Friday, March 29, 2019

'दृक्-दृश्य विवेक' भाग १

'दृक्-दृश्य विवेक' हा अद्वैत वेदांताचा प्रकरण ग्रंथ (Introductory Text). त्याच्या विवेचनाला मी आता सुरुवात करीत आहे. हा ग्रंथ समजण्यास कठीण आहे. मला तो संपूर्ण समजला आहे असे वाटत नाही. तरीही माझ्या फेसबुक/ब्लॉगर मित्रांना या ग्रंथसंबंधी माहिती व्हावी म्हणून हा माझा प्रयत्न. माझ्या या 'लहान तोंडी मोठा घास घेण्याच्या' औधात्याबद्दल या ग्रंथाचे रचयिता  (विद्यारण्यस्वामी, भारतीतीर्थ अथवा आद्य शंकराचार्य ) यांची तसेच हा ग्रंथ ज्यांच्या Youtube Videos वरून मी समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे त्या स्वामी सर्वप्रियानंद यांची क्षमा मागून विवेचनाला सुरुवात करतो.

मी कोण आहे, देव अथवा परमेश्वर म्हणजे काय, शाश्वत आनंद शक्य आहे काय, तो कसा प्राप्त करायचा, मी दु:खातून बाहेर पडू शकेन काय, या विश्वाची निर्मिती कशी झाली, मृत्यूनंतर काय होते असे प्रश्न आपल्या मनात उद्भवत असतील. जगातील अत्यंत प्राचीन अशा आपल्या संस्कृतीने, त्यातील महान ऋषींनी या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. उपनिषदे हे अशा प्रयत्नाचे सार आहे.  अद्वैत वेदांताचा आधार ही उपनिषदे आहेत. हा ग्रंथ अद्वैत वेदांताची तोंडओळख करून देणारा आहे.

'विवेक' या शब्दाचा अर्थ योग्य-अयोग्य, सत्य-असत्य एकत्र असलेल्या गोष्टींतून सत्य आणि असत्य , योग्य आणि अयोग्य अशा गोष्टी वेगळ्या करण्याची/समजण्याची क्षमता.  'दृक्' या शब्दाचा शब्दश: अर्थ 'डोळे' असा होतो. डोळे आणि दृश्य हे वेगळे समजण्याची क्षमता 'दृक्-दृश्य विवेक' याचा शब्दश:अर्थ होईल.
हा ग्रंथ वैज्ञानिक पद्धतीने लिहिलेला असल्याने सुरुवातीलाच गृहीतके मांडतो. गृहीतके याचा अर्थ कोणत्या गोष्टी आधीच गृहीत धरून या ग्रंथाची मांडणी केली आहे याची स्पष्टता. कोठलाही उत्तम शिक्षक आपल्याला माहित असलेल्या गोष्टींपासून सुरुवात करतो आणि हळूहळू आपल्याला अज्ञात प्रांतात घेऊन जातो.  हा ग्रंथ हेच करतो. आपल्याला माहित असलेली गोष्ट म्हणजेच 'गृहीतक'.
'एखादी गोष्ट आपण बघत असू, अनुभवत असू तर ती गोष्ट (दृश्य) आणि बघणारा (द्रष्टा) हे भिन्न असतात' हे या ग्रंथातील पहिले गृहीतक आहे. डोळ्याने विविध वस्तू दिसतात, कारण डोळा आणि त्या वस्तू भिन्न आहेत. डोळ्याने त्याच डोळ्याकडे पाहता येत नाही. फारतर आपण आरशात डोळ्याने त्याच डोळ्याची प्रतिमा पाहू शकतो, पण तो डोळा नव्हे. ही अत्यंत सामान्य गोष्ट आहे असे आपल्याला वाटते. पण हे गृहीतक नीट समजून घेतले तर या ग्रंथाचा पुढील प्रवास सोपा आणि तर्कशुद्ध वाटतो.
दुसरे गृहीतक म्हणजे 'दृष्टा' एक असतो, परंतु दृश्यात विविधता असते. आपल्या डोळ्यांची जोडी एकाच असते, परंतु त्याने आपण विविध गोष्टी पाहू शकतो. कानांची जोडी एकाच असते, परंतु आपण विविध आवाज ऐकू शकतो.
तिसरे गृहीतक म्हणजे दृश्य बदलत असते, द्रष्टा त्या मानाने स्थिर असतो. डोळ्यासमोरील दृश्ये बदलतात, पण डोळे तेच असतात. कानाला ऐकू येणारे आवाज बदलतात, पण कान तेच असतात.

