते. तसेच प्रातार्विधींसाठी बाहेर पडणे गरजेचे होते.
त्यातच आणखी एक गोष्ट होती. हिमवर्षावामुळे उंचावरील प्राणी खालच्या बाजूस आले होते. त्यामुळे प्रातर्विधींसाठी जाताना हे प्राणी हल्ला करतील अशी भीती होती. बसलेल्या माणसावर हे प्राणी बसलेला माणूस छोटा प्राणीच आहे असे समजून हल्ला करतात. त्यामुळे निसर्गाच्या हाकेसाठी जाताना सोबत कोणीतरी घेऊन जाणे गरजेचे होते.
आमचा स्वयंपाकी तशाही परिस्थितीत रोज डोंगरावर जाऊन तेथील भाज्या खुडून आणीत असे आणि आमच्यासाठी शिजवीत असे. (या ट्रेकमध्ये हिमालयात मिळणाऱ्या भाज्याच रोज आणून शिजवीत असे. भाज्या बरोबर नेणे शक्य नव्हते).
Image may contain: one or more people and outdoor
खळखळती बियास लाकडाच्या ओंडक्याच्या सहाय्याने पार करताना. पाय घसरल्यास जलसमाधी.
अशा या हिमवर्षावात चार दिवस गेले. मात्र आम्ही कोणीच चिंताग्रस्त झालो नव्हतो अथवा घाबरलोही नव्हतो. त्या काळी मोबाईल नव्हते. त्यामुळे घराच्या कोणालाही आमच्या परिस्थितीचा पत्ता नव्हता. त्यामुळे तेही निवांत होते. आमच्याकडे असलेल्या एकमेव रेडीओवर बातम्या ऐकणे हाच उर्वरित जगाशी संपर्क. पत्ते खेळणे, गप्पा मारणे आणि सेवादलाची गाणी म्हणणे हाच या काळातील उद्योग होता. चार दिवसांनी हिमवर्षाव थांबला आणि आम्ही पुढील प्रवासास निघालो. या चार दिवसातील पहिल्याच रात्री आम्हाला एक चित्तथरारक अनुभव आला. पुढील लेखात त्याविषयी.
Image may contain: one or more people and outdoor
आमचे तंबू
Image may contain: outdoor and nature
हिमनदी

Monday, March 19, 2018

आम्ही हिमवादळात सापडतो.....भाग १


ढग दरीतून वर येताना
१९८७ चा मे महिना होता. राष्ट्र सेवा दल ठाणेची नंदा पाटणकर (Shrikant Patankar) याच्या नेतृत्वाखाली हिमालयावर ट्रेक गेली होती. नंदा हा नेहमीच आमचा हायकिंगमधील उत्कृष्ट लीडर राहिला आहे.
आम्ही या ट्रेकसाठी एक गाईड घेतला होता. हा गाईड आमचा स्वयंपाकी म्हणूनही काम करीत असे. आम्ही मनालीपासून चढाईस सुरुवात केली. बियास कुंड येथपर्यंत यशस्वीपणे जाऊन आलो. आमच्या परतीच्या प्रवासात मुक्काम मानली-रोहतांग पासच्या वाटेवर एका ठिकाणी होता. हिमालयात सर्वसाधारणपणे पहाटे चढाईस सुरुवात करायची असते आणि मध्यान्हानंतर विश्रांती घ्यायची असते. दुपारी उन्हामुळे बर्फ वितळून कडे पडण्यास सुरुवात होते. म्हणून ही काळजी घ्यायची. आम्ही असेच दुपारी मुक्कामासाठी थांबलो. आकाश निरभ्र होते. आम्ही आमच्या गाईडच्या मदतीने तंबू ठोकले. आमचा गाईड स्वयंपाकाच्या तयारीस लागला आणि आम्ही सर्व एका तंबूत पत्ते खेळण्यास बसलो. Image may contain: 4 people, people sitting and childथोड्याच वेळात ढगांचा गडगडाट ऐकू आला. बाहेर पहिले तर आभाळ भरून आले होते. आम्ही लगबगीने तंबूच्या भोवती चर खणून पाणी तंबूत शिरणार नाही याची व्यवस्था केली. थोड्याच वेळात हिमवृष्टी सुरु झाली आणि मोठे वादळ सुटले. आमच्या तंबूच्या उघड्या दारातून वारा आत घुसला आणि आमचा तंबू वर ढकलला जाऊ लागला. तंबूला बांधलेले मोठे खिळे (Pegs) उपटले जाऊ लागले. आमचा तंबू आमच्या सकट (तंबूला खालूनही कापड असते) बाजूच्या दरीत जातो आहे काय अशी भीती वाटू लागली. पण तेवढ्यात तंबूच्या वरच्या बाजूचे कापड फाटले आणि तंबूत शिरलेल्या हवेला वाट मिळाली. आम्ही सुटकेचा निश्वास टाकला.
आम्ही चार दिवस या ठिकाणी अडकून पडलो होतो. त्यावेळी आणखी काय काय प्रसंग घडले याची माहिती पुढील लेखात

Image may contain: 10 people, including Satish Kasbe, people smiling, people standing and outdoor
जाताना दिल्लीत साथी मधु दंडवते यांच्या घरी मुक्काम. प्रमिलाताई आणि मधु दंडवते यांनी आमचे चागले आदरातिथ्य केले. काही दिवस त्यांच्या घरी आम्ही सर्वजण राहिलो होते.

घराणे...आडनाव...काही विचार

No automatic alt text available.
माझ्या आईकडून मला X गुणसूत्र आले तर वडिलांकडून (त्यांच्याकडे एकमेव असलेले) Y गुणसूत्र आले. वडिलांना त्यांच्या वडिलांकडून आले. म्हणजेच माझ्या काका आणि चुलत भावांकडेकडे हेच Y गुणसूत्र असणार. माझ्या चुलत चुलत भावांकडे या न्यायाने हेच Y गुणसूत्र असायला हवे. म्हणजेच आमच्या 'कारखानीस' घराण्यात हेच Y गुणसूत्र असणार.

स्त्रियांच्या बाबतीत असे निश्चित सांगता येत नाही. तिच्याकडे तिच्या आईकडून आलेले (आईकडे असलेल्या दोनपैकी) एक X आणि वडिलांकडून आलेले (एकाच असलेले) एक X गुणसूत्र असेल. म्हणजेच तिच्यात आणि तिच्या बहिणींमध्ये वडिलांकडून आलेले X गुणसूत्र सारखेच असेल. तिच्या वडिलांना हे गुणसूत्र त्यांच्या आईकडूनच आलेले असेल. पण त्यांच्या सख्ख्या भावाला त्यांच्या आईकडून हेच गुणसूत्र मिळाले असेल याची शाश्वती देता येत नाही. (वडिलांच्या आईकडे X गुणसुत्रांची जोडी आहे)
याच कारणाने 'घराणे' या कल्पनेचा उगम झाला असेल काय? म्हणूनच मुलाने वडिलांचे आडनाव लावणे ही शास्त्रशुद्ध पद्धत मानावी काय?