आपल्या प्राचीन ज्ञानसंपत्तीत अनेक दर्शने येतात. प्रत्येक दर्शन अध्यात्म/ देव यांचे आपल्या परीने अर्थ लावते. अशा अनेक (शेकडो) दर्शनांपैकी आठ दर्शने महत्वाची मानली जातात. सांख्य, वैशेषिक, न्याय, चार्वाक (लोकायत), पूर्वमीमांसा, उत्तर मीमांसा, बौद्ध आणि जैन ही ती आठ दर्शने होत.
आजचे भारतीय मानस सांख्य दर्शनावर (ज्यावर भगवतगीता आधारलेली आहे) पोसलेले आहे. याशिवाय आद्य शंकराचार्यांचे उत्तमीमांसा (वेदांत दर्शन) हे ही भारतीयांवर प्रभाव टाकते. चार्वाक दर्शन हे तर परमेश्वराला न मानणारे दर्शन आहे.
हिंदू धर्म असा व्यापक पायावर उभा आहे. परंतु बहुसंख्य भारतीयाना आपल्या या अमुल्य ठेव्याची कल्पना नाही. त्यामुळे अतिरेकी धर्मावाद्यान्च्या जाळ्यात ते गुरफटतात. तसेच भारतीय दर्शनांमधील विविध एकमेकांना छेद देणाऱ्या गोष्टी (उदा. पुरुष-शक्ती कल्पना आणि 'सर्वांभूती एकाच परमेश्वर') 'हिंदू धर्मातील' म्हणून पुढे आल्याने गोंधळून आपला धर्मच गोंधळ असलेला आहे अशी त्यांची समजूत होते. खरेतर आपल्या धर्मात प्रत्येक दर्शनात अत्यंत तार्किक पद्धतीने मांडणी केलेली आहे. यात कोठेही तार्किक गोंधळ नाही. परंतु आपल्या धर्मविषयीच्या अज्ञानाने अशी समजूत होते. आपला धर्म अन्य पाश्चत्य धर्मांसारखा नाही तर अनेक दर्शनांना सामावून घेणारा व्यापक धर्म आहे हे प्रथम लक्षात घेतले पाहिजे.
भारतीय दर्शनशास्त्रावर सोप्या शब्दात एक लेखमाला लिहिण्याचा विचार आहे.
मी दर्शनशास्त्रातील अधिकारी व्यक्ती नाही. महाविद्यालयात (IIT Mumbai) अभियंत्याची पदवी घेत असताना अभ्यासात भारतीय तत्वज्ञान हा विषय होता. त्यामुळे तेव्हा या विषयाच्या संपर्कात आलो. आमचे तेव्हाचे त्या विषयाचे 'प्राध्यापक भट' (initials आठवत नाहीत) यांनी तो विषय मन लावून शिकविला आणि आम्हाला गोडी लावली. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून ही लेखमाला सुरु करीत आहे. या लेखनाला संदर्भ म्हणून श्री. दिक्षित यांचे 'भारतीय तत्वज्ञान' हे पुस्तक प्रमाण मानत आहे. तसेच internet वरून माहिती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. माझ्या माहितीत काही त्रुटी आढळल्यास मला त्याची जाणीव करून द्यावी ही या विषयातील अधिकारी व्यक्तींना प्रार्थना.

अस्वल हे सर्वात धोकादायक प्राण्यांमधील समजले जाते. अस्वलाच्या तडाख्यात कोणी माणूस सापडलाच तर तो जिवंत रहाणे कठीण असते. जिवंत राहिलाच तर त्याचे डोळे सर्वसाधारणपणे जातात, तोंडही विद्रूप होते. अस्वलाचे हात (पुढील पाय) माणसाच्या तोंडाच्या पातळीवर येत असल्याने ते तोंड ओरबडतात. मुलींना या धोक्याची कल्पनाच नव्हती. आमच्या तंबूतील मुलांनी तंबूत ठेवलेल्या काठ्या हातात घेतल्या. गरज पडल्यास अस्वलाशी दोन हात करण्याची तयारी केली. पण त्या अस्वलांना बहुदा तंबूच्या आत कसे शिरायचे हे कळले नसावे. त्यांना सहज तंबू फाडता आला असता. पण त्यांना ती गोष्ट नवी असल्याने समजले नाही. थोड्या वेळाने ही अस्वले निघून गेली. आम्हाला रात्रभर नीट झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी मुलींना विचारता, त्यांना अस्वल जवळपास आले आहे हे अस्वलाच्या आवाजावरून कळले होते असे समजले. पण अस्वल हे किती धोकादायक प्राणी आहे याची त्यांना कल्पना नव्हती. मुलींपैकी एका मुलीच्या घराच्या बाजूला नेहमी दरवेशांचा तळ पडत असे. त्यामुळे ती अस्वलांना सरावली होती आणि तिची अस्वलांची भीती गेली होती. तिनेच अस्वलांचा आवाज ओळखला होता.

थोड्याच वेळात ढगांचा गडगडाट ऐकू आला. बाहेर पहिले तर आभाळ भरून आले होते. आम्ही लगबगीने तंबूच्या भोवती चर खणून पाणी तंबूत शिरणार नाही याची व्यवस्था केली. थोड्याच वेळात हिमवृष्टी सुरु झाली आणि मोठे वादळ सुटले. आमच्या तंबूच्या उघड्या दारातून वारा आत घुसला आणि आमचा तंबू वर ढकलला जाऊ लागला. तंबूला बांधलेले मोठे खिळे (Pegs) उपटले जाऊ लागले. आमचा तंबू आमच्या सकट (तंबूला खालूनही कापड असते) बाजूच्या दरीत जातो आहे काय अशी भीती वाटू लागली. पण तेवढ्यात तंबूच्या वरच्या बाजूचे कापड फाटले आणि तंबूत शिरलेल्या हवेला वाट मिळाली. आम्ही सुटकेचा निश्वास टाकला.