संतोष कारखानीस 

Friday, March 22, 2019

प्रत्याभिज्ञ पंथ (एक काश्मिरी शैव पंथ)

प्रत्याभिज्ञ हा एक काश्मिरी शैव पंथ आहे. हा पंथ अडवत वेदांताला अत्यंत जवळचा आहे. स्वामी सोमानंद (इ.स.८७५-९२५) हे या पंथाचे मुख्य प्रवर्तक समजले जातात. त्यांनी 'शिवदृष्टी' हा ग्रंथ लिहिला. त्यांचे शिष्य स्वामी उत्पलदेव (इ.स.९००-९५०) यांनी या पंथाच्या तत्वज्ञानाचा आदिक विस्तार केला. त्यांचा 'ईश्वर प्रत्याभिज्ञ कारिका' हा ग्रंथ प्रसिद्ध आहे.
या पंथाच्या मते सर्व विश्व हे 'शिव' आहे. शिवाला वाटले म्हणून शिवाने या विश्वाची जडण-घडण केली. शिवाला वाटले म्हणून त्याने आपला देह-मन घडविले. जेव्हा हा आपल्यातील शिव आपल्या मन-देहाशी एकरूप झालेला असतो तेव्हा त्याला जीव म्हणतात. कोठल्याही क्षणी हा आपल्यातील शिव आपली देह-मनाची एकरूपता सोडून शिव  स्वरूपात प्रकट होऊ शकतो. ते आपल्या इच्छेवर अवलंबून आहे. कारण आपण शिव आहोत आणि या शिवाच्याच इच्छेने आपण जीव झालो आहोत. जीवाकडून शिवाकडे जाण्याचा प्रवास हा इतका सोपा आहे.

Saturday, March 2, 2019

अद्वैत वेदांत

वेदान्त नामम् उपनिषदम् प्रमाणम् |
वेदांत हे दर्शन उपनिषदांवर, त्यातील ज्ञानावर आधारलेले आहे. उपनिषदे ही वेदांचा भाग आहेत. वेद हे जगातील सर्वात प्राचीन वाङ्मय समजले जाते. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे चार वेद आहेत. वेदातील बराचसा भाग हा यज्ञविधींसंबंधी आहे. वेदांच्या शेवटी (कधीकधी मध्यभागीही) वेदांची अध्यात्मिक भूमिका स्पष्ट करणारे विभाग येतात. तेच 'उपनिषदे' होत. उपनिषदे बहुतेकवेळा वेदांच्या शेवटचा भाग असल्याने त्याला 'वेदांत' म्हणत असावेत. किंवा वेदांतील उच्चतम तत्व सांगणारे असल्याने ('अंत' हा शब्द 'उच्चतम' या अर्थानेही येतो) त्याला वेदांत म्हणत असावेत.
उपनिषदे अनेक आहेत. त्यातील दहा महत्वाची समजली जातात. ही महत्वाची समजण्याचे कारण म्हणजे त्यावर आद्य शंकराचार्यानी भाष्य केले आहे. इशोपनिषद, केनोपनिषद, कठोपनिषद, प्रश्नोपनिषद, ऐतरेय उपनिषद, तैत्तरीय उपनिषद, मुंडक उपनिषद, मांडुक्य उपनिषद, छांदोग्य उपनिषद, बृहदारण्यक उपनिषद ही ती दहा उपनिषदे होत. यातील मांडुक्य उपनिषद सर्वात लहान आहे तर बृहदारण्यक उपनिषद खूप मोठे आहे. काही उपनिषदे पद्यात (मंत्र) आहेत तर काही गद्यामध्ये आहेत. ती सुमारे तीन ते चार हजार वर्षांपूर्वीची असावीत. उपनिषदे 'अपौरुषेय' समजली जातात. म्हणजे ती कोणा  माणसाने रचलेली नसून प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांनी रचना केली आहे अशी श्रद्धा आहे. ऋषींना ध्यानावस्थेत आलेल्या अनुभवाचे ते सार आहे. हे ज्ञान त्यांना ध्यानावस्थेत मिळालेले असल्याने ते प्रत्यक्ष परमेश्वराने दिले असे मानतात.
उपनिषदांचा अर्थ भगवान कृष्णाने गीतेत सोप्या भाषेत उलगडून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ब्रह्मसूत्रे हे ही उपनिषदांचे सार मानले जाते. ब्रह्मसूत्रात ५५५ सूत्रे आहेत. प्रत्येक सूत्र अर्थाच्या दृष्टीने परिपूर्ण आहे. उपनिषदे हे काव्य आहे, ब्रह्मसूत्रे ही त्या उपनिषदांचे अत्यंत तर्कशुद्ध विवेचन आहे. आद्य शंकराचार्यांनी उपनिषदे, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्रे यावर भाष्य केले आहे. या तीन ग्रंथांना 'प्रस्थानत्रयी' असे नाव आहे. अद्वैत वेदांत दर्शन या प्रस्थानत्रयीच्या भक्कम पायावर उभे आहे. जर अद्वैत वेदांताचा  'तत्वज्ञान' या भूमिकेतून अभ्यास करायचा असेल तर 'ब्रह्मसूत्रें महत्वाची ठरतात.
वेदांत दर्शनाच्या अनेक शाखा आहेत. उपनिषदांचा आणि विशेषतः: ब्रह्मसूत्रांचा अर्थ लावताना जी विविध मते-मतांतरे दिसतात त्यातून या विविध तत्वज्ञान शाखा निर्माण झाल्या आहेत. शंकराचार्यांचे 'ब्रह्मसूत्रभाष्य' हे अद्वैत वेदान्ताचा मुख्य मार्गदर्शक ग्रंथ समाजाला जातो. रामानुजाचार्य यांचे ब्रह्मसूत्रांवरील 'श्रीभाष्य' हे 'विशिष्टअद्वैत वेदांत' या शाखेचा मार्गदर्शक ग्रंथ समाजाला जातो. माध्वाचार्यांचे ब्रह्मसूत्रांवरील 'पूर्णप्रज्ञभाष्य' हा ग्रंथ 'द्वैत वेदांता'चा आधारभूत ग्रंथ आहे. निंबार्काचार्य यांचा 'वेदांतपारिजातभाष्य' हा ग्रंथ 'द्वैताद्वैत वेदांत' शाखेचा प्रमुख ग्रंथ आहे. वल्लभाचार्यांचे ब्रह्मसूत्रांवरील  'अनुभाष्य' हे 'शुद्धाद्वैत वेदांत' या शाखेचा मार्गदर्शक ग्रंथ आहे. 'गोविंदभाष्य' ही ब्रह्मसूत्रांवरील टीका  'अचिंत्यभेदाभेद' ही गौडवैष्णव पंथियांचा प्रमुख ग्रंथ आहे. 'हरेराम पंथीय' हे गौडवैष्णव पंथीयांमध्ये येतात.
अद्वैत वेदांत दर्शन समजण्यास कठीण आहे. म्हणूनच याच्या अभ्यासास सुरुवात करताना सुकर व्हावे म्हणून प्रत्येक शाखेचे काही 'प्रकरण ग्रंथ' (Introductory Texts) आहेत.  दृक्-दृश्य विवेक, वेदांतसार, वेदांत परिभाषा, विवेक चुडामणी, अपरोक्षअनुभूती, उपदेशसहश्री , आत्मबोध हे असे काही प्रकरण ग्रंथ आहेत. या प्रकरण ग्रंथात संपूर्ण वेदांताचा सारांश सांगितलेला असतो अथवा वेदान्ताच्या एखाद्या पैलूचा उहापोह केलेला असतो.
पुढील काही लेखात आपण यातील काही 'प्रकरण ग्रंथांचा' उहापोह करणार आहोत. 

Friday, February 22, 2019

अद्वैत वेदांत आणि विज्ञान


गेले काही आठवडे 'दृक्-दृश्य विवेक' या ग्रंथाचा अभ्यास चालू आहे. पूर्ण होण्यास अजून काही आठवडे जातील. हा ग्रंथ अद्वैत वेदांताचा 'प्रकरण ग्रंथ' (Introductory Text) म्हणून ओळखला जातो. या ग्रंथाचा अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात आली. अद्वैत वेदांत 'हे विश्व ब्रह्म असून दृश्य जग माया आहे' असे मानते.'माया म्हणजे स्थल-काल-कार्यकारणभाव (Space-Time-Causal Relationship)'. विज्ञानाचे हेच क्षेत्र आहे. म्हणजेच असे म्हणता येईल की विज्ञान मायेच्या क्षेत्रातील नियमांचा अभ्यास करते.

अद्वैत वेदांत तीन प्रकारच्या जीवाचा उल्लेख करते.
१>पारिमार्थीक जीव : हा म्हणजेच ब्रह्म
२> व्यावहारिक जीव : हा जीव बाह्य जगातील व्यवहार सांभाळतो. आपण ज्याला सामान्य भाषेत जीव म्हणतो तो हाच जीव. याच जीवाला पुनर्जन्म असतो असे अद्वैत वेदांत मानते. आपल्याला आपल्या ब्रह्मस्वरूपाची जाणीव होताच हा जीव पारिमार्थीक जीवात विलीन होतो.
३> प्रातिभासिक जीव : स्वप्नात आपण उपस्थित असतो, स्वप्ने अनुभवतो. हा स्वप्ने अनुभवणारा जीव म्हणजेच प्रातिभासिक जीव. जाग येताच हा प्रातिभासिक जीव व्यावहारिक जीवात विलीन होतो.

व्यावहारिक जीवासाठी व्यावहारिक जगातील नियम महत्वाचे असतात. म्हणूनच या जीवासाठी विज्ञानाचे महत्व आहे. परंतु मायेच्या क्षेत्रात ब्रह्म येत नसल्याने ते विज्ञानाच्या क्षेत्रात येत नाही. म्हणूनच अद्वैत वेदांतानुसार विज्ञानाच्या नियमांनी अथवा कार्यकारणभावाने ( Logical Thinking) ब्रह्म (अथवा परमेश्वर) सिद्ध करणे हास्यास्पद आहे. ब्रह्म हे केवळ अनुभवाचे क्षेत्र आहे.

Monday, February 4, 2019

भारतीय मुद्रा (रुपया ₹)

भारतीय मुद्रा (रुपया ₹) से जुड़े 31 ग़ज़ब रोचक तथ्य
.
1. भारत में करंसी का इतिहास2500 साल पुराना हैं। इसकी शुरूआत एक राजा द्वारा की गई थी।
.
2. अगर आपके पास आधे से ज्यादा (51 फीसदी) फटा हुआ नोट है तो भी आप बैंक में जाकर उसे बदल सकते हैं।
.
3. बात सन् 1917 की हैं, जब 1₹ रुपया 13$ डाॅलर के बराबर हुआ करता था। फिर 1947 में भारत आजाद हुआ, 1₹ = 1$ कर दिया गया. फिर धीरे-धीरे भारत पर कर्ज बढ़ने लगा तो इंदिरा गांधी ने कर्ज चुकाने के लिए रूपये की कीमत कम करने का फैसला लिया उसके बाद आज तक रूपये की कीमत घटती आ रही हैं।
.
4. अगर अंग्रेजों का बस चलता तो आज भारत की करंसी पाउंड होती. लेकिन रुपए की मजबूती के कारण ऐसा संभव नही हुआ।
.
5. इस समय भारत में 400 करोड़ रूपए के नकली नोट हैं।
.
6. सुरक्षा कारणों की वजह से आपको नोट के सीरियल नंबर में I, J, O, X, Y, Z अक्षर नही मिलेंगे।
.
7. हर भारतीय नोट पर किसी न किसी चीज की फोटो छपी होती हैं जैसे- 20 रुपए के नोट पर अंडमान आइलैंड की तस्वीर है। वहीं, 10 रुपए के नोट पर हाथी, गैंडा और शेर छपा हुआ है, जबकि 100 रुपए के नोट पर पहाड़ और बादल की तस्वीर है। इसके अलावा 500 रुपए के नोट पर आजादी के आंदोलन से जुड़ी 11 मूर्ति की तस्वीर छपी हैं।
.
8. भारतीय नोट पर उसकी कीमत 15 भाषाओंमें लिखी जाती हैं।
.
9. 1₹ में 100 पैसे होगे, ये बात सन् 1957 में लागू की गई थी। पहले इसे 16 आने में बाँटा जाता था।
.
10. RBI, ने जनवरी 1938 में पहली बार 5₹ की पेपर करंसी छापी थी. जिस पर किंग जार्ज-6 का चित्र था। इसी साल 10,000₹ का नोट भी छापा गया था लेकिन 1978 में इसे पूरी तरह बंद कर दिया गया।
.
11. आजादी के बाद पाकिस्तानने तब तक भारतीय मुद्रा का प्रयोग किया जब तक उन्होनें काम चलाने लायक नोट न छाप लिए।
.
12. भारतीय नोट किसी आम कागज के नही, बल्कि काॅटन के बने होते हैं। ये इतने मजबूत होते हैं कि आप नए नोट के दोनो सिरों को पकड़कर उसे फाड़ नही सकते।
.
13. एक समय ऐसा था, जब बांग्लादेश ब्लेड बनाने के लिए भारत से 5 रूपए के सिक्के मंगाया करता था. 5 रूपए के एक सिक्के से 6 ब्लेड बनते थे. 1 ब्लेड की कीमत 2 रूपए होती थी तो ब्लेड बनाने वाले को अच्छा फायदा होता था. इसे देखते हुए भारत सरकार ने सिक्का बनाने वाला मेटल ही बदल दिया।
.
14. आजादी के बाद सिक्के तांबे के बनते थे। उसके बाद 1964 में एल्युमिनियम के और 1988 में स्टेनलेस स्टील के बनने शुरू हुए।
.
15. भारतीय नोट पर महात्मा गांधीकी जो फोटो छपती हैं वह तब खीँची गई थी जब गांधीजी, तत्कालीन बर्मा और भारत में ब्रिटिश सेक्रेटरी के रूप में कार्यरत फ्रेडरिक पेथिक लॉरेंस के साथ कोलकाता स्थित वायसराय हाउस में मुलाकात करने गए थे। यह फोटो 1996 में नोटों पर छपनी शुरू हुई थी। इससे पहले महात्मा गांधी की जगह अशोक स्तंभ छापा जाता था।
.
16. भारत के 500 और 1,000 रूपये के नोट नेपालमें नही चलते।
.
17. 500₹ का पहला नोट 1987 में और 1,000₹ पहला नोट सन् 2000 में बनाया गया था।
.
18. भारत में 75, 100 और 1,000₹ के भी सिक्के छप चुके हैं।
.
19. 1₹ का नोट भारत सरकार द्वारा और 2 से 1,000₹ तक के नोट RBI द्वारा जारी किये जाते हैं.
.
20. एक समय पर भ्रष्टाचार से लड़ने के लिए 0₹ का नोट 5thpillar नाम की गैर सरकारी संस्था द्वारा जारी किए गए थे।
.
21. 10₹ के सिक्के को बनाने में 6.10₹ की लागत आती हैं.
.
22. नोटो पर सीरियल नंबर इसलिए डाला जाता हैं ताकि आरबीआई(RBI) को पता चलता रहे कि इस समय मार्केट में कितनी करंसी हैं।
.
23. रूपया भारत के अलावा इंडोनेशिया, मॉरीशस, नेपाल, पाकिस्तान और श्रीलंका की भी करंसी हैं।
.
24. According to RBI, भारत हर साल 2,000 करोड़ करंसी नोट छापता हैं।
.
25. कम्प्यूटर पर ₹ टाइप करने के लिए ‘Ctrl+Shift+$’ के बटन को एक साथ दबावें.
.
26. ₹ के इस चिन्ह को 2010 में उदय कुमार ने बनाया था। इसके लिए इनको 2.5 लाख रूपयें का इनाम भी मिला था।
.
27. क्या RBI जितना मर्जी चाहे उतनी कीमत के नोट छाप सकती हैं ?
ऐसा नही हैं, कि RBI जितनी मर्जी चाहे उतनी कीमत के नोट छाप सकती हैं, बल्कि वह सिर्फ 10,000₹ तक के नोट छाप सकती हैं। अगर इससे ज्यादा कीमत के नोट छापने हैं तो उसको रिजर्व बैंक ऑफ इंडिया एक्ट, 1934 में बदलाव करना होगा।
.
28. जब हमारे पास मशीन हैं तो हम अनगणित नोट क्यों नही छाप सकते ?
हम कितने नोट छाप सकते हैं इसका निर्धारण मुद्रा स्फीति, जीडीपी ग्रोथ, बैंक नोट्स के रिप्लेसमेंट और रिजर्व बैंक के स्टॉक के आधार पर किया जाता है।
.
29. हर सिक्के पर सन् के नीचे एक खास निशान बना होता हैं आप उस निशान को देखकर पता लगा सकते हैं कि ये सिक्का कहाँ बना हैं.
.
*.मुंबई – हीरा [◆]
*.नोएडा – डाॅट [.]
*.हैदराबाद – सितारा [★]
*.कोलकाता – कोई निशान नहीं.